डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सवात पद्मभूषण पंडिता डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन
डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सवात पद्मभूषण पंडिता डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन
डॉ. वसंतराव देशपांडे संगीत सभेचे प्रमुख विश्वस्त पं. चंद्रकांत लिमये व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केन्द्र, नागपुर (संस्कृति मंत्रालय भारत सरकार) यांच्या संयोगाने दि. ५ मे२०१९ रोजी वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सवच्या शुभारंभाचा सोहळा रविंद्र नाट्य मंदीर येथे संध्याकाळी ५ ते रात्रौ १० या वेळेत आयोजित केला आहे.
यावेळी 'वसंत बहार' हा डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. दृकश्राव्य माध्यमातून उलगडणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या बंदीशी, ठुमरी, नाट्यगीत, चित्रपटगीत, इत्यादी गीतप्रकार पं. चंद्रकांत लिमये आपल्या गुरुकुलातील शिष्यांसह सादर करणार आहेत. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या तरुण गायिका श्रीमती नुपूर काशीद- गाडगीळ व पद्मभूषण पंडिता प्रभा अत्रे यांच्या गायनाचा आनंद रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रमजन्मशताब्दी निमित्त सर्व रसिकांसाठी विनामुल्य ठेवला आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील महान गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते, ज्यांनी आपल्या अद्वितीय, अविस्मरणीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेते डॉ. वसंतराव देशपांडे. ज्यांनी शास्त्रीय संगीत, ठुमरी, नाट्यसंगीत, चित्रपट संगीत या सर्व गान प्रकारांवर आपल्या गायकीचा अमीट ठसा उमटवला. असे आपल्या सर्वांचे लाडकेव्यक्तीमत्व डॉ वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर, बेळगाव, गोवा इत्यादी ठिकाणी संस्थेच्या वतीने वर्षभरमहाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त "नक्षत्र वसंत" ही विशेष स्मरणिकाही महोत्सवाच्या उद्घाटनसमारंभात प्रकाशित केली जाणार आहे.
यावेळी माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी, पं. शंकर अभ्यंकर, पं. सत्यशील देशपांडे, श्रीमती फैयाज, श्री. अच्युत गोडबोले, माजी पोलीस आयुक्तअरविंद इनामदार, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून ते डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या आठवणी जागृत करणार आहेत.
Comments
Post a Comment