क्लासिक लिजेंड्स प्रा. लि. च्या #ForeverHeroes उपक्रमाचा भाग म्हणून सिग्नेचर जावा मोटरसायकल्सचा लिलाव
क्लासिक लिजेंड्स प्रा. लि. च्या #ForeverHeroes उपक्रमाचा भाग म्हणून सिग्नेचर जावा मोटरसायकल्सचा लिलाव
या लिलावातून जमा होणारी रक्कम भारतीय सशस्त्र दलातील शहिदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दान करण्यात येणार
30 मार्च 2019 पासून जावा मोटरसायकलची डिलिव्हरी सुरू करत आहोत, ही घोषणा करताना आनंद वाटतो
क्लासिक लिजेंड्स प्रा. लिमिटेडच्या वतीने आज लिलावाच्या माध्यमातून निधी जमा करण्याचा एक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विशेष तयार करण्यात आलेल्या सिग्नेचर जावा मोटरसायकल्स #ForeverHeroes उपक्रमाचा भाग म्हणून लिलावात काढण्यात आल्या. या कार्यक्रमाला भारतीय सशस्त्र दलाचे सहकार्य लाभले. यावेळी लागलेल्या बोलीतून जमा झालेली रक्कम केंद्रीय सैनिक मंडळ, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या सशस्त्र दल ध्वज दिन निधीला सुपूर्द केली जाईल. ज्याचा उपयोग देशासाठी स्वत:चे प्राण आणि कुटुंबीय पणाला लावणाऱ्या शहिदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात येणार आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना क्लासिक लिजेंड्स प्रा लिमिटेडचे सह-संस्थापक आणि फि कॅपिटलचे मनेजिंग पार्टनर श्री. अनुपम थरेजा म्हणाले की, “अलीकडच्या काळात जवानांनी जे साहस दाखवले आहे, त्या सशस्त्र दलातील वीरांना सलाम करण्याची ही अतिशय योग्य वेळ आहे. आज त्यांच्यामुळे देश पुढे चालला आहे. आमचा ‘फॉरएव्हर हिरोज’ उपक्रम म्हणजे जवानांनी बजावलेल्या कामगिरीला वंदन आहे. ही भावना आमच्या नेतृत्व टीमच्या मनात उत्पन्न झाली, सर्व विभागातील कर्मचा-यांनी सहवेदना व्यक्त केल्या – अनेक लोक सशस्त्र दलाशी निगडीत कुटुंबांतील आहेत!”
“या उपक्रमामुळे ग्राहकांनी जो भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे आमचे मन भरून आले. हे वैशिष्ट्य जावा रायडर आणि संपूर्ण मोटरसायकल कम्युनिटीला साजेसे आहे. ग्राहकांमध्ये ही वृत्ती असल्याने आम्ही मोटरसायकल डिलिव्हरी थोडी पुढे ढकलली होती आणि उद्यापासून म्हणजे 30 मार्च 2019 पासून जावा मोटरसायकलची डिलिव्हरी सुरू करत आहोत, ही घोषणा करताना आनंद वाटतो”, असेही ते पुढे म्हणाले.
ज्या सिग्नेचर मोटरसायकल लिलावात समाविष्ट करण्यात आल्या त्यांच्यात काही हटके वैशिष्ट्य आणि लाभ पुढीलप्रमाणे:
- टाकीवर तिरंगी पट्टे, आपल्या देशाच्या लाडक्या वीरांप्रती सन्मान, अभिमान आणि आदराची पोचपावती
- बाईकना वैयक्तिक टच असावा म्हणून पितळी इंधन टाकीवरील बुचावर मालकाच्या नावाचा मोनोग्राम
- जावा विश्वाशी आयुष्यभर संपर्क, बाईकच्या मालकांना विशेष कार्यक्रम, प्रमोशन्स आणि अधिकृत जावा मर्कंडायझिंगचा भाग बनण्याची संधी
- ‘द फॉरएव्हर बाईक’ कॉफी टेबल बुकची कॉपी, जावा मोटरसायकल्सचा आगळावेगळा वारसा आणि परंपरा जपण्याचा अनोखा पर्याय
- डिलिव्हरी दिल्यानंतर 42 महिन्यांच्या कालावधीचे मोफत ‘मर्यादित सर्विस पॅकेज’ सोबत ठरावीक काळासाठी स्टँडर्ड मेंटेनन्स शेड्युल्सअनुसार ग्राहकांसाठी मोफत सर्विस. तरीच या पॅकेजमध्ये अपघाती दुरुस्ती आणि नियम व अटींपलीकडे वॉरंटी टळून गेल्यावर कोणत्याही प्रकारचा अपघाती रिपेअर किंवा सुटे भाग बदलणे यांचा समावेश असणार नाही.
बोली प्रकिया
निधी जमा करण्याचा कार्यक्रम आज मुंबईत संपन्न झाला. ज्यामध्ये निवडक जावा ‘फ्रेंड्स आणि फॅन्स’ना आमंत्रित करण्यात आले होते. देशभरातील इच्छुक खरेदीदारांनी या लिलावात ट्रू टाईम बीड्स बिडिंग प्लॅटफॉर्म ऑनलाईन माध्यमातून सहभाग दर्शवला. इथे कोणालाही बरोबर वेळेत स्वत:ची नोंदणी करून सहभाग नोंदवता येत होता.
लिलावाच्या अधिक माहितीसाठी कृपया लॉग ऑन करा: https://www.jawamotorcycles. com/auction
भारताकरिता तयार असलेले नवीन जावा मॉडेल
जावा: चिरंतन स्टाईल आणि आदर्श व्यक्तिमत्वाची अस्सल जावा नव्या अवतारात तयार आहे. अस्सलता आणि रुबाबदार, घरंदाज, उंची, राजेशाही असा जुना अंदाज घेऊन क्रांतिकारी नव्या रुपात आपला जुना वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे. जावाचे देखणेपण आणि कामात जुनाच अंदाज पुन्हा अनुभवायला मिळणार असला तरीही एकंदर कामगिरीत ती खऱ्या स्वरुपात आधुनिक बाजूही दाखवून देणारी आहे.
जावा फॉर्टी टू: हे क्लासिक प्रकरण सर्व सीमा आणि प्रयोगापलीकडे आहे. हिची डिझाईन धडाकेबाज असून फॉर्टी टू टोन, दणकटपणा, स्पोर्टी आणि सकारात्मक आवृत्तीत पारंपरिकता बाजून सारून असली तरीही म्हणून तिचा जुना रुबाब अजिबात कमी झालेला नाही. नवीन फॉर्टी टू हृदयासोबतच मेंदूवरही अधिराज्य गाजवणारी आहे.
नवीन जावा इंजिन: 293सीसी लिक्विड कूल्ड, सिंगल सिलेंडर डीओएचसी इंजिन 293सीसी लिक्विड कूल्ड, सिंगल सिलेंडर डीओएचसी इंजिन असलेली जावा सर्वोत्तम इटालियन इंजिनिअरिंग-युक्त बांधणीने परिपूर्ण आहे. तिचे रूप नवेकोरे असले तरीही अंदाज तसाच क्लासिक आहे. यामध्ये 27 बीएचपी आणि 28 एनएम टॉर्कचा मिलाफ आहे, ज्यामुळे हिला उदार मिड-रेंज प्राप्त झाली आहे, हिची सपाट टॉर्क कर्व अविश्वसनिय वचनबद्धता, सातत्यपूर्ण शक्तिशाली राईडचा अनुभव देते. हिच्या मुख्य केंद्रासोबत क्लासिक लाईनची लांबी प्रत्येक क्षणी ठसा असलेली ट्वीन एक्झॉस्ट तुमचे प्रेम असलेल्या जावाचा अनुभव करून देते. यामधील इंजिन हे बीएस VI नियमांनुसार बांधले आहे.
नेटवर्क: आपल्या 100+ विक्रेते उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने हा ब्रँड आक्रमक पद्धतीने मार्गक्रमणा करत असून भारतातील 77 शहरांमध्ये सध्या 95 जावा मोटरसायकलस विक्रेते कार्यरत आहेत.
Comments
Post a Comment