स्पंदना स्फूर्ती फिनान्शिअल लिमिटेड: प्रारंभी समभाग विक्रीला ऑगस्ट 5, 2019 रोजी सुरुवात, प्रति इक्विटी शेअरसाठी किंमतपट्टा 853 रुपये ते 856 रुपये
स्पंदना स्फूर्ती फिनान्शिअल लिमिटेड: प्रारंभी
समभाग विक्रीला ऑगस्ट 5, 2019 रोजी सुरुवात,
प्रति इक्विटी शेअरसाठी किंमतपट्टा 853 रुपये ते 856 रुपये
किमान बोलीचे प्रमाण 17 इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर 17 इक्विटी शेअर्सच्या पटीत
स्पंदना स्फूर्ती फिनान्शिअल लिमिटेड (“कंपनी”) या ग्रामीण
भागावर भर देणाऱ्या व भारतात विविध भौगोलिक ठिकाणी कार्यरत असणाऱ्या
एनबीएफसी-एमएफआयने ऑगस्ट 5, 2019 रोजी इक्विटी शेअर्सच्या प्रारंभी समभाग विक्रीला (आयपीओ)
सुरुवात करायचे ठरवले आहे. ऑफरमध्ये 4,000.00 दशलक्ष रुपयांपर्यंतच्या फ्रेश इश्यूचा (“फ्रेश इश्यू”) आणि 9,356,725 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश असून, त्यामध्ये कांचनजंगा लिमिटेडतर्फे 5,967,097 पर्यंत
इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (“कॉर्पोरेट प्रमोटर सेलिंग
शेअरहोल्डर”); पद्मजा गंगिरेड्डी यांच्याकडून 1,423,114 पर्यंत
इक्विटी शेअर्स (“इंडिव्हिज्युअल प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर”); विजया शिवा रामी रेड्डी वेंदिदंडी यांच्याकडून 796,509 पर्यंत इक्विटी शेअर्स (“व्हीएसआरआरव्ही”); व्हॅलिएंट मॉरिशस पार्टनर्स एफडीआय लिमिटेडतर्फे
783,747 पर्यंत इक्विटी शेअर्स (“व्हॅलिएंट”), हेलिऑन व्हेंचर पार्टनर्स II, एलएलसीकडून 132,831 पर्यंत
इक्विटी शेअर्स (“हेलिऑन II”); केदारा कॅपिटल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड – केदारा कॅपिटल एआयएफ 1 तर्फे 129,732 पर्यंत
इक्विटी शेअर्स (“केदारा एआयएफ 1”); आणि हेलिऑन व्हेंचर पार्टनर्स, एलएलसीतर्फे 123,695 पर्यंत इक्विटी शेअर्स (“हेलिऑन”) (एकत्रित, “इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर”) यांचा समावेश असणाऱ्या आहे.
बिड/ऑफर ऑगस्ट
7, 2019 रोजी बंद होणार आहे. किमान बोलीचे प्रमाण 17 इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर 17 इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल. अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची
तारिख बिड/ऑफर सुरू होण्याच्या एक वर्किंग डे अगोदर, म्हणजे ऑगस्ट 2, 2019 रोजी असेल.
इक्विटी
शेअर्स बीएसई व एनएसई येथे सूचिबद्ध केले जाणार आहेत (“स्टॉक एक्स्चेंजेस”).
फ्रेश
इश्यूमधील निव्वळ रकमेचा (“नेट प्रोसीड्स”)
वापर भविष्यातील भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी व एकंदर
कॉर्पोरेट उद्दिष्टाने केला जाणार आहे.
या
ऑफरसाठी अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड,
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड व जेएम फिनान्शिअल
लिमिटेड हे ग्लोबल को-ऑर्डिनेटर्स अँड बुक रनिंग लीड
मॅनेजर्स (“जीसीबीआरएलएम”) आहेत आणि इंडसइंड बँक लिमिटेड व येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेड हे बुक
रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम”) आहेत.
ही ऑफर, बदल केल्यानुसार, सिक्युरिटीज काँट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रुल्स, 1957च्या रुल 19(2)(b)
नुसार (“एससीआरआर”) राबवली
जाणार आहे. ही ऑफर बदल केल्यानुसार, बुक बिल्डिंग प्रोसेसद्वारे, सिक्युरिटीज अँड
एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोदर रिक्वायरमेंट्स)
रेग्युलेशन्स, 2009, (“2009 सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) च्या रेग्युलेशन 26(1) नुसार राबवली जाणार असून त्यामध्ये ऑफरपैकी जास्तीत
जास्त 50%
शेअर्स विशिष्ट प्रमाणात
पात्र संस्थात्मक ग्राहकांसाठी (“क्यूआयबी पोर्शन”)
राखून ठेवले जातील. मात्र,
बीआरएलएम व जीसीबीआरएलएम यांच्या सल्ल्याने, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या अनुसार,
कंपनी क्यूआयबी कॅटेगरीतील 60% पर्यंतचा भाग अँकर
इन्व्हेस्टर्ससाठी विशिष्ट प्रमाणात राखून ठेवू शकतात (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”). त्यापैकी एक तृतियांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी
त्यांच्याकडून अँकर इन्व्हेस्टरना दिलेल्या प्राइसनुसार वा त्याहून अधिक
प्राइसनुसार (“अँकर
इन्व्हेस्टर प्राइस”) आलेल्या वैध बोलींवर उपलब्ध केला जाईल. कमी सबस्क्रिप्शन
झाल्यास, किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये अलोकेशन न झाल्यास उर्वरित इक्विटी
शेअर्स क्यूआरबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील. नेट क्यूआयबी पोर्शनच्या 5% इक्विटी शेअर्स
विशिष्ट प्रमाणात केवळ म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध होतील आणि क्यूआयबी पोर्शनचा उर्वरित भाग विशिष्ट प्रमाणात म्युच्युअल फंडांसह
सर्व क्यूआयबींना (अँकर इन्व्हेस्टर वगळता) त्यांच्याकडून आलेल्या ऑफर प्राइस वा
त्याहून अधिक वैध बोलींवर उपलब्ध केला जाईल. परंतु,
म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी नेट क्यूआयबी पोर्शनच्या 5% पेक्षा कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनमधील अलोकेशनसाठी उपलब्ध असणारे
उर्वरित इक्विटी शेअर्स क्यूआयबींना विशिष्ट प्रमाणात देण्यासाठी उर्वरित नेट
क्यूआयबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील.
तसेच,
2009 सेबी
आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार, ऑफर
प्राइसइतक्या वा त्याहून अधिक रकमेच्या वैध बोलीनुसार, ऑफरपैकी किमान 15%
भाग विशिष्ट प्रमाणात
बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवला जाईल आणि किमान 35% भाग रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरसाठी राखून ठेवला जाईल.
सर्व बिडरना, अँकर इन्व्हेस्टर
वगळता, अॅप्लिकेशन
सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या विक्रीमध्ये सहभागी होणे बंधनकारक आहे व
यासाठी त्यांना त्यांचा संबंधित बँक खाते क्रमांक द्यावा लागेल. लागू असल्यास,
आरआयबीसाठी यूपीआय आयडी द्यावा. ही रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकांद्वारे (“एससीएसबी”) या खात्यात बोलीची रक्कम ब्लॉक केली जाईल. अँकर इन्व्हेस्टरना एएसबीए प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये
सहभागी होता येणार नाही. अधिक माहितीसाठी, 25 जुलै 201 रोजीच्या रेड हेरिंग
प्रॉस्पेक्टसच्या 441 क्रमांकाच्या पानावरील “ऑफर प्रोसिजर” पाहा.
बीआरएलएम व जीसीबीआरएलएम यांच्या
सल्ल्याने, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड
ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोदर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2009, अनुसार, कंपनी व सेलिंग शेअरहोल्डर्स अँकर इन्व्हेस्टर्सच्या सगभागाचा विचार
करू शकतात.
Comments
Post a Comment