आयसीआयसीआय सिक्युरिटीज वितरित करणार रेलिगेयर विमा उत्पादने
आयसीआयसीआय सिक्युरिटीज वितरित करणार रेलिगेयर विमा
उत्पादने
भारतातील आघाडीची आर्थिक उत्पादने वितरक आयसीआयसीआय सिक्युरिटीजने (आय-
सेक) आघाडीची आरोग्य विमा कंपनी रेलिगेयर हेल्थ इन्शुरन्सशी करार केला असून
त्यानुसार कंपनी www.icicidirect.com या आपल्या पुरस्कार विजेत्या व्यासपीठाद्वारे तसेच देशभरात पसरलेल्या २००
पेक्षा जास्त रिटेल दालनांद्वारे रेलिगेयरची उत्पादने विकणार आहे. आय- सेक
व्यासपीठावर समाविष्ट झालेली ही तिसरी जीवन विमा प्रिन्सिपल कंपनी, तर पहिली पूर्ण
आरोग्य विमा कंपनी आहे.
या कराराविषयी श्री.
हरीहरन एम. वरिष्ठ उपाध्यक्ष – उत्पादन सल्लागार समूह, आयसीआयसीआय सिक्युरिटीज
म्हणाले, ‘आम्ही सातत्याने आमच्या ग्राहकांना गुंतवणूक आणि सुरक्षा उत्पदने पुरवत असत.
आमच्या व्यासपीठावर रेलिगेयर हेल्थ इन्सुरन्स समाविष्ट झाल्याचा आम्हाला आनंद
वाटतो आणि मला खात्री आहे, की आमच्या ४.४ दशलक्ष ग्राहकांना आरोग्य विमा योजना
खरेदी करताना याचा चांगला वापर होईल.’
श्री. अनुज गुलाटी,
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रेलिगेयर हेल्थ इन्शुरन्स
म्हणाले, ‘ग्राहकांना नाविन्यपूर्ण आरोग्य विमा उत्पादने, दर्जेदार सेवा आणि त्यांच्या
पैशांचे पुरेपूर मूल्य देण्यावर आम्ही कायम भर दिला आहे. आयसीआयसीआय
सिक्युरिटीजबरोबर केलेल्या या भागिदारीची संभाव्य क्षमता आम्हाला माहीत आहे आणि
त्यांच्या ग्राहकांची पसंतीची आरोग्य विमा कंपनी बनण्यास आम्ही उत्सुक आहोत.’
भारतातील आरोग्य विमा वापराचे प्रमाण अतिशय कमी
म्हणजेच एक आकडी असून या क्षेत्राचे एकूण आकारमान प्रती वर्ष अंदाजे ५० हजार कोटी
आहे. मात्र, वेगाने वाढती जागरूकता, खास आरोग्य विमा कंपन्यांचा प्रवेश अशा विविध कारणांमुळे
गेल्या १० वर्षांत या क्षेत्राचा सीएजीआर २० टक्क्यांनी वाढला आहे.
आय- सेक ही देशातील आघाडीची आर्थिक उत्पादन
वितरत असून ती म्युच्युअल फंड्स, जीवन आणि सर्वसामान्य विमा, एनपीएस, कॉर्पोरेट
एफडीज, सॉव्हेरियन गोल्ड बाँड्स, ईटीएफ अशी उत्पादने विकते. कंपनी आपल्या
संकेतस्थळावर तसेच ऑफलाइन चॅनेल्सद्वारे ही उत्पादने विकते. आय- सेक ही
उत्पन्नाच्या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नॉन- बँक एमएफ वितरक
असून तिच्या नेटवर्कमध्ये ७५ शहरांतील २०० आयसीआयसीआय डायरेक्ट शाखा, ७१०० सब-
ब्रोकर्स, अधिकृत व्यक्ती, आयएफएज आणि आयएज तसेच ३७५० आयसीआयसीआय बँक शाखांचा
समावेश होतो.
Comments
Post a Comment