जीआरएसई ला मिळाले भारतीय नौदला करता ८ ॲन्टी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट्स (एएसडब्ल्यूएसडब्ल्यूसीज) तयार करण्याचे कंत्राट
जीआरएसई ला मिळाले भारतीय नौदला करता ८ ॲन्टी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट्स (एएसडब्ल्यूएसडब्ल्यूसीज) तयार करण्याचे कंत्राट
अतिशय स्पर्धात्मक अशा वातावरणात, जीआरएसई च्या शिपयार्ड ला यशस्वीपणे ८ ॲन्टी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट्स (एएसडब्ल्यूएसडब्ल्यूसीज) चे डिझाईन, बांधकाम आणि पुरवठा करण्याचे कंत्राट भारतीय नौदलाकडून प्राप्त झाले.
एप्रिल २०१४ मध्ये डीपीएसयू शिपयार्ड्स आणि भारतीय खाजगी शिपयार्ड करता भारतीय नौदलाने आरएफपी काढली होती व त्यांत जीआरएसई ने यशस्वी बोली लावली आहे. या कंत्राटावर गार्डनरीच शिपबिल्डर्स ॲन्ड इंजिनियर्स लिमिटेड (जीआरएसई) तसेच भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून २९ एप्रिल २०१९ रोजी स्वाक्षरी करण्यात आली. या ८ नौकांच्या बांधणीसाठी असलेल्या या कंत्राटाचे मुल्य हे रू ६३११.३२ कोटी आहे यांतील पहिली नौका कंत्राटावर स्वाक्षरी करण्यात आलेल्या दिवसापासून ४२ महिन्यांत द्यायची असून उर्वरीत नौकांची डिलिव्हरी दरवर्षी दोन बोटी या प्रमाणे द्यायच्या आहेत. हा संपूर्ण प्रकल्प स्वाक्षरी केल्यापासून ८४ महिन्यांत पूर्ण करायचा असून जीआरएसई कडे सध्या भारतीय नौदला च्य पी१७ प्रकल्पाअंतर्गत ३ स्टेल्थ फ्रिगेट्स , भारतीय नौदलाकरता एएसडब्ल्यू कॉर्वेट्स, भारतीय नौदलाच्या एलसीयूज, भारतीय नौदलाच्या चार सर्व्हे व्हेसल्स आणि भारतीय तटरक्षक दलासाठी एफपीव्हीज इत्यादी प्रकल्पांचे काम सुरू आहे.
जीआरएसई ही देशांतील पहिली युध्दनौका तयार करणारी भारतीय कंपनी असून त्यांनी १९६० मध्ये डीपीएसयू म्हणून काम सुरू केल्यापासून आजपर्यंत सर्वांधिक युध्दनौकांची बांधणी केली आहे. जीआरएसई द्वारे आजपर्यंत १०० युध्दनौकांची बांधणी केलेली असून त्यांत अधुनिक फ्रिगेट्स पासून ॲन्टी सबमरीन वॉरफेअर कॉर्व्हेट्स, फ्लीट टँकर्स, फास्ट ॲटॅक क्राफ्ट्स इत्यादींचा समावेश आहे. त्याचबरोबर शिपयार्ड कडे प्रथमच सर्वोत्कृष्ट नाविन्य आणि डिझाईन देण्याचे कौशल्य आहे. सध्याच्या प्रकल्पा मुळे जीआरएसईची बाजारपेठेतील प्रतिमा सुधारण्याबरोबरच एएसडब्ल्यूएसडब्ल्यूसी युध्दनौकांची बांधणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तसेच चांगले डिझाईन देण्याची शिपयार्ड ची क्षमता अधोरेखित करण्यावर होणार आहे.
या ॲन्टी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट्स चे डिझाईन ७५० टनाच्या खोलवर डिस्प्लेसमेंट्स साठी करण्यात येत असून याची गती ही २५ नॉट्स तसेच कम्पलिटमेंट ५७ इतकी आहे, या बोटी समुद्राच्या तटाचे संरक्षण व देखरेख करण्यासाठी उपयुक्त असून एसएयू व सुसज्ज पध्दतीने विमानांबरोबर एएसडब्ल्यू कार्य करण्यासाठीही उपयुक्त आहेत. त्याचबरोबर या बोटींची क्षमता ही थेट/ अप्रत्यक्षपणे समुद्रतटाच्या पाण्याचे रक्षण व हल्ला करण्याचीही आहे. त्याच बरोबर शोधमोहिम आणि बचावकार्यातही यांचा उपयोग होऊ शकतो. तसेच घुसखोरी करणार्या विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच समुद्रात स्फोटके पेरण्यासाठीही यांचा उपयोग होऊ शकतो.
या नौकांमध्ये अधुनिक अशी इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम असून यामध्ये पर्पल्शन मशीनरी, ऑक्झिलरी मशीनरी, पावर जनरेशन आणि वितरण मशीनरी तसेच डॅमेज कंट्रोल मशीनरी इत्यादींचा समावेश आहे.
या युध्दनौका या क्लासिफिकेशन सोसायटी रूल्स आणि नेव्हल शिप रेग्युलेशन्सच्या निकषांनुसार असतील आणि त्या अधुनिक अशा मारपोल (मरीन पोल्युशन) स्टॅन्डर्ड्स ऑफ इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन (आयएमओ) तसेच सेफ्टी ऑफ लाईफ ॲट सी (सोलास) च्या निकषांनुसार तयार करण्यात येणार आहेत.
या युध्दनौकांचे डिझाईन आणि बांधकाम हे जीआरएसई कडून केले जात असल्याने भारत सरकारच्या मेक इन इंडियाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कंपनी कडून केले जात आहे.
Comments
Post a Comment