गेमर्स लक्ष द्या! भारतातील सर्वांत दीर्घ ई-स्पोर्ट चॅम्पियनशिप तैवान एक्सलन्स गेमिंग कप (टीईजीसी) पुन्हा येत आहेगेमिंगचा आजपर्यंत कधीही घेतला नसेल असा व खिळवून ठेवणारा अनुभव घेऊन
गेमर्स लक्ष द्या! भारतातील सर्वांत दीर्घ ई-स्पोर्ट चॅम्पियनशिप तैवान एक्सलन्स गेमिंग कप (टीईजीसी) पुन्हा येत आहेगेमिंगचा आजपर्यंत कधीही घेतला नसेल असा व खिळवून ठेवणारा अनुभव घेऊन
२७ जुलै २०१९, मुंबई: तैवान एक्सलन्स गेमिंग कप (टीईसीजी) परत येत आहे आपल्या सहाव्या पर्वासह! भारतातील या सर्वाधिक पसंतीच्या गेमिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठीतुम्ही सज्ज आहात?
बघत राहा:
ऑनलाइन पात्रताफेरी सीएस:गो
१२ ते १८ ऑगस्ट
२६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
ऑफलाइन पात्रताफेरी सीएस:गो
हैदराबाद २८ ते ३० जून
बेंगळुरू ५ ते ७ जुलै
सिलचर १२ ते १४ जुलै
कोलकाता १९ ते २१ जुलै
पुणे २६ ते २८ जुलै
मुंबई २ ते ४ ऑगस्ट
ऑनलाइन पात्रताफेरी डोटाटू
१२ ते १८ ऑगस्ट
२६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
पीयूबीजी ऑनलाइन लढती
२० दिवस दररोज २ गेम्स
८ जुलै ते २१ ऑगस्ट
|
भारतातील सर्वाधिक दीर्घकाळ चालणारी ई-स्पोर्ट स्पर्धा असल्याने, टीईसीजी देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वोत्तम ईस्पोर्ट्सअॅथलिट्सना एकत्र आणते. हे सगळे खेळाच्या स्पर्धात्मक चैतन्याचा सन्मान करण्यासाठी व त्यातील विजेता निश्चितकरण्यासाठी जमत असल्यामुळे ही स्पर्धा म्हणजे कौशल्य, व्यूहरचना व मौजमजेचे अनोखे प्रदर्शन ठरते.
ई-स्पोर्ट्स स्पर्धेचा जागतिक दर्जाचा अनुभव भारतात आणण्याचा आपला वारसा आणखी पुझे नेत टीईजीसी २०१९मध्येसीएस:गो, डोटा२ आणि पीयूबीजीवर गेमर्समध्ये लढती होणार आहेत. या लढती २८ जून रोजी सुरू होतील आणि सीएस:गोसाठीबाद फेऱ्या हैदराबाद, बेंगळुरू, सिलचर, कोलकाता, पुणे व मुंबई या शहरांत पार पडतील. त्यापाठोपाठ सीएस:गो, डोटा२ आणिपीयूबीजीसाठी ऑनलाइन पात्रता फेऱ्या होतील आणि या सर्वांच्या अखेरीस मुंबईमध्ये २७ व २८ सप्टेंबर २०१९ रोजीमहाअंतिमफेरी खेळली जाईल. महाअंतिमफेरीमध्ये जीएस:गो आणि डोटाटूच्या प्रत्येक गेमसाठी ८ संघांमध्ये झुंज होईल.जिंकणाऱ्या संघांना १० लाख रुपयांची बक्षिसे तसेच तैवानची उत्कृष्ट उत्पादने दिली जातील.
त्याचबरोबर सीएस:गोमधील विजेत्या संघाला यंदा टीईजीसी पूर्ण खर्चासह तैवानला पाठवणार आहे. हा संघ तैवान एक्सलन्सई-स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करेल. या स्पर्धेत टीईजीसीच्या तैवान, मलेशिया,फिलीपाइन्स व थायलंड या देशांतून जिंकलेल्या संघांमध्ये मैत्रीपूर्ण सामने होतील.
यावर्षी अडाटा, अव्हरमीडिया, एमएसआय, थर्मलटेक, ट्रान्सेण्ड आणि यांसारखे आणखी अनेक अग्रगण्य तैवानी ब्रॅण्ड्स आपलीअत्याधुनिक गेमिंग उपकरणे मुंबईतील अंतिम फेरीदरम्यान प्रदर्शनासाठी ठेवणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून टीईजीसीने गेमिंगच्या क्षेत्रात स्वत:चे स्थान तयार केले आहे आणि केवळ विजयापलीकडील काहीतरी हीस्पर्धा देत आली आहे. स्पर्धात्मक खेळासाठी सज्ज असलेल्या कोणासाठीही ही स्पर्धा खुली आहे आणि गेमिंगची आवड असलेल्या विविध शहरांतील, विविध क्षेत्रांतील लोकांनाएकमेकांशी भेटण्याची संधी ही स्पर्धा देते. हौशी गेमर्सना प्रस्थापित विजेत्यांच्या विरोधात खेळता येते, त्यांना भेटण्याची संधी मिळते, त्यांच्याकडून शिकण्यास मिळते आणित्यांतून मैत्रीही होऊ शकते.
टीईजीसी मूळ तैवानमधील आहे. तैवान हे सर्वोत्तम गेमिंग ब्रॅण्ड्स, तंत्रज्ञान, उत्पादने व अॅक्सेसरीजसाठी प्रसिद्ध आहे. गेमर्स आणि तंत्रज्ञानप्रेमींसाठी हे खरोखर नंदनवनचआहे. सुरुवात झाल्यापासून गेली अनेक वर्षे टीईजीसीने गेमर्सना अत्याधुनिक गेमिंग तंत्रज्ञानाचा अनुभव दिला आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक स्तरावर गेमिंगची संधी दिलीआहे.
स्ट्रॅटेजिक मार्केटिंग विभागाचे कार्यकारी संचालक श्री. सी. टी. वु. या गेमिंगच्या महास्पर्धेबाबत म्हणाले, “टीईजीसीने भारतात प्रवेश केला तेव्हा ईस्पोर्ट्स हा विभाग अगदीचबाल्यावस्थेत होता. आम्ही या विभागाची घडी नीट बसवली आणि भारताला ईस्पोर्ट्सच्या जागतिक नकाशावर स्थान देणे हे आमचे उद्दिष्ट होते. भारतात खेळाचा अनुभव अधिकचांगला व्हावा यासाठी टीईजीसी तैवानमधील सर्वोत्तम गेमिंग उपकरणे देऊ करते. ही सर्वाधिक प्रभाव करणाऱ्या स्पर्धांमधील एक ठरली असून, भारतातील गेमिंग उद्योगाचेभवितव्य या स्पर्धेमुळे सुकर झाले आहे. टीईजीसीमध्ये गेमिंगचे चाहते केवळ स्पर्धा करत नाही, तर ते शिकतात व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गेमिंगचा अनुभव घेतात. गेमिंग हेपैसा मिळवून देणारे करिअर होऊ शकते हे आम्ही आमच्या प्रचंड रोख बक्षिसाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. केवळ तरुण गेमर्ससाठी नाही, तर या उद्योगाचा भागअसलेल्या प्रतिभावंतांसाठीही हे उत्तम करिअर होऊ शकते.”
Comments
Post a Comment