जीआरएसई तर्फे ९९ व्या आणि १०० व्या युध्दनौकांचे हस्तांतरण
जीआरएसई तर्फे ९९ व्या आणि
१०० व्या युध्दनौकांचे हस्तांतरण
बनले १०० युध्दनौकांचे
हस्तांतरण करणारे भारतातील पहिले शिपयार्ड
गार्डन
रीच शिप बिल्डर्स ॲन्ड इंजिनियर्स लिमिटेड (जीआरएसई), या भारतातील पहिल्या
दर्जाच्या मिनी रत्न कंपनीने तसेच देशांतील आघाडीच्या युध्दनौका तयार करणा-या
कंपनी ने भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासनिक नियंत्रणात काम करत आज
३० मार्च २०१९ रोजी भारतीय नौसेनेला आपली १०० वी युध्दनौका सुपूर्द केली. यामुळे आता जीएसआरई ही भारतातील पहिली शिपयार्ड कंपनी ठरली ज्यांनी भारतीय नौसेना,
भारतीय तटरक्षक दल तसेच मॉरिशिअस कोस्ट
गार्ड यांना १०० युध्दनौकांचे हस्तांतरण केले आहे.
१९६१
मध्ये सीवर्ड डिफेन्स बोट (एमके-१) सुपूर्द केल्यानंतर आता १०० वी नौका सुपूर्द
केली जात आहे. ही बोट एक लँडिंग क्राफ्ट
युटिलिटी - एल-५६ असून तिचे वितरण आज ३० मार्च २०१९ रोजी होत आहे. त्यांनी ९९वी युध्दनौका म्हणजेच एक फास्ट
पेट्रोल व्हेसल आहे ज्याचे वितरण २७ मार्च
२०१९ रोजी केले होते.
ही
१०० वी युध्दनौका ‘इन एलसीयू एल -५६’ औपचारिक वितरण जीएसआरई मध्ये आयोजित करण्यात
आलेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले. हे वितरण करण्यासाठी जीआरएसई चे चेअरमन आणि
व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर ॲडमिरल व्ही के सक्सेना यांनी नौकेचे कमांडिंग
ऑफिसर ले. कमांडर गोपिनाथ नारायणन् यांच्या कडे चाव्या सुपूर्द केल्या. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये
ब्रिगेडियर एस वाय देशमुख, सीएसओ (टेक), ए ॲन्ड डी एनई कमांड कडून भारतीय नैसेने
कडून या नौकेची चाचणी केली.भारत सरकारचे सुरक्षा सचिव आयएएस श्री संजय मित्रा,
ॲडमिरल बी के वर्मा, एव्हीएसएम, एडीसी कमांडर इन चीफ, एॲन्ड एन कमांड, व्हाईस
ॲडमिरल एम एस पवार, एव्हीएसएम, व्हीएसएम, डेप्युटि चीफ ऑफ नेव्हल स्टाफ, श्री
अपुर्व चंद्र, आयएएस डायरेक्टर जनरल (ॲक्विझिशन) भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय,
कमोडोर आयबी उत्तैय्या, व्हीएसएम, प्रिन्सिपल डायरेक्टर शीप प्रॉडक्शन, श्री सर्वजीत सिंग डोगरा, डायरेक्टर
(फायनान्स), श्री असित कुमार नंदा,
डायरेक्टर (पर्सोनेल) आणि कमोडोर संजीव नैय्यर, इन (निवृत्त) डायरेक्टर (शिप बिल्डिंग) तसेच जीएसआरई
आणि भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ही
१०० वी नौका एक इन एलसीयू एल ५६ या नावाची एक लँडिंग क्राफ्ट युटिलिटी (एलसीयू)
नौका असून ही भारतीय नौदलाकडून देण्यात आलेल्या आठ नौकांच्या ऑर्डर मधील सहावी
नौका आहे. एलसीयू चे संपूर्ण डिझाईल
एलसीयू मार्क ४ शीप्स च्या निकषांनुसार असून यांचा पूर्ण विकास हा संपूर्णत:
भारतीय बनावटीने व भारतीय नौदलाच्या निकषांनुसार करण्यात आला आहे. अन्य दोन नौकांचे काम ही वेगाने सुरू आहे. एलसीयू एमके-४ ही नौका उभयचर अशी नौका असून
मुख्य कार्य म्हणजे रणगाडे, अन्य वाहने वाहून नेणे, सेना तसेच नौकांना जमिनीवर
सोडणे तसेच उपकरणे वाहून नेणे यासाठी केले जाते.
ही नौका अंदमान आणि निकोबार विभागात कार्यरत असेल जिथे बहुउद्देशीय कार्य
करण्यासाठी तीचा उपयोग केला जाईल. जसे
बिचींग ऑपरेशन, सर्च ॲन्ड रेस्क्यु ऑपरेशन, आपात्कालीन स्थितीत बाचाव कार्य , रसद पोहोचवणे तसेच
दुरच्या बेटांवर बचाव कार्य करण्यासाठी ही बोट वापरली जाणार आहे. ही एक एलसीयू ६३ मीटर लांब आणि ११ मीटर रूंद
असून ती ८३० टन वजन वाहून नेऊ शकते. तसेच १.७ मीटर खोल अशी ही बोट आहे. हिची गती ही १५ नॉट्स इतकी आहे. एलसीयू चे डिझाईन हे २१६ लोकांना वाहून नेण्यासाठी
करण्यात येत असून यावर स्थानिक स्तरावर विकसित केलेल्या सीआरएन ९१ गन्स लावलेल्या
आहेत. म्हणजे लँडिंग ऑपरेशन्स दरम्यान
आर्टिलरी फायर सपोर्टही ही बोट देऊ शकेल.
बोटीमध्ये इंटिग्रेटेड ब्रिज सिस्टम (आयबीएस) तसेच इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म
मॅनेजमेंट सिस्टम (आयपीएमएस)सारखी अद्ययावत उपकरणे आणि सिस्टम्स बसवण्यात आल्या
आहेत.
मागील आठवड्यात २७ मार्च २०१९ रोजी
जीआरएसई द्वारा ९९ वी युध्दनौका ‘आयईसीजीएस प्रियदर्शनी’ नावाच्या अधुनिक फास्ट
पेट्रोल व्हेसल चे हस्तांतरण भारतीय तटरक्षक दला कडे करण्यात आले. एसआरई ला भारतीय तटरक्षक दलाकडून पाच फास्ट
पेट्रोल व्हेसल्सची ऑर्डर मिळाली आहे आणि आयसीजीएस प्रियदर्शनी यांतील पहिली बोट
आहे. अन्य चार बोटींचे काम प्रगतीपथावर
सुरू आहे. एफपीव्ही ही एक मध्यम आकाराची
बोट असून भारताच्या समुद्री सुरक्षेसाठी उपयुक्त आहे. इंधनाची बचत करण्याबरोबरच
शक्तीशाली मंचा ने युक्त अशी ही बोट अनेक कामात उपयोगी पडू शकते , जसे टेहेळणी
करणे, तस्करी विरोधक, ॲन्टी पोचिंग आणि बचाव कार्य इत्यादी गोष्टींमध्ये उपयुक्त असते. ही बोट ५० मीटर लांब, ७.५ मीटर रूंद आणि ३०८
टनांची आहे. या बोटीचे डिझाईन हे ३४ नॉट्स चे असून १५०० हून अधिक नॉटिकल माईल्स
पर्यंत ही बोट प्रवास करू शकते. यांत ३
मुख्य इंजिने असून त्यांत ॲडव्हान्स्ड कंट्रोल सिस्टम्स,वॉटर जेट युनिट्स आणि इंटिग्रेटेड ब्रिज सिस्टम बरोबर सर्व संभाषण
आणि नेव्हीगेशन उपकरणे लावण्यात आली
आहेत. या बोटीत ४०/६० गन्स मुख्य हत्यार
म्हणून लावण्यात आली असून राहण्यासाठीही यांत ३५ माणसांची वातानुकुलित चेंबर्स
देण्यात आली आहेत.
‘आयसीजीएस प्रियदर्शनी तसेच या
नवीन एलसीयू एल ५६ च्या वितरणामुळे पुन्हा एकदा
जीआरएसई ने देशाच्या सागरी सुरक्षे बद्दल आपली वचनबध्दता अधोरेखित केली
असून देशा कडून मिळालेल्या मिनीरत्न
नावाला साजेसे कार्य केले आहे. यामुळे असे
अधोरेखित होते की जीआरएसई कडे एन्ड टू एन्ड उपाय आपल्या ग्राहकांना देण्याची
क्षमता आहे. यांत संकल्पनेपासून डिझाईन,
सिस्टम इंटिग्रेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांचा समावेश असल्याने ग्राहकांच्या
वाढत्या गरजांनुसार क्षमतांचाही विकास होत आहे.
सध्या जीआरएसई कडे अंदाजे २१,७०० कोटी रूपयांचे मजबूत असे
ऑर्डर बुक आहे ज्यामुळे त्यांच्या कडे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न निर्माण करणारे
प्रकल्प सुध्दा आहेत. ५ प्रकल्प
ज्यांमध्ये ४ सर्व्हे व्हेसल्स (विशाल) सह १४ बोटींची ऑर्डर आहे. या ऑर्डर्स त्यांना स्पर्धात्मक बोलींमधून प्राप्त झाल्या आहेत. या प्रकल्पांचे काम
वेगाने सुरू आहे. सीआरएसई कडून ही सुध्दा घोषणा करण्यात आली की भारतीय नौदलाकडून
त्यांना ८ एसडब्ल्यूएसडब्ल्यूसी तयार करण्यासाठीची ऑर्डरही स्पर्धात्मक बोलीतून प्राप्त झाली आहे.
जीआरएसई चे भारतीय नौदला बरोबर जुने आणि घनिष्ठ संबंध असून
ते गेल्या सहा दशकांपासून आहेत. या
कालावधीत शिपयार्ड कडून भारतीय नौदल तसेच
तटरक्षक दलां करता युध्दनौकांबरोबर अन्य नौका ही बनवून देण्यात आल्या
आहेत. १०० युध्दनौकांतील ६७ बोटी या केवळ
भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आल्या असून त्या विविध आकारांच्या व विविध
कार्यांकरता वापरण्यात येत आहेत. यांत फ्रिगेट्स, मिसाईल कॉर्वेट्स, ॲन्टी सबमरीन वॉरफेअर कॉर्वेट्स, फ्लीट टँकर्स,
लँडिंगशिप टँक, लँडिंग क्राफ्ट युटिलिटी पासून ते सर्व्हे व्हेईकल पर्यंत, ऑफशोअर
पेट्रोल व्हेसल्स आणि फास्ट ॲटॅक क्राफ्ट यांचा समावेश आहे. ही यादी खूपच सर्वसमावेशक अशी आहे. जीआरएसई ने गेल्या दशकाच्या कालावधीत आपल्या
सुविधांच्या अधुनिकीकरणावर जोर दिला आहे आणि आपल शीपबिल्डिंग क्षमता वाढवण्यासाठी
६०७ कोटी रूपयांची गुंतवणूक करत आपली क्षमता ही २० बोटींपर्यंत वाढवण्यात यश
मिळवले आहे.
गेल्या ५९ वर्षांमध्ये जीआरएसई ने ७८० मंचाची निर्मिती केली
असून यामुळे भारतीय नौदन, भारतीय तटरक्षक दल आणि मॉरिशियस सरकार साठी १००
युध्दनौकांचा समावेश आहे. यामुळे आता ते
भारतातील सर्वात अधि युध्दनौका उत्पादक आणि वितरण करणारी भारतातील पहिली शिपयार्ड ठरली आहे. ५ टन बोटींपासून ते २४६०० टन फ्लीट टँकर पर्यंत जीआरएसईने सर्व प्रकारचे काम
केले आहे जेणेकरून भारतातील एक आघाडीची युध्दनौका निर्माती कंपनी बनली आहे.
केवळ २२
महिन्यांच्या कालावधीत (जून १७- मार्च १९) ८ युध्दनौकांची निर्मिती हे
खरोखरच एक अनोखे यश आहे. शिपयार्डच्या
आरॲन्डडी विभागाला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रीयल
रिसर्च कडून (डीएसआरआयआर) प्रमाणन प्राप्त आहे.
त्यांच्या एकात्मिक डिझाईन टिम मध्ये १०० हून अधिक डिझाईन इंजिनियर्स
कार्यरत असून ते वेळोवेळी बोटींसाठी नवीन संकल्पना तसेच भारतीय नौसेना आणि तटरक्षक
दलाच्या भविष्यातील गरजांनुसार काम करत आहेत.
जीआरएसई ने नेहमीच आपली क्षमता वाढवत गुणवत्ता वाढवत मॅरिटाईम इजिनियरींग
क्षेत्रात नवीन उंची गाठली आहे. एक
महत्त्वपूर्ण बोटींचा निर्माता म्हणून प्रगती साध्य करत व्हीओपी मध्ये चार स्तरीय
वाढ पुढील ४-५ वर्षांत वाढवण्याचे लक्ष्य
समोर ठेवले आहे. युध्दनौकांची निर्यात, अधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून नवीन
तंत्रज्ञान ( आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा ॲनेलिसिस)सारख्या
विभागांत काम करत कार्यक्षमता आणि नफ्यात वाढ करण्याची त्यांची योजना आहे. वेळोवेळी संशोधन आणि नाविन्य, उत्पादनाची
चांगली गुणवत्ता, चांगले विचार आणि मजबूत कॉर्पोरेट स्तर यांमुळे मनुष्यबळाचा
विकास पाहता जीआरएसई कडे उज्ज्वल भवितव्य नक्कीच आहे.
Comments
Post a Comment