पोर्श इंडियातर्फे नवीन मॅकन सादर
स्पोर्टी एसयूव्ही नवीन
डिझाइन व अधिक वैशिष्ट्यांनी सुसज्जित
पोर्श इंडियातर्फे नवीन मॅकन
सादर
नवी दिल्ली: पोर्शच्या सर्वात
लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक मॅकन आता अनेक सुधारित वैशिष्ट्यांसह भारतात उपलब्ध
आहे. विभागामध्ये खरी स्पोर्टस् कार म्हणून मॉडेलला अधोरेखित करणा-या कामगिरीसह
लॉन्च कार्यक्रमामध्ये अतिथींना नवीन मॅकन दाखवण्यात आली. ब्रॅण्डची कॉम्पॅक्ट
एसयूव्ही आरामदायी व ड्रायव्हिंग सुविधेच्या बाबतीत अग्रस्थानी आहे. लॉन्च
कार्यक्रमामध्ये दोन इंजिन व्हर्जन्स मॅकन आणि अधिक शक्तिशाली मॅकन एस सादर
करण्यात आली.
नवीन मॉडेलच्या आगमनाबाबत बोलताना पोर्श इंडियाचे
संचालक पवन शेट्टी म्हणाले, ''मॅकन ही भारतातील आमच्या सर्वात यशस्वी सिरीजपैकी
एक आहे. सर्वोत्तम पोर्श वैशिष्ट्ये, कामगिरी व आरामदायी
सुविधा असलेल्या या नवीन निर्माणासह मला विश्वास आहे की, यशोगाथा सुरूच राहिल. माझ्या
मते, मॅकन
ही बाजारपेठेतील सर्वात आकर्षक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. ही एसयूव्ही तुम्हाला
अस्सल स्पोर्टस् कारचा अनुभव देते. नवीन रेंजमध्ये भावना व कार्यक्षमतेचे
परिपूर्ण संयोजन आहे. मॅकनसाठी नवीनच सादर करण्यात आलेले क्रेस्ट केअर पॅकेज वेईकलच्या
देखरेखीसंदर्भात पूर्ण समाधान देते. मला बाजारपेठेमध्ये मॅकनच्या पहिल्या व्हेरिएण्ट्सचे
स्वागत करताना आनंद होत आहे.''
मॅकनमध्ये सुधारित २.० लिटर टर्बोचार्ज्ड
फोर-सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन २५२ अश्वशक्ती निर्माण करते आणि ३७० एनएम इतक्या
अधिकतम टॉर्कची निर्मिती करते. ही वेईकल ६.५ सेकंदांमध्ये शून्य ते १०० किमी/तास
गती प्राप्त करते (पर्यायी स्पोर्ट क्रोनो पॅकेजसह सुसज्जित असताना) आणि २२७
किमी/तास इतकी अव्वल गती गाठते. मॅकन एसमध्ये नवीन व्ही६ इंजिन आहे. हे
इंजिन पॅनामेरा आणि कॅयीनच्या नवीन निर्माणांमध्ये प्रथम सादर करण्यात आले
होते. हाय-टेक पॉवर युनिट ३५४ अश्वशक्ती (पूर्वीच्या वेईकलपेक्षा १४ अश्वशक्तीची
वाढ) आणि ४८० एनएमच्या टॉर्कची निर्मिती करते. ही वेईकल पर्यायी स्पोर्ट क्रोनो
पॅकेजसह ५.१ सेकंदांमध्ये १०० किमी/तासापर्यंत गती प्राप्त करते आणि २५४
किमी/तास इतकी अव्वल गती गाठते.
मॅकन वेईकलचे डायनॅमिक्स हे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
सुधारित चेसिस ड्रायव्हिंगचा आनंद वाढवते. यामधील नवीनच विकसित करण्यात आलेले
मिक्स आकाराचे टायर्स, सुधारित ब्रेक्स आणि ऑल-व्हील ड्राइव्ह पोर्श
ट्रक्शन मॅनेजमेंट (पीटीएम) यंत्रणा उत्तम स्थिरता आणि सुधारित आरामदायी सुविधा
देतात. एकूण मॅकन पूर्वीपेक्षा अधिक उत्तम स्पोर्टस् कार वाटते.
नवीन
मॅकनमध्ये विकसित डिझाइन अत्यंत आकर्षक आहे. या डिझाइनमध्ये
Comments
Post a Comment