फिक्की फूड वर्ल्ड इंडिया २०१९
खाद्य प्रक्रिया उद्योगाच्या सुरूवातीसाठी सरकार तर्फे उद्योजकांना आणि नवोदित व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यात येणार- खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री रामेश्वर तेली
भारत सरकारच्या खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री. रामेश्वर तेली यांनी सांगितले की भारतातील खाद्यप्रक्रिया उद्योग हा देशांतील सर्वांत वाढत्या क्षेत्रांपैकी एक असून या क्षेत्रामध्ये वाढीसाठी उज्ज्वल भवितव्य आहे.
फिक्की फूड वर्ल्ड इंडिया २०१९ या फिक्की आणि भारत सरकारच्या खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालय यांनी सहकार्यातून आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. श्री तेली पुढे म्हणाले “ आमचे बजेट हे १४०० कोटी रूपयांचे असून खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून उद्योजक आणि तरूण व्यावसायिकांना खाद्य प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी सहकार्य तर मिळेलच पण त्याच बरोबर दुर्गम भागात उद्योग सुरू करण्यास अधिक सहकार्य केले जाईल.”
श्री तेली यांनी उद्योगांना आणि व्यावसायिकांना देशाच्या उत्तरपूर्व भागात गुंतवणूक करण्यास आमंत्रित केले. “ सरकार तर्फे गुंतवणूकदार आणि उद्योजकांना या राज्यांत आपली युनिट्स सुरू करण्यास सहकार्य करेल विशेष करून उत्तर पूर्व आणि जम्मू काश्मीर मध्ये हे सहकार्य केले जाईल.” ते म्हणाले.
ओडिशा सरकार तर्फे खाद्य प्रक्रिया उद्योगाला देण्यात येणार्या सुविधां बद्दल माहिती देतांना ओडिशा सरकारच्या उद्योग विभागाचे मुख्य सचिव श्री संजीव चोप्रा यांनी सांगितले “ ओडिशा मध्ये खाद्य प्रक्रिया विभागहा एक प्रमुख विभाग आहे आणि राज्य सरकारच्या अधिपत्याखालील या विभागात अनेक संधी उपलब्ध आहेत. ओडिशा सरकार ने अनेक उपाय करून व्यवसाय करण्याचा खर्च कमी केला असून त्याच बरोबर राज्यातील पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा केली आहे.”
भारत सरकारच्या कृषी आणि खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे माजी सचिव श्री सिराज हुसैन यांनी सांगितले “ किंमती कोसळल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. अन्न वाया गेल्याने सुध्दा उद्योगाचे मोठे नुकसान होत असते. आंम्हाला आशा आहे की काही बदलांमुळे खाद्य प्रक्रियांच्या सुविधांचा विकास होऊन ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राला याचा मोठा लाभ होऊ शकेल.”
भारत सरकारच्या खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सह सचिव श्रीमती रीमा प्रकाश यांनी सांगितले “ प्रधान मंत्री किसान संपदा योजने मुळे देशातील खाद्य प्रक्रिया क्षेत्राला मोठी चालना मिळण्याबरोबरच शेतकर्यांना चांगला फायदा मिळून त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक चांगले पाऊल असेल. यामुळे अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील विशेष करून ग्रामीण भागात रोजगार निर्माण होऊन कृषी उत्पन्नाची नासाडी होणार नाही व त्यामुळे प्रक्रियांचा स्तर वाढून प्रक्रिया केलेले पदार्थ अधिक प्रमाणात निर्यात होऊ शकतील.”
आयटीसी लिमिटेड च्या फूड डिव्हीजन चे सीईओ आणि फिक्की खाद्य प्रक्रिया समितीचे अध्यक्ष श्री हेमंत मलिक यांनी सांगितले “भारत आता अन्न तुटवडा असलेल्या देशा पासून अधिक अन्न उत्पादक देश बनला आहे आणि आता बाजारपेठ ही वाढ आणि नफा या दोन्ही दृष्टीने प्रगतीपथावर आहे. मुल्य वर्धन आणि विकास या दोन्ही बाबींकडे पाहता खाद्य प्रक्रिया क्षेत्रा मध्ये मोठी संधी आहे. यामुळे अर्थव्यवस्थेचे दोन स्तंभ बाजारपेठ आणि कृषी क्षेत्र यांच्यात समन्वय घडू शकेल. सरकारच्या विविध उपक्रमांमुळे आणि बदलांमुळे बाजारपेठेतील अनेक अडथळे दूर होण्यास मदत झाली आहे.”
केलॉग्ज इंडिया चे एमडी आणि फिक्की खाद्य संस्करण समितीचे सह अध्यक्ष श्री मोहित आनंद यांनी सांगितले की भारतातील खाद्य प्रक्रिया उद्योगाला ५०० बिलियन रूपयांचे क्षेत्र बनण्याची संधी आहे आणि यामुळे केवळ शेतकर्यांचेच उत्पन्न दुप्पट होणार नाही तर यामुळे रोजगार, पायाभूत सुविधां मध्येही वाढ होऊन लोकांचे आरोग्य आणि पोषणही वाढण्यास मदत होऊ शकेल.
फिक्की सेंटर ऑफ एक्सेलन्स ऑन न्युट्रिशन ची या वेळी सुरूवात करण्यात आली. सर्व महत्त्वपूर्ण घटकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण होऊन पोषण आणि रिफॉर्म्युलेशन विषयीही यातून जागरूकता निर्माण करण्यावर जोर देण्यात आला.
संपूर्ण दिवस सुरू असणार्या या परिषदेमध्ये खाद्य प्रक्रिया क्षेत्राच्या भविष्या विषयी चर्चा करण्यात आली व या मध्ये क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. या परिषदेच्या माध्यमातून बाजारपेठेला नाविन्यपूर्ण गोष्टींवर चर्चा करण्यासाठी मंच उपलब्ध करून देण्यात आला तसेच क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यावर जोर देण्यात आला. यावेळी अन्न वाया न जाण्या विषयी चर्चा करण्यात आली तसेच खाद्य प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी शाश्वत उपायांवरही चर्चा करण्यात आली.
Comments
Post a Comment