एक्विआचा पुणे कार्यालयासह आशिया - पॅसिफिकमध्ये विस्तार
Greetings!!!
एक्विआचा पुणे कार्यालयासह आशिया - पॅसिफिकमध्ये विस्तार
हा विस्तार कंपनीचा वेगवान जागतिक विकास आणि जागतिक पातळीवरील डिजिटल एक्सपीरियन्स सोल्युशन्सचा अंगीकार अधोरेखित करतो
28 जून 2019 – एक्विआ कंपनीने आज आशिया पॅसिफिक प्रदेशात व भारतात आपले अस्तित्व अधिक ठळक करण्याच्या दृष्टीने पुणे शहरात नवीन कार्यालय स्थापन करीतअसल्याची घोषणा केली. आपल्या जागतिक वृद्धी धोरणाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकत एक्विआ कंपनीने आपले भागीदारांचे नेटवर्क बळकट करण्याचा आणि जागतिक ग्राहकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
पुणे शहरातल्या या नव्या कार्यालयातील विविध विभागांमध्ये नवीन कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्याची योजना एक्विआ कंपनीने आखली असून ग्राहकांचे यश आणि उत्पादन विकास यासाठी भारत हे जागतिक डिलीव्हरी केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याचा कंपनीचा मानस आहे. याचबरोबर, जगभरात पुणे हे सर्वांत जलद वाढत जाणारे डिजिटल अनुभवकेंद्र बनण्याची शक्यता वाढली आहे.
एक्विआ इंडियाचे जीएम सशिकांत मोहन्ती म्हणाले, "पुण्यात जागतिक दर्जाची क्रॉस-फंक्शनल टीम तयार करण्यात आली असून असंख्य स्थानिक व जागतिक ब्रॅण्ड्स आणि त्यांच्या डिजिटल रूपांतरण प्रवासाला सक्षम करण्यासाठी क्लाउड आणि ओपन सोर्स तंत्रज्ञानाच्या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी सरकारी संस्था निवडण्यासाठी एक्विआ कंपनीने तंत्रज्ञान भागीदार म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. भारत आणि दक्षिण आशियामध्ये आपण करत असलेली गुंतवणुक आणि भागीदारीसह या क्षेत्रातील कर्मचारी आणि सल्लागारांचे आमचे परिसंस्थीय तंत्र अधिक वाढत जाणार आहे. एक्विआ इंडियाच्या व्यवसायाची ही खास धोरणात्मक रणनीती आहे आणि या क्षेत्रातील सर्वोच्च तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी प्रतिभेसाठी पुण्यातील आमची शाखा हे एक आदर्श केंद्र आहे."
ओपन सोर्स डिजिटल एक्स्पिरियन्स सोल्यूशन्सना जागतिक मागणीमुळे आता मोठी चालना मिळाली आहे. एक्विआने 200 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली असून एएमडी, पॅनासोनिक, नेस्ले प्युरीना, सईद बिझनेस स्कूल, टेटली टी, वॉर्नर म्युझिक ग्रुप आणि अन्य ब्रॅण्ड्सना कंपनी सोल्यूशन्स पुरवते.
एक्विआ एक्स्पिरियन्स प्लॅटफॉर्मची क्षमता वाढविण्यासाठी स्ट्रक्चरल गुंतवणुक करणे अनिवार्य आहे. अलीकडेच, एक्विआने मॉटिकचे अधिग्रहण घोषित केले असून हा जगातील एकमेव मुक्त विपणन ऑटोमेशन आणि मोहिम व्यवस्थापन प्लॅटफॉर्मचा निर्माता आहे. एकत्रितपणे, एक्विआ आणि मॉटिक महागड्या, बंद, स्थिर मार्केटिंग क्लाउडसाठी एकमेव खुला पर्याय निर्माण करते. उद्योगातील प्रथम खुला डिजिटल एक्सपिरियन्स प्लॅटफॉर्म ऑफर करण्यासाठी एक्विआ हे क्षेत्र विस्तारित करते आहे. कंपनीने अलीकडेच ड्रुपलवरीलएकमेव वैयक्तिक साधन, सर्व-नवीन एक्विआ लिफ्ट जाहीर केले आहेत. हे साधन आता नो-कोड अप्लिकेशन म्हणून उपलब्ध असून ग्राहकांना अनुकूल ग्राहक अनुभव त्वरित वितरित करून विक्रेत्यांसाठी मूल्य कमी करते.
डिजिटल अनुभव आणि वेब सामग्री व्यवस्थापन उद्योगांचे अनुसरण करणाऱ्या अग्रगण्य विश्लेषक कंपन्यांद्वारे एक्विआचे कौतुक केले जाते. फॉरेस्टर रिसर्च, इंकमध्ये एक्विआचे नाव सर्वोत्कृष्ट नेतृत्वासाठी ओळखले जात आहे. "फॉरेस्टर वेव्ह™: वेब कण्टेण्ट मॅनेजमेंट सिस्टम्स, क्यू 4 2018" या अहवालामध्ये ही नोंद करण्यात आली आहे. फॉरेस्टरच्या मते, एक्विआला सर्व विक्रेत्यांच्या स्ट्रॅटेजी श्रेणीमध्ये सर्वाधिक गुण मिळाले. सलग पाच वर्षांसाठी वेब कण्टेण्ट मॅनेजमेंटसाठी 2018 मध्ये मॅजिक क्वाड्रंट फॉर लीडर हा पुरस्कार क्वाड्रंटमध्ये अॅक्विआला देण्यात आला असून गर्टनर इंक यांच्यातर्फे हा किताब देण्यात आला. अंमलबजावणी आणि परिपूर्णता या क्षमतेवर आधारित हा पुरस्कार देण्यात आला.
कंपनीची संस्कृती आणि नेतृत्वगुण यासाठी एक्विआची कार्यसंस्कृती उत्कृष्ट असल्याचे मत अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले असून कम्पॅरेबलीच्या वार्षिक अहवालानुसार हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विशेषतः, एक्विआला बेस्ट सीईओ आणि बेस्ट कंपनी फॉर वूमन 2018 हे वार्षिक पुरस्कारही मिळाले आहेत.
Comments
Post a Comment