‘टेक्शीला युनिव्हर्सिटी’ची २० लाख रुपयांची शिष्यवृत्ती
‘टेक्शीला युनिव्हर्सिटी’ची २० लाख रुपयांची शिष्यवृत्ती
मुंबई, ‘एनईईटी’चे निकाल जाहिर झाले आहेत आणि जे विद्यार्थी त्यांत उत्तीर्ण झाले आहेत त्यांना भारतात उपलब्ध असलेल्या अत्यंत मर्यादित अशा संधींमुळे चिंता लागून राहिली आहे. दरवर्षी, कित्येक भारतीय मुलांची संधी ही त्यांनी एनईईटी उत्तीर्ण करूनही हुकत असते. सरकारी महाविद्यालयांमधील मर्यादित क्षमता, वाढलेले गुणांचे कट-ऑफ आणि खासगी महाविद्याला\यांनी वाढविलेली भरमसाठ फी ही त्यामागील कारणे आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छीणारे विद्यार्थी सध्या प्रचंड वाढलेल्या स्पर्धेला तोंड देत आहेत, कारण ६३,००० उपलब्ध वैद्यकीय आसन क्षमतेपैकी केवळ ५० टक्के आसने खासगी महाविद्यालयांना देण्यात आली आहेत. यंदा, साधारण १५ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आणि त्यामुळे प्रत्येक सीटसाठी साधारण २२ विद्यार्थ्यांचे अर्ज असे हे प्रमाण आहे. विद्यार्थ्यांची आणि भारतातील वैद्यकीय शिक्षणाची ही स्थिती लक्षात घेवून ‘टेक्शीला अमेरिकन युनिव्हर्सिटी’ने (टीएयु) एनईईटी उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी २० लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहिर केली असे उद्गार टेक्शीला अमेरिकन विद्यापीठाचे अध्यक्ष श्री एस पी साजू भास्कर यांनी काढले आहेत. त्या माध्यमातून हे विद्यार्थी डॉक्टर होण्याचे आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतात. ‘टीएयू’ने प्रत्येक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यासाठी ही शिष्यवृत्ती जाहिर केली असून त्या माध्यमातून संस्था इच्छुक विद्यार्त्यांना त्यांचे वैद्यकीय शिक्षण परदेशात पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आम्ही त्यांना वैद्यकीय शाखेला प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत,”
Comments
Post a Comment