संघवी पार्श्वने पहिल्या वर्धापनदिनानिमित्त चर्नी रोड येथे ‘एक्सलेनसी’ प्रकल्पाद्वारे मुंबईमध्ये सादर केला नवा गगनचुंबी आयकॉन

संघवी पार्श्वने पहिल्या वर्धापनदिनानिमित्त चर्नी रोड येथे 
‘एक्सलेनसी’ प्रकल्पाद्वारे मुंबईमध्ये सादर केला नवा गगनचुंबी आयकॉन

जमिनीची प्रचंड चणचण असणाऱ्या शहरामध्ये, नजर जाईल तिथवर दिसणारा समुद्र आणि भलेमोठे घर, हे सुख मोजक्या लोकांनाच मिळते. भारतातील रिअल इस्टेटमधील एक प्रतिष्ठित नाव असणाऱ्या संघवी पार्श्व ग्रुप ऑफ कंपनीजने असाच एक प्रकलप सुरू करण्याची घोषणा केली असून हा प्रकल्प दक्षिण मुंबईतील हवीहवीशी असणारी घरे उपलब्ध करणार आहे. एक्सलेनसी हा अपूर्व अशी विशेष घरे व व्यावसायिक क्षेत्र असणारा 22 मजली लक्झरी टॉवर असणार आहे.

12 एप्रिल रोजी, संघवी पार्श्व ग्रुपने पहिला नवा ब्रँड दाखल केला त्या वेळी ही घोषणा करण्यात आली. संघवी ग्रुप ऑफ कंपनीजची स्थापना 1983 मध्ये झाली असली तरी, भविष्यातील लाइफस्टाइल कम्युनिटी निर्माण करणारी एक प्रगतीशील कंपनी म्हणून संघवी पार्श्व ब्रँड 12 एप्रिल 2018 रोजी दाखल करण्यात आला. गेल्या वर्षी अनेक प्रतिष्ठेचे प्रकल्प पूर्ण केल्यानंतर, संघवी पार्श्वने एक्सलेनसी या एका आकर्षक प्रकल्पाची घोषणा करून या मैलाचा टप्पा साजरा केला.

चर्नी रोडच्या मध्यवर्ती ठिकाणी, राजा राम मोहन रॉय मार्ग या प्रतिष्ठित मार्गावर असलेल्या एक्सलेनसीमुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. या प्रकल्पामध्ये निवडक 3 BHK सी-व्ह्यू अपार्टमेंट असतीलच, शिवाय तितकेच आकर्षक व्यावसायिक क्षेत्रही असेल. एक्सलेनसीमध्ये टेरेसवर अद्ययावत जिम्नॅशिअम व स्विमिंग पूल, तसेच सुंदर लँडस्केप्ड डेक असणार आहे.

खासगी निवासव्यवस्था 11व्या मजल्यापासून 21व्या मजल्यापर्यंत केली जाईल व काही नशीबवान कुटुंबांना त्यामध्ये घर मिळेल. दक्षिण मुंबईतील एका सर्वात लोकप्रिय ठिकाणी वसलेला एक्सलेनसी प्रकल्प सैफी हॉस्पिटल, राजा राम मोहन रॉय हॉस्पिटल, चर्नी रोड स्टेशन, हिंदूजा कॉलेज ऑफ कॉमर्स व मरिन ड्राइव्ह क्वीन्स नेकलेस या ठिकाणांपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहेत.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रमेश संघवी यांनी सांगितले, “आम्ही संघवी पार्श्वची स्थापना केली तेव्हा आलीशन जीवनशैली सहजसाध्य करून देण्याचे उद्दिष्ट होते. भविष्यातील लाइफस्टाइल कम्युनिटी निर्माण करण्यासाठी, आम्ही डिझाइन, पायाभूत सुविधा व आरामादायीपणा यांचा पूर्णपणे नव्याने विचार केला आहे. उत्कृष्ट ठिकाण, सी-व्ह्यू व कमालीची प्रमाणके अशा वैशिष्ट्यांमुळे एक्सलेनसी आमचे उद्दिष्ट आणखी उंचीवर नेणार आहे. विकास करता येतील, अशी मोठी ठिकाणे फार कमी उरली असून, एक्सलेनसी हा दक्षिण मुंबईतला वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प ठरणार आहे. संघवी पार्श्वच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण असणार आहे. या प्रकल्पाच्या ग्राहकांना उज्ज्वल व समृद्ध भविष्याची अपेक्षा निश्चितच करता येईल.”

एक्सलेनसी हा आमचा एक सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, तसेच मुंबईत बांधला जाणारा एक दुर्मिळ रिअल इस्टेट प्रकल्प असणार आहे. त्यामध्ये संघवी पार्श्व ग्रुपची ओळख असणारे विशिष्ट नियोजन, फिटिंग्ज व त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, वेळेवर प्रकल्प पूर्ण करण्याची बांधिलकी व प्रत्येक कायद्याचे पालन करणारे सुस्पष्ट हस्तांतर ही वैशिष्ट्ये असणार आहेत. एक्सलेनसीचा विकास सध्या सुरू आहे आणि हा प्रकल्प वेळेवर पूर्ण होईल व नेहमीप्रमाणेच, आम्ही आश्वासन केल्याप्रमाणे रहिवाशांना व कार्यालय मालकांना वेळेत त्यांची जागा सुपुर्द केली जाईल, अशी आमची अपेक्षा आहे.”

कार्यकारी संचालक वामा संघवी म्हणाल्या, “गेल्या काही दशकांमध्ये संघवी ग्रुप ऑफ कंपनीजनी प्रगती केली आहे आणि बदलत्या काळानुसार झटपट जुळवून घेतले आहे. केवळ सध्याच्या काळाबरोबर मेळ साधण्यासाठीच नाही, तर भविष्याला आकार देण्यासाठीही संघवी पार्श्वची निर्मिती झाली. सीमा संघवी वेल्फेअर फाउंडेशनच्या निमित्ताने संघवी पार्श्वने सामाजिक दृष्टिकोनातून अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. आणि आता एक्सलेनसीच्या निमित्ताने आम्ही हे व्रत पुढेही सुरू ठेवणार आहोत. गेल्या वर्षात आम्ही साध्य केलेल्या सर्व बाबींसाठी आणि भविष्यात प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व बाबींसाठी संपूर्ण टीमला, विशेषतः नेतृत्वाला अतिशय अभिमान वाटतो.”

कार्यकारी संचालक प्रार्थना संघवी यांनी सांगितले, “संघवी पार्श्वमधील युवा नेतृत्वाचा भाग म्हणून, कंपनीने जुन्या मूल्यांची उत्तम सांगड नव्या पिढीच्या तत्परतेशी घातली असल्याचे जाहीर करताना अतिशय आनंद होतो. मुंबईतील गृहिणींना त्यांच्या घरामध्ये काय काय हवे आहे, हे विचारले तर एक्सलेनसीमध्ये असलेली प्रत्येक गोष्ट. ही केवळ गेटेड कम्युनिटी नाही. हा प्रकल्प दक्षिण मुंबईतील लोकप्रिय ठिकाणी आलिशान जीवनशैलीची संधी देणार आहे. संघवी पार्श्वमध्ये असल्याप्रमाणे, प्रकल्पाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा विचार व ग्राहकांची काळजी आहे. हा प्रकल्प कधी पूर्ण होईल व एक्सलेनसीमध्ये आपले घर बघणाऱ्या कुटुंबांचे आम्ही कधी स्वागत करू, अशी घाई आम्हाला झाली आहे.”

संघवी ग्रुप ऑफ कंपनीजने गेल्या 35 वर्षांत 72 प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. 18,000 हून अधिक कुटुंबांना हे प्रकल्प म्हणजे आपले घर वाटते, जीवनातीले स्वप्ने व उत्पन्न या गोष्टी त्यांनी विश्वासाने ग्रुपच्या प्रकल्पांमध्ये गुंतवली आहेत. सातत्याने उत्तम कामगिरी व त्यास आधुनिक कल्पना व अंमलबजावणी यांचे असलेले पाठबळ, यामुळे संघवी पार्श्व ग्रुप ऑफ कंपनीजला संघवी गोल्डन सिटीसाठी 32व्या नॅशनल रिअल इस्टेट अॅन्युअल अॅवॉर्ड्समध्ये “बेस्ट अफोर्डेबल हौसिंग प्रोजेक्ट, 2017” या पुरस्काराने गौरवण्यात आले आणि 2018 मध्ये संघवी ज्वेलला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयकॉनिक कमर्शिअल प्रोजेक्ट – वेस्टर्न मुंबई पुरस्काराने गौरवण्यात आले.

एक्सलेनसीच्या निमित्ताने, संघवी पार्श्व ग्रुप ऑफ कंपनीजने मुंबई व उनगरांत महत्त्वाचे प्रकल्प निर्माण केल्यावर आणि महाराष्ट्रभर आपला ठसा उमटवल्यावर दक्षिण मुंबईमध्ये झेप घेतली आहे. त्यामुळे, तुम्हाला घरातून अथांग समुद्र दिसेल आणि इच्छित जीवनशैली असेल, असे घर हवे असेल तर एक्सलेनसी हे आदर्श ठिकाण आहे. फोन उचला आणि संघवी पार्श्व ग्रुप ऑफ कंपनीजशी बोलून आजच खास तुमच्यासाठी वेळ निश्चित करून घ्या. अशी संधी तुम्हाला पुन्हा मिळेलच असे नाही!

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy