फोक्सवॅगन ग्रुपतर्फे 'स्कोडा २.०' प्रकल्पाअंतर्गत पुण्यात 'टूल्स लायब्ररी'चे उद्घाटन
फोक्सवॅगन ग्रुपतर्फे 'स्कोडा २.०' प्रकल्पाअंतर्गत पुण्यात 'टूल्स लायब्ररी'चे उद्घाटन
· फोक्सवॅगन ग्रुप इंडियाच्या 'टूल्स लायब्ररी'मध्ये ग्रुपतर्फे ब्रँडच्या वस्तू वापरण्याचा अनुभव अधिक समृद्ध करण्यावर भर दिला जाणार
· स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन आणि ऑडीच्या २२० हून अधिक फोक्सवॅगन ग्रुप डीलर भागीदायांना पाठबळ देण्यासाठी अनोखा उपक्रम
· भारतातील फोक्सवॅगन ग्रुपने या लायब्ररीची अत्याधुनिक सुविधा उभारण्यासाठी गुंतवणूक केली आहे आणि साधने व उपकरणांचा कमाल साठा या लायब्ररीमध्ये करता येईल
फोक्सवॅगन ग्रुप इंडियाने महाराष्ट्रात पुण्यातील आपल्या उत्पादन केंद्राच्या जवळ 'टूल्स लायब्ररी'चे उद्घाटन केले. गाडी बाळगण्याचा अनुभव अधिक वृद्धिंगत करण्याची आपली बांधिलकी अधिक ठळक करत या अनोख्या 'टूल्स लायब्ररी'च्या माध्यमातून देशभरातील २२० हून अधिक फोक्सवॅगन ग्रुप वितरक भागीदारांना साह्य केले जाईल. आवश्यकता भासल्यास कधीही वितरकांना स्पेशलाइज्ड टूल्स आणि इक्विपमेंट वापरण्यासाठी घेता येणार आहेत. ३०० किमीच्या परिसरातील फोक्सवॅगन ग्रुपच्या वितरकांना प्रमाणित टूल्स/इक्विपमेंट मागणी नोंदवल्यानंतर ६ तासांच्या आत मिळतील. तर, ३०० किमी. परिघाबाहेरील वितरकांना २४ ते ३६ तासांत साधने उपलब्ध होतील. स्कोडा ऑटो, फोक्स्वॅगन आणि ऑडी या फोक्सवॅगन ग्रुपच्या ब्रँड्सना ठराविक वेळेत आपल्या ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे या उपक्रमामुळे शक्य होणार आहे.
फोक्सवॅगन ग्रुप इंडिया 'टूल्स लायब्ररी'चे उद्घाटन स्कोडा ऑटोचे डायरेक्ट आफ्टरसेल्स श्री. रोमन हॅवलासेक, फोक्सवॅगन ग्रुप सेल्स इंडिया प्रा. लि.चे डायरेक्टर ग्रुप आफ्टरसेल्स श्री. जस्टिन नोल्टे आणि फोक्सवॅगन ग्रुपचे इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते झाले.
स्कोडा ऑटोचे डायरेक्टर आफ्टरसेल्स श्री. रोमन हॅवलासेक म्हणाले, "सहअनुभूती, वेग, दर्जा आणि पारदर्शकतेसह आमच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी अत्याधुनिक सुविधा केंद्र उभारण्याचा आमचा उद्देश होता. 'इंडिया २.०' प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात आलेली फोक्सवॅगन ग्रुपची 'टूल्स लायब्ररी' वर्कशॉप्स/डीलरशीप्समध्ये योग्य वेळेत, योग्य प्रमाणात योग्य साधने आणि उपकरणे उपलब्ध होतील, याची खातरजमा करेल."
फोक्सवॅगन ग्रुप 'टूल्स लायब्ररी' हा 'इंडिया २.०' प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा टप्पा आहे. फोक्सवागन ग्रुप इंडियाने टूल्स लायब्ररी उभाण्यासाठी आणि त्यात योग्य साधने व उपकरणांचा साठा करण्यासाठी तब्बल १७ दशलक्ष रुपयांची गुंतवणूक केली आहे. जुलै २०१८ मध्ये, फोक्सवॅगन ग्रुपने 'इंडिया २.०' प्रकल्पात ७९०० कोटी रुपयांची (१ अब्ज युरो) गुंतवणूक जाहीर केली होती. या गुंतवणुकीतून भारतीय बाजारपेठेसाठी स्कोडा ऑटो आणि फोक्सवॅगन गाड्यांचा विकास केला जाणार आहे.
या टेक्नॉलॉजी सेंटरच्या रुपाने फोक्सवॅगन ग्रुपने भारतीय उपखंडातील ग्राहकांच्या गरजांसाठी खास स्थानिक सब-कॉम्पॅक्ट एमक्यूबी एओ आयएन व्यासपीठावर आधारित उत्पादनांच्या विकासाचा पाया रचला आहे. स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन, ऑडी, पोर्शे आणि लम्बोर्गिनी चिन्हांअंतर्गत भारतात उपलब्ध सर्व मॉडेल्सना अस्सल सुट्या भागांचा जलद पुरवठा करण्याच्या उद्देशाने पुण्यातील रीजनल डिस्ट्रिब्युशन सेंटरचा शुभारंभ करण्यात आला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सुट्या भागांचे विश्लेषण आणि उत्पादन विकास यासाठी येथे केंद्रीभूत वॉरंटी पार्टस् रीटर्न सेंटर(डब्ल्यूपीआरसी)चेही उद्घाटन करण्यात आले होते.
फोक्सवॅगन ग्रुप इंडिया बाबतः फोक्सवॅगन ग्रुपचे प्रतिनिधित्व भारतातील पाच पॅसेंजर कार ब्रँडद्वारे केले जातेः ऑडी, लॅम्बॉर्गिनी, पोर्शे, स्कोडा आणि फोक्सवॅगन. फोक्सवॅगन समूहाचे भारतात मागील १८ वर्षांपासून अस्तित्व आहे आणि त्यांनी २००१ साली स्कोडा ब्रँडच्या प्रवेशाद्वारे भारतातील प्रवास सुरू केला आहे. ऑडी हा ब्रँड आणि फोक्सवॅगन ब्रँडचा भारतात २००७ साली प्रवेश झाला आणि पोर्शे आणि लॅम्बॉर्गिनी ब्रँड २०१२ साली आले. प्रत्येक ब्रँडचे स्वतःचे वैशिष्टय आहे आणि ते बाजारात स्वतंत्ररित्या कार्यरत आहेत. फोक्सवॅगन ग्रुप इंडियाकडे ३० मॉडेल्स असून त्यात २४० डीलरशिप्स आहेत आणि ते दोन कारखाने चालवतात- पुणे आणि औरंगाबाद. पुणे कारखान्यात २००,००० कार प्रतिवर्ष एवढी क्षमता आहे (तीन पाळ्यांच्या यंत्रणेत कमाल) आणि त्यांच्याकडून सध्या फोक्सवॅगन पोलो, एमिओ आणि व्हेंटो आणि स्कोडा रॅपिड बनवल्या जातात. औरंगाबाद येथील कारखान्यात ऑडी, स्कोडा आणि फोक्सवॅगन या भारतात विकल्या जाणाऱ्या गाड्यांचे भाग बनवले जातात आणि त्यांची कमाल वार्षिक क्षमता सुमारे ८९,००० एवढी आहे. फोक्सवॅगन ग्रुप इंडिया हा फोक्सवॅगन एजीचा भाग आहे आणि त्याचे जागतिक पातळीवर १२ ब्रँड्सकडून प्रतिनिधित्व केले जाते- ऑडी, बेंटली, बुगाटी, डुकाटी, लॅम्बॉर्गिनी, पोर्शे, स्कॅनिया, सीट, स्कोडा, फोक्सवॅगन कमर्शियल व्हेइकल्स, मॅन आणि फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स.
Comments
Post a Comment