टाटा पॉवर क्लब एनर्जीतर्फे 'वॉटर कन्झर्व्हेशन'वरील नवीन मॉड्युल
टाटा पॉवर क्लब एनर्जीतर्फे 'वॉटर कन्झर्व्हेशन'वरील नवीन मॉड्युल
#ClimateCrisis #ClimateChange #WaterCrisisInIndia #SwitchOff2SwitchOn #ThisIsTataPower #ReflexGeneration
राष्ट्रीय, २७ जून २०१९: क्लब एनर्जी हा भारताच्या भावी पिढीला प्रशिक्षण देणे तसेच त्यांना संवेदनशील बनवणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेला टाटा पॉवरच्या राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम आहे. या उपक्रमातून देशाच्या भावी पिढीच्या मनात नैसर्गिक स्रोत आणि ऊर्जा संवर्धनाबद्दलचे ज्ञान आणि जाणीव निर्माण केली जाते. राष्ट्र उभारणीवरील आपला धोरणात्मक भर आणि जागतिक मोहिमेनुसार या कंपनीने क्लब एनर्जीसाठी 'वॉटर कन्झर्व्हेशन' (जल संवर्धन) या विषयावर नवे मॉड्युल सादर केल्याची घोषणा केली आहे.
२०१५ मध्ये, जगभरातील २.१ अब्ज लोकांना पिण्यासाठी सुरक्षित पाणी उपलब्ध नव्हते. यंदा हा आकडा २.२ अब्जांवर गेला आहे आणि आता पाणी जपून वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे स्पष्टच झाले आहे.
पृथ्वीच्या एकूण भूपृष्ठातील फक्त २.४५ टक्के भाग भारताचा आहे आणि जगातील एकूण जलस्रोतांपैकी फक्त ४ टक्के भारतात आहे. त्यामुळे, भारतीयांनी या नैसिर्गक स्रोताचे महत्त्व जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चेन्नईत नुकत्याच निर्माण झालेल्या पाणीटंचाईचे उदाहरण आपल्यासमोर आहेच. पाणीटंचाईचे काय परिणाम होऊ शकतात, हे आपण यातून समजून घ्यायला हवे.
जल आणि ऊर्जा संवर्धनाच्याबाबतीत एकात्मिक आणि दमदार दृष्टिकोन अंगिकारून परिस्थितीत बदल घडवण्याच्या उद्देशाने या मॉड्युलमध्ये लहान मुलांना जल व ऊर्जा संवंर्धनाच्या पद्धती आणि त्यांचे महत्त्व समजून देण्यावर भर देण्यात आला आहे. हा संदेश योग्यरित्या पोहोचवण्यासाठी कंपनीने दृश्यात्मक पातळीवर अधिक आकर्षक कंटेंट तयार केला आहे. आपले घर, समुदाय आणि शहरात पाणी वाचवण्यासंदर्भातील विविध मुद्दयांवर भर देणारे माहितीपर व्हिडिओ यात आहेत.ऊर्जानिर्मितीत पाणी कसे महत्त्वाचे आहे, हे या फिल्ममध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे वीज वाचवल्यानेही पाण्याची बचत होते, हेसुद्धा यात स्पष्ट होते.
या उपक्रमाबाबत टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रवीर सिन्हा म्हणाले, "टाटा पॉवरमध्ये आम्ही क्लब एनर्जीच्या माध्यमातून आम्हाला शक्य होईल तितक्या अधिक लोकांपर्यंत जलसंवर्धनाचा संदेश पोहोचवू इच्छितो. यावेळी आम्ही मुलांना तसेच समुदायांना ते आपल्या परीने प्रयत्न करून पाणी कसे वाचवू शकतील, हे दाखवण्यासाठी दृश्य माध्यमांचा वापर केला आहे. पाणी वाचवल्याने काय फायदे होतात, हे नागरिकांना सांगण्यासोबतच या नव्या मॉड्युलमध्ये पाणी कसे वाचवावे, याबद्दलही माहिती देण्यात आली आहे."
हे मॉड्युल क्लब एनर्जी वेबसाइटवर उपलब्ध आहे www.clubenerji.com आणि वापरकर्त्यांना https://youtu.be/m0KctI72vLU इथे क्लिक करून हे मॉड्युल पाहता येईल. या कंटेंटमध्ये जलसंवर्धनावर भर देण्यात आला आहे. तसेच 'डू ईट युवरसेल्फ किट' ट्युटोरिअलही आहे. जलसंवर्धनावरील हे मॉड्युल टाटा पॉवरच्यहा फेसबुक, टि्वटर, लिंक्डइन आणि इन्स्टाग्राम पेजवरही आहे.
Comments
Post a Comment