एमजीची बहुप्रतीक्षित एसयूव्ही ‘एमजी हेक्टर’ भारतात लॉन्च
एमजीची बहुप्रतीक्षित एसयूव्ही ‘एमजी हेक्टर’ भारतात लॉन्च
~ भारतातील सर्वोत्तम ५-५-५ व्हेइकल ओनर पॅकेजसह १२.१८ लाखांत उपलब्ध ~
मुंबई, २७ जून २०१९: एमजी (मॉरिस गॅरेज) मोटर्स इंडियाने आज आपली बहुप्रतिक्षित एसयूव्ही एमजी हेक्टर १२.१८ लाख ते १६.८८ लाख (एक्स शो-रूम, नवी दिल्ली) अशा अतिशय खास स्वागत मूल्यासह भारतीय बाजारपेठेत दाखल केली.
भारताची पहिली इंटरनेट कार एमजी हेक्टर बरोबर खरेदीदारांना द 'एमजी शिल्ड' हे भारतातील सर्वोत्तम व्हेइकल ओनरशिप पॅकेज दिले जाणार आहे. या पॅकेजद्वारे गाडीच्या खासगी मालकांना अमर्याद किलोमीटर्ससाठी ५ वर्षांची सर्वसमावेशक मॅन्युफॅक्चरर वॉरंटी मोफत दिली जाणार आहे. भारतात विकल्या जाणा-या इतर कोणत्याही गाडीबरोबर फॅक्टरी वॉरंटीच्या तुलनेत ही वॉरंटी सरस आहे. यामध्ये पाच वर्षांसाठी चोवीस तास रोडसाइड असिस्टंस (RSA) आणि पहिल्या पाच शेड्युल्ड व्हेइकल सर्व्हिससाठी शून्य मेहनताना या सुविधांचा समावेश आहे.
याखेरीज हेक्टरबरोबर प्रीपेड मेंटेनन्स प्लान्सही विकत घेता येऊ शकणार आहेत, ज्यांच्या किंमती पहिल्या तीन वर्षांसाठी अगदी कमी म्हणजे फक्त ६००० रुपयांपासून सुरू होणा-या आहेत. या गाडीची टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप (TCO) या उत्पादनश्रेणीतील इतर गाड्यांच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे पेट्रोल गाडीसाठी ४५ पैसे प्रती किलोमीटर आणि डिझेल गाडीसाठी ४९ पैसे प्रती किलोमीटर इतकी आहे.
एमजी कंपनीने उचललेले आणखी एक धाडसी आणि अभूतपूर्व पाऊल म्हणजे कंपनीकडून ग्राहकांना हेक्टर गाडीच्या पुनर्विक्रीमूल्याचीही हमी देण्यात आली आहे. यासाठी निर्माता कंपनीने कारदेखो या ऑटोमोटिव्ह पोर्टलशी हातमिळवणी केली असून त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ''३-६०'' योजनेअंतर्गत एमजी हेक्टर गाडी विकत घेऊन तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर या पोर्टलकडून ती ६०% अवशिष्ट मूल्याने (residual value) बायबॅक करेल. ग्राहकांचा अनुभव उंचावण्याच्या तसेच त्यांना संपूर्ण निश्चिंतता प्रदान करण्याच्या हेतूने ''एमजी शिल्ड'' योजनेला हे सर्व पैलू देण्यात आले आहेत.
एमजी हेक्टर गाडीच्या आगमनाबद्दल बोलताना एमजी मोटर्स इंडियाचे प्रेसिडंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर राजीव छाबा म्हणाले, ''भारतीय बाजारपेठेत पदार्पण करणारे एमजीचे हे पहिलेच उत्पादन ''एमजी शिल्ड'' या भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये अशाप्रकारे पहिल्यांदाच देण्यात येणा-या पॅकेजसह विक्रीस ठेवले गेले आहे. या बाजारपेठेमध्ये आपल्या वेगळेपणाने खळबळ निर्माण करण्यावर व लक्ष वेधून घेण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून देण्यात येणारे हे पॅकेज आमच्या ग्राहकांना गाडीच्या मालकीची संपूर्ण हमी देते. अत्यंत वेगळी घडण तसेच सुरक्षितता, सर्वोत्तम वैशिष्ट्ये आणि वाजवी किंमती या सा-या वैशिष्ट्यांमुळे एमजी हेक्टर गाडी नेहमीच्या गाड्यांपेक्षा काहीतरी वेगळे विकत घेऊ पाहणा-या खरेदीदारांवर आपली छाप पाडेल.''
४ जूनपासून सुरू झालेल्या पूर्वनोंदणीच्या २३ दिवसांमध्ये तब्बल १०,०००हून अधिक जणांनी एमजी हेक्टनरगाडीचे बुकींग केले आहे. गाडीची पूर्वनोंदणी करणा-या ग्राहकांना कंपनीच्या भारतभरातील १२० केंद्रांच्या नेटवर्कच्या माध्यमातून जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांची एमजी हेक्टर पोहोचती केली जाईल. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत वितरण केंद्रांच्या या जाळ्यांची संख्या २५० पर्यंत वाढविण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
'मेड इन इंडिया''एमजी हेक्टर' एकूण ११ कॉम्बिनेशन्स आणि स्टाईल, सुपर, स्मार्ट आणि शार्प अशा चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यात पेट्रोल, पेट्रोल हायब्रिड आणि डिझेल असे इंजिनाचे चार पर्याय आहेत. यापैकी पेट्रोल गाडी ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहे. गाड्यांच्या किंमती खालीलप्रमाणे:
एमजी हेक्टर एक्स-शोरूम दिल्ली किंमती (रुपये लाख)
| ||||
स्टाइल
|
सुपर
|
स्मार्ट
|
शार्प
| |
पेट्रोल एमटी
|
12.18
|
12.98
|
-
|
-
|
पेट्रोल हायब्रिडएमटी
|
-
|
13.58
|
14.68
|
15.88
|
पेट्रोलडीसीटी
|
-
|
-
|
15.28
|
16.78
|
डिझेल एमटी
|
13.18
|
14.18
|
15.48
|
16.88
|
Comments
Post a Comment