टाटा पॉवर गुजरातमध्ये साकारणार २५० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प
टाटा पॉवर गुजरातमध्ये साकारणार २५० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प
राष्ट्रीय, २९ जुलै २०१९ – गुजरातमधल्या ढोलेरा सोलर पार्क येथे २५० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासंबंधीचे लेटर ऑफ अवॉर्ड (एलओए) म्हणजेच संमतीपत्र २५ जुलै २०१९ रोजी गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड (जीयूव्हीएनएल)तर्फे टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (टीपीआरईएल) या उपकंपनीला मिळाल्याची घोषणा टाटा पॉवर या भारतातील सर्वांत मोठ्या एकीकृत ऊर्जा कंपनीने नुकतीच केली. मे २०१९मध्ये राघनेसदा सोलार पार्क येथे थाटण्यात आलेल्या जीयूव्हीएनएलच्या
१०० मेगावॅट प्रकल्पाला हा नवा प्रकल्प जोड देणार आहे.
नियोजित व्यापारी परिचालन तारखेपासून पुढे २५ वर्षांपर्यंत करण्यात आलेल्या ऊर्जा खरेदी करारानुसार (पीपीए) जीयूव्हीएनएलला ऊर्जा पुरवण्यात येणार आहे. जानेवारी २०१९मध्ये जीयूव्हीएनएलतर्फे सादर करण्यात आलेल्या लिलावात कंपनीला यश प्राप्त झाले आहे. पीपीए झाल्यानंतरच्या १५ महिन्यांत हा प्रकल्प सुरू होणे अपेक्षित आहे.
या यशाबाबत बोलताना टाटा पॉवरचे सीईओ व एमडी श्री. प्रवीर सिन्हा म्हणाले, ''गुजरातमधील आगामी २५० मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी आम्हाला संमती मिळाल्याचा आम्हाला फार आनंद होत असून ही संधी आम्हाला दिल्याबद्दल गुजरात सरकार आणि जीयूव्हीएनएलचे आम्ही आभारी आहोत. सौर ऊर्जा निर्मितीतून स्वच्छ व हरित ऊर्जा निर्माण करण्याच्या आपल्या देशाच्या कटीबद्धतेत आम्ही सहभागी होऊ शकत असल्याचा आम्हाला आनंद होत आहे.''
टाटा पॉवरच्या रिन्यूएबल्स विभागाचे अध्यक्ष श्री. आशिष खन्ना म्हणाले, ''रिन्यूएबल एनर्जी तसेच, प्रकल्प विकास, अभियांत्रिकी आणि परिचालन क्षमता याबाबतीत मजबूत कटीबद्धतेचे प्रदर्शन आम्ही करून शकू, याचा आम्हाला विश्वास वाटतो. टाटा पॉवरच्या एकूण निर्मिती स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांपैकी ३५ ते ४० टक्के ऊर्जा वापरण्याच्या प्रयत्नात हा टप्पा आमच्यासाठी मैलाचा दगड आहे. आमच्या पूर्ण क्षमतेसह काम करण्याची, अपेक्षांपेक्षा पुढे जाऊन उत्पादन देण्याची आणि या क्षेत्रात नवे पायंडे घालण्याची आमची परंपरा आम्ही पुढेही सुरू ठेवणार आहोत.''
या यशाच्या माध्यमातून टीपीआरईएलच्या २,४७६ मेगा वॅट परिचालन क्षमतेत ६५० मेगा वॅट क्षमतेची भर पडणार आहे. या प्रकल्पातून दरवर्षी ६३५ मेगा यूनिट ऊर्जा निर्माण होणे अपेक्षित असून वर्षभरात ६३५ दशलक्ष किलोग्रॅम कार्बन-डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होणार आहे.
Comments
Post a Comment