प्रिन्सिपल म्युच्युअल फंड सादर करत आहेत प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंड
प्रिन्सिपल म्युच्युअल फंड सादर करत आहेत प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंड
एनएफओ कालावधी - २२ एप्रिल - ६ मे २०१९
इथे उपलब्ध:
मुंबई , 30 एप्रिल २०१९: प्रिन्सिपल म्युच्युअल फंडाने आज प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडसाठी त्यांच्या न्यू फंड ऑफर (एनएफओ) सादर करत असल्याची घोषणा केली. ही ओपन एंडेड (खुली योजना) इक्विटी स्कीम मुख्यत्वे स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करणार आहे. या योजनेद्वारे दीर्घकाळात अधिक परतावा देऊ शकण्याची क्षमता असणाऱ्या छोट्या कंपन्यांना शोधून त्यात गुंतवणूक केली जाणार आहे. हा एनएफओ आज, २२ एप्रिल रोजी खुला झाला असून ६ मे २०१९ पर्यंत खुला राहणार आहे.
प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडात स्मार्ट ट्रिगर एनेबल्ड प्लॅन (एसटीईपी-स्टेप) आणि ऑटो ट्रिगर अशा सुविधा आहेत. बाजारपेठेत काळानुसार येणारे धोके कमी करण्यासाठी बहुविध प्रकारे गुंतवणूक करून बाजारपेठेत प्रचंड पडल्यास गुंतवणूकदारांना संरक्षण देण्याचा उद्देश स्टेपमध्ये ठेवण्यात आला आहे. स्टेपही खास सुविधा आहे. ही सुविधा फक्त एनएफओ कालावधीतच उपलब्ध असेल.
स्टेप सुविधेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना प्रिन्सिपल स्मॉल कॅपमधील त्यांची गुंतवणूक चार समान मासिक हप्त्यांमध्ये विभागता येईल. त्यामुळे गुंतवणूक रकमेतील फक्त २५ टक्के रक्कम थेट प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडात गुंतवली जाईल आणि उर्वरित ७५ टक्के रक्कम प्रिन्सिपल कॅश मॅनेजमेंट फंडात गुंतवली जाईल. समभाग वितरित केल्यानंतर बाजारपेठ ३ टक्क्यांनी घसरल्यास स्टेप कार्यरत होईल आणि सुरुवातीच्या गुंतवणुकीतील २५ टक्के रक्कम आपोआप प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडात टाकली जाईल.बाजारभावात कोणताही बदल झाला नाही, तर हा व्यवहार पुढील महिन्याच्या अखेरीस केला जाईल आणि प्रिन्सिपल कॅश मॅनेजमेंट फंडातून गुंतवणूक प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडात टाकली जाईल.
ऑटो ट्रिगरमध्ये गुंतवणूकदाराला परताव्याचा लक्ष्यित दर निश्चित करता येतो. हा दर गाठला गेल्यानंतर वाढलेली रक्कम आपोआप इतर फंडांमध्ये टाकली जाते.गुंतवणूकदार आपल्या स्मॉल कॅप्समधील गुंतवणुकीत समतोल साधण्यासाठी ही सुविधा वापरू शकतात.
या सादरीकरणाबद्दल प्रिन्सिपल म्युच्युअल फंडाच्या इक्विटीचे प्रमुख श्री. पीव्हीके मोहन म्हणाले, "दीर्घकाळ गुंतवणुकीत संपत्ती निर्माण करणारे साधन ठरण्याची क्षमता स्मॉल कॅप्स फंडात आहे. मोठ्या संघटित क्षेत्रातील त्यांचा वापर त्यांना व्याप्ती वाढवण्याची संधी देतो. शिवाय, लार्ज आणि मिड कॅप समभागांची मर्यादित उपस्थिती असलेल्या क्षेत्रातील कंपन्या हा एक वाढीव फायदा आहे. त्याचप्रमाणे, प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंड चार भागांमध्ये केली जात असल्याने स्टेप सुविधा गुंतवणूकदाराला बाजारपेठीतील अनिश्चिततेविरोधात संरक्षण देते."
किमान अर्ज रक्कम:
- नवे गुंतवणूकदार : ५०००/- रु, डिव्हिडंड, ग्रोथ पर्याय आणि कोणत्याही रकमेसाठी
- त्यानंतर प्रत्येक प्लॅन/ऑप्शनप्रमाणे
- स्टेप (फक्त एनएफओ काळात उपलब्ध) - २५०००/- रु
- सिस्टमॅटिक इन्वहेस्टमेंट प्लॅन: प्रत्येकी ५००/- रुपयांचे किमान १२ हप्ते
- सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन: प्रत्येकी १०००/- रुपयांचे किमान ६ हप्ते
- रेग्युलर विड्रॉवल प्लॅन: प्रत्येकी ५००/- रुपयांचे किमान ६ हप्ते
Comments
Post a Comment