एचसीएलच्या टेकबी प्रोग्रामतर्फे 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वेळेपूर्वीच करियर संधी
एचसीएलच्या टेकबी प्रोग्रामतर्फे 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वेळेपूर्वीच करियर संधी
~ लवकर उत्पन्न कमवा – तुमच्या आयुष्याचा ताबा मिळवा~
टेकबी, एचसीएलचा अर्ली करियर प्रोग्राम आहे. हा एक कामकाज-आधारित उच्च शिक्षण अभ्यासक्रम आहे, जो सरकारच्या "कौशल्य भारत" अभियानात योगदान देतो. एचसीएल'चा10+2 विद्यार्थ्यांसाठीच्या न्यू पीपल स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना भविष्यात आवश्यक असणाऱ्या कौशल्याने सज्ज करत त्यांना आयटी इंजिनिअरिंग नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात येतात. हा प्रोग्राम विद्यार्थ्यांना एचसीएलमधील एन्ट्री लेव्हल- आयटी जॉब्सकरिता तांत्रिक व व्यावसायिकदृष्ट्या सज्ज करतो. सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याकरिता विद्यार्थ्यांना 12 महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. एचसीएलसाठी काम करताना विद्यार्थ्यांना मास्टर्स इन आयटी प्रोग्रामसाठी प्रवेश घेता येईल. हे अभ्यासक्रम बिट्स पिलानी आणि SATRA युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतील.
ज्या विद्यार्थ्यांना या प्रोग्राममध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांना 12 वी परीक्षेत गणित हा अनिवार्य विषय घेऊन किमान 60% मिळवणे अपेक्षित आहे.
- सगळीकडील एचसीएल कार्यालयांत दर आठवड्याच्या शेवटी प्रवेश चाचणी घेतली जाते आहे. जुलै 2019च्या अखेरीस प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.
- महाराष्ट्रासाठी ट्रेनिंगचे ठिकाण नागपूर राहील तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानकरिता ट्रेनिंग ठिकाण हे नोयडा असेल.
- पात्र उमेदवार वेबसाईटवरून प्रवेश घेऊ शकतात - https://www.hcltechbees.com/
enroll-form/. टप्प्यानुसार प्रक्रियेच्या माहितीचे मार्गदर्शन एचसीएल प्रशिक्षण आणि कर्मचारी सेवांद्वारे मिळवता येईल.
ज्या विद्यार्थ्यांना या प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांना प्रवेश चाचणी द्यावी लागणार आहे. त्यांना ग्रुप सेशन किंवा वैयक्तिक आधारावर पालकांसमवेत कौन्सेलिंग करून घ्यावे लागेल. या सेशन दरम्यान विद्यार्थ्यांना प्रोग्रामची सविस्तर माहिती दिली जाईल. या प्रोग्राममध्ये वर्गातील प्रशिक्षण आणि ऑन-जॉब ट्रेनिंग यांचा संयोग राहील. ज्यामुळे विद्यार्थी आत्मनिर्भरतेने प्रोग्राम पूर्ण करतील. प्रशिक्षणाचा संपूर्ण कालावधीत, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मासिक रु. 10,000 चे स्टायपेंड मिळणार आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना एचसीएल टेक्नॉलॉजीजचे एक्झिक्यूटीव्ह वाईस प्रेसिडेंट आणि एचसीएल न्यू विस्टाजचे प्रोग्राम डायरेक्टर श्री संजय गुप्ता म्हणाले की, "12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लवकर करिअर सुरू करण्याची संधी मिळावी या उद्देशाने एचसीएलच्या टेक बी प्रोग्रामकरिता प्रवेश खुला करण्यात आल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होतो आहे. आम्ही 2017 मध्ये हा प्रोग्राम सुरू केला आणि मिळालेला प्रतिसाद अतिशय प्रोत्साहन देणारा आहे. या प्रोग्रामसह एचसीएल'ला सर्वोत्तम प्रतिभा नियुक्त करण्याचे उद्दिष्ट्य आहे, ज्यामुळे कारकिर्दीची सुरुवात करताना आर्थिक स्वातंत्र्य विद्यार्थ्याकडे राहील. एचसीएलने या प्रोगामकरिता अग्रगण्य विद्यापीठांसोबत भागीदारी केली असल्याने विद्यार्थ्यांना नामांकित विद्यापीठातून पदवी मिळवता येणार आहे. 12वी उत्तीर्ण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी या प्रोग्रामला प्रवेश घ्यावा असे मी सुचवतो आहे. ज्याद्वारे त्यांना एचसीएलसोबत ग्लोबल आयटी करिअर सुरू करता येईल.".
अर्ली करियर ट्रेनिंग प्रोग्रामसह कंपनी सध्याच्या आणि भविष्यातील क्लायंटकरिता प्रतिभावंत कर्मचारी नियुक्त करेल.
अजूनपर्यंत, 500 हुन अधिक विद्यार्थ्यांनी प्रोग्राममध्ये सहभाग घेतला आहे आणि पहिली बॅच अगोदरच एचसीएलमध्ये यशस्वीरित्या नियुक्त करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- नोकरी पहिल्यांदा - एचसीएल या अग्रगण्य आयटी कंपनीसमवेत काम करण्याची हमी
- आर्थिक स्वातंत्र्य – पहिल्या महिन्यापासून स्टायपेंड सुरू झाल्याने आर्थिक स्वातंत्र्य
- उच्च शिक्षण - भारताच्या नामंकित तांत्रिक संस्था, बिट्स पिलानी आणि SASTRA युनिव्हर्सिटीमधून पदवी मिळवा
- टेकबी – एचसीएल'च्या अर्ली करिअर प्रोग्राममध्ये खालील टप्पे समाविष्ट आहेत:
o फाउंडेशन ट्रेनिंग प्रोग्राम – नियुक्तीसाठी सज्ज प्रतिभावंत तयार करण्यासाठी टेक्निकल फाउंडेशन ट्रेनिंग
o टेक्नोलॉजी / डोमेन ट्रेनिंग – विशिष्ट क्षेत्र प्रशिक्षण नेमून दिलेल्या भूमिकेसाठी आवश्यक सर्व कौशल्ये अवगत करण्याची हमी घेते.
o रोल स्पेसिफिक ट्रेनिंग (भूमिकानिहाय प्रशिक्षण) – व्यावसायिक सराव कालावधीत नेमून दिलेल्या प्रकल्पावर प्रत्यक्ष काम करण्याची संधी
- उमेद्वारांना माहिती तंत्रज्ञान (आयटी), आवश्यक सॉफ्टवेयर टूल्स, प्रक्रिया आणि जीवनावश्यक कौशल्ये देखील या 12 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत शिकून घेता येतील.
- प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर उमेदवारांना एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अॅप्लिकेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट, टेस्टींग व सीएडी सपोर्ट क्षेत्रात प्रतिष्ठित प्रकल्पांत काम करण्याची संधी
- आर्थिक साह्य पुरवण्यात आल्याने पालक किंवा विद्यार्थ्यांवर आर्थिक ताण पडणार नाही. प्रोग्राम शुल्कावर 100% माफी (प्रशिक्षणात तुम्ही 90% आणि त्यावर गुण मिळवल्यास) तसेच 50% शुल्क माफी (तुमच्या प्रशिक्षणात 85-90% दरम्यान गुण मिळवल्यास).
- पात्र ठरण्यासाठी, उमेदवाराला बोर्डात (सीबीएसई/ आयसीएसई/ एनआयओएस बोर्ड/ उत्तर प्रदेश/ पंजाब/ राजस्थान/ उत्तराखंड/ हरियाणा/ महाराष्ट्र/ तामिळनाडू/ आंध्र प्रदेश/ कर्नाटक/ मध्य प्रदेश राज्य मंडळे) किमान 60% टक्के मिळाले पाहिजेत.
- सगळीकडील एचसीएल कार्यालयांत दर आठवड्याच्या शेवटी प्रवेश चाचणी घेतली जाते आहे. जुलै 2019च्या अखेरीस प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.
- महाराष्ट्रासाठी ट्रेनिंगचे ठिकाण नागपूर राहील तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानकरिता ट्रेनिंग ठिकाण हे नोयडा असेल.
- पात्र उमेदवार वेबसाईटवरून प्रवेश घेऊ शकतात - https://www.hcltechbees.com/
enroll-form/. टप्प्यानुसार प्रक्रियेच्या माहितीचे मार्गदर्शन एचसीएल प्रशिक्षण आणि कर्मचारी सेवांद्वारे मिळवता येईल.
Comments
Post a Comment