बहुप्रतिक्षित एमव्ही अगस्टा टूरिझ्मो वेलोस ८०० सादर
मोटोरालतर्फे नवी मुंबईतील नवीन डिलरशीपच्या उद्घाटनप्रसंगी बहुप्रतिक्षित एमव्ही अगस्टा टूरिझ्मो वेलोस ८०० सादर
· कायनेटिकच्या मोटोरालतर्फे रेसिंगचा उत्साह असलेली एकमेव टूरर 'टूरिझ्मो वेलोस ८००' सादर
· टूरिझ्मो वेलोसमध्ये उत्तम राइडिंग आनंद व अनंत अंतराच्या प्रवासासाठी परिपूर्ण वैशिष्ट्ये
· या नवीन गतीशील आणि कॉम्पॅक्ट, स्पोर्टी टूरिंग बाइकमध्ये इन-लाइन तीन सिलिंडर इंजिनची शक्ती आणि काऊंटर रोटेटिंग क्रँकशाफ्ट असलेली एकमेव टूरिंग सुपरबाइक
· टूरिझ्मो वेलोसची एक्स-शोरूम किंमत १८.९९ लाख रूपये
· मोटोरालतर्फे पहिल्या तीन ग्राहकांसाठी १६.९९ लाख रूपयांची खास ऑफर
· कायनेटिकच्या मोटोरालतर्फे नवी मुंबईमध्ये सहाव्या मल्टी-ब्रॅण्ड सुपरबाइक्स शोरूमचे उद्घाटन
टूरिंग मोटरसायकलच्या रचनेमध्ये एमव्ही अगस्टाचा रेसिंग वारसा समाविष्ट करण्याच्या दृष्टिकोनासह टूरिझ्मो वेलोस सुरेखरित्या डिझाइन करण्यात आली आहे. या आरामदायी टूरिंग बाइकमध्ये रेसिंग मशिनची उत्तम वैशिष्ट्ये, उत्तम भार क्षमता आणि इंधन कार्यक्षमतेसह एमव्हीची नैसर्गिक गती व गतीशीलता आहे.
टूरिझ्मो वेलोसला आयकॉन बनवणारी काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
· ७९८ सीसी, थ्री-सिलिंडर इंजिन
· १०,१५० आरपीएममध्ये ११० एचपीची अधिकतम शक्ती
· ७,१०० आरपीएममध्ये ८० एनएमचे उच्च टॉर्क
· टूरिझ्मोचे टॉर्क कर्व्ह अधिक कामगिरीसाठी कमीत-कमी ३८०० आरपीएममध्ये ९० टक्के टॉर्कची निर्मिती करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे
· ८ लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल
· बॉश ९ प्लस एबीएस
· ब्रेम्बो फ्रण्ट व रिअर डिस्क ब्रेक्स
· मार्झोची फुली अॅडजस्टेबल फ्रण्ट सस्पेंशन्स, सॅच्स फुली अॅडजस्टेबल रिअर सस्पेंशन्स
· इमोबिलायजर, क्रूझ कंट्रोल, ब्ल्यूटूथ आणि अॅडजस्टेबल विंड शिल्ड
· काऊंटर रोटेटिंग क्रँकशाफ्ट असलेली एकमेव टूरर
· रिअर व्हिल मिटीगेशन उचलून घेते. सिस्टम ब्रेक दाबल्यानंतर मागील चाक वर उचलण्याला टाळण्यासाठी फ्रण्ट ब्रेकवर लावण्यात आलेल्या दाबावर नियंत्रण ठेवते.
या बाइकमध्ये राइड बाय वायर थ्रोटल देखील आहे आणि विभागातील ही एकमेव बाइक आहे, जिच्यामध्ये वर-खाली होणा-या क्विक-शिफ्टरसह हायड्रोलिक संचालित स्लिपर क्लच आहे. टूरिझ्मोचा लुक अत्यंत स्टायलिश आहे आणि या बाइकमध्ये कामगिरी व सुरक्षिततेची उत्तम वैशिष्ट्ये आहेत. बारकाईने डिझाइन करण्यात आलेली वैशिष्ट्ये, जसे कॉम्पॅक्ट साइड पॅनिअर्स (अतिरिक्त अॅक्सेसरीज म्हणून खरेदी करता येऊ शकतात), हि-याच्या आकाराप्रमाणे एलईडी हेडलाइट्स, मोठ्या आकाराची फ्यूएल टँक, टर्न इंडिकेटर्स असलेले हँड गार्डस् आणि सुरेखरित्या तयार करण्यात आलेली टायर रचना एमव्ही अगस्टाच्या कारागिरी व नाविन्यपूर्ण मूल्यांना उच्च स्तरावर घेऊन जातात. ज्यामुळे ही बाइक जगातील सर्वात प्रगत स्पोर्टस् टूरर्सपैकी एक आहे.
नवीन टूरिझ्मो वेलोसची एक्स–शोरूम किंमत १८.९९ लाख रूपये आहे आणि ग्रे व रेड अशा दोन रंगांमध्ये भारतात उपलब्ध असेल.
मोटोरालने टॅरिझ्मो वेलोसच्या पहिल्या तीन ग्राहकांसाठी १६.९९ लाख रूपयांच्या खास किंमतीची देखील घोषणा केली.
मोटोरालने बेंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद, कोचीन व ठाणे नंतर नवी मुंबईतील प्रमुख ठिकाणी (प्लॉट क्र. ४८, सेक्टर १, शिरवणे, नेरूळ व जुईनगर स्टेशन रोड) त्यांच्या सहाव्या मल्टी-ब्रॅण्ड सुपरबाइक्स शोरूमचे उद्घाटन केले. नवी मुंबईतील मोटोरालचे नवीन डिलरशीप बाइकप्रेमींसाठी एक-थांबा शॉप असेल. या शोरूममध्ये सुपर स्पोर्टस्, स्ट्रीट नेकड्स, क्रूझर्स, हिपस्टर्स, ऑफ रोडर्स, टूरर्स आणि इतर अनेक मोटारसायकल विभागांमधील बाइक्सची विक्री करण्यात येईल.
या जागतिक दर्जाच्या शोरूममध्ये नॉर्टन, एम व्ही अगस्टा, एफ.बी मॉन्डियल व एसडब्ल्यूएम आणि ह्योसंग अशा मोटोरालच्या सहयोगी असलेल्या ब्रॅण्ड्सचा समावेश असेल. आकर्षकरित्या डिझाइन करण्यात आलेले शोरूम ग्राहकांना जागतिक दर्जाची कस्टमर केअर व विक्री-पश्चात्त सेवा देत खरेदी व सेवांचा संपन्न अनुभव देईल.
या घोषणेबाबत बोलताना मोटोराल कायनेटिकचे व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया म्हणाले, ''एमव्ही अगस्टा अव्वल दर्जा व अद्वितीय डिझाइन्स देण्यासाठी आणि राइडरची सुरक्षितता लक्षात घेण्यासाठी ओळखली जाते. टूरिझ्मो वेलोस ८०० मॉडेलमध्ये एमव्हीची सर्वोत्तम रेसिंग वैशिष्ट्ये आहेत. ही बाइक लांबच्या प्रवासांसाठी आरामदायी व सुरक्षित राइड देते. ही बाइक गतिशील व कॉम्पॅक्ट असून आरामदायी आहे आणि नेहमीच नियंत्रणात असते. टूरिझ्मो वेलोसमध्ये उत्तम राइडिंगचा आनंद आणि अनंत अंतराच्या प्रवासासाठी परिपूर्ण अशी वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये बाइकला सर्वोत्तम एमव्ही बनवतात.
टूरिझ्मोच्या सादरीकरणासह मोटोरालमध्ये आम्ही पुन्हा एकदा भारतातील राइडर्ससाठी शक्ती, गती व कामगिरीचे अद्वितीय मिश्रण असलेल्या सर्वात आयकॉनिक व अनोख्या बाइक्स सादर करण्याचा आमचा उद्देश दर्शवला आहे.''
ते पुढे म्हणाले, ''हा दिवस आमच्यासाठी अधिक आनंददायी आहे. आम्ही नवी मुंबईतील रेडमन सुपर ड्राइव्ह्स प्रा. लि.सोबत आमच्या सहयोगाची घोषणा केली आहे. नवीनच उद्घाटन करण्यात आलेल्या शोरूमसह नवी मुंबईमधील आमच्या मोटोरालचे श्री. आनंद रेड्डी व श्री. आशिष पाटील हे खास डिलर्स असण्याचा आम्हाला आनंद होत आहे.
आमच्या व्यवसायामध्ये आम्ही नेहमीच ग्राहकांना प्राधान्य दिले आहे. ही नवीन डिलरशीप दोन उत्साही भागीदारांच्या सहयोगाने ग्राहकांना एकाच छताखाली पाच अव्वल आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सचा अद्वितीय अनुभव देईल. भारतभरातील सर्व बाइकप्रेमी आम्ही ऑफर करत असलेल्या उत्पादनांच्या संपूर्ण रेंजसाठी आमच्या डिलरशीप्समध्ये जागतिक दर्जाची विक्री, सेवा व स्पेअर पार्टस् मिळण्याची खात्री बाळगू शकतात.''
रेडमन सुपर ड्राइव्ह्स प्रा. लि.चे संचालक श्री. आनंद रेड्डी म्हणाले, ''कायनेटिक हा देशातील सर्वात जुन्या ब्रॅण्ड्सपैकी एक आहे. आम्हाला अभिमान वाटत आहे की, त्यांनी या रोमांचक प्रवासामध्ये भागीदार म्हणून आमची निवड केली आहे. सुपरबाइक विभाग केवळ व्यवसायापुरता मर्यादित नाही तर त्यामध्ये बरीच पॅशन सामावलेली आहे. याच कारणामुळे आम्ही आज येथे आहोत. रेडमन सुपर ड्राइव्हमध्ये आम्ही आमच्या कौशल्यपूर्ण कर्मचा-यांच्या मदतीने ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजा पूर्ण करण्याची खात्री घेऊ. आमचे कुशल कर्मचारी त्यांना आमचे शोरूम व वर्कशॉपमध्ये जागतिक दर्जाची विक्री व सेवांचा अनुभव देतील.''
कायनेटिकची मोटोराल ही भारतातील एमव्ही अगस्टा, नॉर्टन, एसडब्ल्यूएम, एफबी मॉन्डियन आणि ह्योसंग बाइक्सची विशेष वितरक आहे. कंपनीचे सध्या ठाणे-मुंबई, हैद्राबाद, चेन्नई, बेंगळुरू व कोचीमध्ये मल्टी-ब्रॅण्ड शोरूम्स आहेत. मोटोराल विस्तारीकरणाच्या टप्प्यावर आहे. तसेच कंपनी दिल्ली, इंदौर, चंदीगड, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता आणि इतर महत्त्वपूर्ण बाजारपेठांमध्ये शोरूम्स सुरू करण्यासाठी योग्य भागीदारांचा शोध घेत आहे.
Comments
Post a Comment