लेमन ट्री हॉटेल्स लि. अप्पर मिडस्केल ब्रँडद्वारे मुंबईमध्ये करणार प्रवेश


लेमन ट्री हॉटेल्स लि. अप्पर मिडस्केल ब्रँडद्वारे 
मुंबईमध्ये करणार प्रवेश

लेमन ट्री प्रीमिअर-मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असणार 303 आलीशान खोल्या व स्विट्स, नावीन्यपूर्ण खानपान सुविधा व आकर्षक अंतर्गत सजावट

मुंबई, जून 27, 2019: लेमन ट्री हॉटेल्स लि.ने मुंबईत लवकरच सुरू केल्या जाणाऱ्या लेमन ट्री प्रीमिअर-मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या नव्या हॉटेलचा विशेष आढावा सादर केला. पुण्यानंतर महाराष्ट्रातील मुंबई या दुसऱ्या शहरात लेमन ट्री प्रीमिअर सुरू होणार आहे, तर औरंगाबाद व पुणे यानंतर महाराष्ट्रातील या तिसऱ्या शहरात हा समूह कार्यरत असणार आहे. एकदा हे हॉटेल सुरू झाले की लेमन ट्री 34 शहरांत 57 हॉटेलांमध्ये 5800 खोल्या उपलब्ध करणार असून, यामुळे ही भारतातील मध्यम-दराच्या हॉटेल क्षेत्रातील सर्वात मोठी हॉटेल चेन ठरणार आहे.


अंधेरी पूर्व या मुंबईतील मोक्याच्या व्यवसाय केंद्रामध्ये वसलेले हे अत्याधुनिक हॉटेल बिझनेस व लिजर ट्रॅव्हलर या दोन्हींवर भर देणार आहे, तसेच भारताच्या या आर्थिक राजधानीतील स्थानिक कॉर्पोरेट श्रेणीला लक्ष्य करणार आहे. अंधेरी कुर्ला मार्गावर असणारे हे हॉटेल सीप्झ, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अशा महत्त्वाच्या केंद्रांपासून जवळ आहे आणि जुहू बीचपासूनही दूर नाही.

या शानदार हॉटेलच्या विशेष आढाव्याबद्दल बोलताना, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पतंजली केसवानी यांनी सांगितले, लेमन ट्री प्रीमिअर-मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या आमच्या आगामी हॉटेलचा विशेष आढावा सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मुंबई हे आमच्यासाठी महत्त्वाचे शहर आहे, तसेच बिझनेस व लिजर ट्रॅव्हलर्ससाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. हे हॉटेल छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मोक्याच्या ठिकाणी आणि मुंबईतील व्यावसायिक/औद्योगिक केंद्रांमध्ये वसलेले आहे. या हॉटेलच्या माध्यमातून आम्ही लेमन ट्री प्रीमिअर या अप्पर मिडस्केल ब्रँडची नवी डिझाइन शैलीही सादर करणार असून, या शैलीमध्ये आकर्षक अंतर्गत सजावट व आधुनिक सुविधा यांबरोबर अविस्मरणीय आठवणींची सांगड घातली जाणार आहे. आमच्या ग्राहकांना या शैलीदार हॉटेलमध्ये राहायला नक्की आवडेल.

हॉटेलमध्ये अनोखे रंग व जुन्या काळातील शैली असणारी कलाकृती यांचा वापर करण्यात आला असून, उत्कृष्ट प्रतीच्या लेदरचा सोफा, आकर्षक अंतर्गत सजावट व थोडेसे मंद, पण सुंदर दिवे यामुळे हॉटेलचे रूप आणखी खुलले आहे. लेमन ट्री प्रीमिअर-मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील 303 खोल्या व स्विट्स आकर्षक व ठसठशीत आहेत. त्यामध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. यामुळे बिझनेस व लिजर ट्रॅव्हलरना संवाद साधण्यासाठी व आराम करण्यासाठी ही आदर्श जागा ठरेल. राहण्याच्या पर्यायांमध्ये डिलक्स रूम्स, एक्झिक्युटिव्ह रूम्स, प्रीमिअर रूम्स, स्टुडिओ स्विट्स व एक्झिक्युटिव्ह स्विट यांचा समावेश आहे.

हॉटेलमध्ये 24x7 मल्टि-क्युझिन कॉफी शॉप – सायट्रस कॅफे; रिक्रिएशन बार – स्लाउंज असून, तेथे ग्राहकांना पेयाचा आनंद घेता घेता आवडते संगीत ऐकता येईल. रिपब्लिक ऑफ नूडल्स हे आशियाव्यापी रेस्तराँ थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूर, कम्बोडिया, इंडोनेशिया व म्यानमार येथील स्ट्रीट फूड उपलब्ध करते.

चैतन्य निर्माण करणारे स्पा – फ्रेस्को, सुसज्ज फिटनेस सेंटर व स्विमिंग पूल यांचे उद्दिष्ट हॉटेलमध्ये राहणाऱ्या ग्राहकांच्या वेलनेसची काळजी घेणे, हे असेल. याबरोबरच, व्यवसायांच्या दृष्टीने आणि विशेष निमित्ताने हॉटेलमध्ये 3,100 चौरस फुटापेक्षा मोठी बैठकीची जागा असेल व त्यामध्ये मोठी कॉन्फरन्स रूम व बिझनेस सेंटर यांचा समावेश असेल.

लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेडविषयी
हॉरवथ अहवालानुसार, 30 जून 2017 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेड ही मध्यम-दराच्या हॉटेल क्षेत्रातील सर्वात मोठी व ओन्ड व लीज्ड रूम्सच्या नियंत्रणाबाबत तिसरी सर्वात मोटी हॉटेल चेन आहे. आम्ही अप्पर-मिडस्केल, मिडस्केल व इकॉनॉमी या हॉटेल श्रेणींतील मध्यम दराच्या हॉटेल क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. आम्ही भारतातील मध्यमवर्गीयांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत व वेगळेपण दर्शवणारी, पण दर्जेदार सेवा देत आहोत.

आम्ही 49 खोल्या असलेले पहिले हॉटेल मे 2004 मध्ये सुरू केले आणि सध्या 34 शहरांतील 57 हॉटेलांमध्ये (व्यवस्थापित हॉटेलांसह) 5800 खोल्या चालवल्या जातात आणि आर्थिक वर्ष 2021 पर्यंत 57 शहरांत 85 हॉटेलांत 8,674 खोल्या चालवण्याचे उद्दिष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE