ओडिशा टुरिझम तर्फे भारतातील बेस्ट केप्ट सिक्रेट असलेल्या पर्यटन योजनांचे प्रदर्शन
ओडिशा टुरिझम तर्फे भारतातील
बेस्ट केप्ट सिक्रेट असलेल्या पर्यटन योजनांचे प्रदर्शन
मुंबई २९ जून २०१९- ओडिशाचे पर्यटन मंत्री श्री जे पी पाणिग्रही यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने फिक्की द्वारा मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका रोड शो मध्ये भाग घेतला.
या रोड शो मध्ये मुंबईतील १५० टुर ॲन्ड ट्रॅव्हल व्यवसायिक सहभागी झाले होते व त्यांना या शिष्टमंडळाचा भाग असलेल्या ओडिशातील १८ आघाडीच्या टूर ऑपरेटर्स बरोबर बी२बी नेटवर्किंग करण्याची संधी मिळाली.
कमिशनर कम सेक्रेटरी श्री विशाल देव यांनी ओडीशा मधील हेरिटेज टुरिझम, इकोटुरिझम, एथनिक टुरिझम आणि स्पिरिच्युअल टुरिझम व अन्य पर्यायांवर प्रकाश टाकला.त्यांनी प्रत्येक विभागात राज्याची ब्रॅन्ड प्रतिमा जागतिक स्तरावर नेण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
ते म्हणाले “ भुवनेश्वर हे भारतातील सर्वात स्मार्ट आणि राहण्यास योग्य शहरांपैकी एकअसून सातत्याने ते भारतातील तसेच जगभरांतील अन्य भागांशी जोडले जात आहे. या शहराला क्रिडा क्षेत्राकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शहरात एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप्स २०१८ नंतर ओडिशा मेन्स हॉकी वर्ल्ड कप २०१८ चे ही यशस्वी आयोजन करण्यात आले होते.”
श्री. देव यांनी ओडिशा टुरिझम मधील संधीं ना अधोरेखित करतांना नैसर्गिक सौंदर्याने युक्त, जैवविविधतेने युक्त स्थळे, अनोखी कला आणि हस्तकला यांचीही माहिती दिली. “ आम्ही इकोटुरिझम, एथनिक आणि हस्तकला यांच्याशी संबंधित पर्यटन यांवर लक्ष केंद्रित करण्या बरोबरच हेरिटेज होमस्टेज आणि ॲडव्हेंचर टुरिझम सारख्या गोष्टींवर ही लक्ष केंद्रित करत आहोत, जेणेकरून पर्यटकांना पुरी आणि कोणार्क व्यतिरिक्त अन्य आकर्षणांचेही पर्याय उपलब्ध होऊ शकतील.” ते म्हणाले.
ओडिशा चे पर्यटन मंत्री श्री पाणिग्रही यांनी चक्रीवादळ फॅनी च्या प्रभावापासून बचाव करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले “ मला सांगायला आनंद होतो की ओडिशातील रंगीबेरंगी जगन्नाथ रथयात्रा ही ४ ते १२ जुलै २०१९ दरम्यान चक्रीवादळ ग्रस्त पुरी मध्ये आयोजित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री श्री नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील लोकांच्या अथक प्रयत्नांमुळे च हे शक्य झाले, म्हणूनच आम्ही देशांतील सर्वांत गुपित असलेल्या या भागातील लोकांबरोबर सहकार्य करण्यासाठी मी या भागातील लोकांना आमंत्रित करत आहे.
फिक्की ओडिशा स्टेट काऊन्सिल च्या टुरिझम पॅनल चे को चेअरमन आणि स्वोस्ती ग्रुप चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री जे के मोहंती यांनी सांगितले की ओडिशा कडून बीच टुरिझम, इको टुरिझम, बुध्दिस्ट टुरिझम, हेरिटेज टुरिझम, रिलिजियस टुरिझम, मेडिकल टुरिझम, ट्रॅव्हल टुरिझम, ट्रायबल टुरिझम, वेलनेस टुरिझम, क्रुझ टुरिझम, सॅन्ड आर्ट टुरिझम आणि ॲडव्हेंचर टुरिझम यांचा वेगाने प्रचार करण्यात येत आहे.
ओडिशा ला २०१८ मध्ये भेट देणार्या पर्यटकांची संख्या ही १५ कोटी होती व ही आकडेवारी २०२१ मध्ये २५ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. राज्या तर्फे काही पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येत असून यांत १८ संरक्षित जागांवरील वाईल्ड लाईफ टुर्स, दोन नॅशनल पार्क्स, एक बुध्दिस्ट सर्किट यांचा परंपरागत गोल्डन ट्रँगल असलेल्या भुवनेश्वर, पुरी - कोणार्क बरोबर समावेश करण्यात आला आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री (फिक्की) विषयी -
फिक्की ही बिगर सरकारी, ना नफा तत्वावर चालणारी भारतीय व्यवसाय क्षेत्राचा आवाज म्हणून ओळखली जाणारी संस्था आहे. परिणाम कारक योजनां बरोबरच प्रोत्साहक चर्चा करत योजनाकर्त्यांचा समावेश घडवत समाजासाठी फिक्की कडून मते आणि विचार मागवले जातात. संस्थे तर्फे त्यांच्या सदस्यांना भारतीय खाजगी आणि सार्वजनिक कॉर्पोरेट क्षेत्रा पर्यंत व बहुराष्ट्रीय कंपन्यांना अनेक स्थानिय चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून संपर्क साधला जातो. यामध्ये २५ हजारांहून अधिक कंपन्यांचा समावेश आहे. अधिक माहिती http://ficci.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
Comments
Post a Comment