ओपीजीडब्ल्यू स्ट्रिंगसाठी ‘स्कायरोब’ रोबोटिक तंत्रज्ञान
स्टरलाइट पॉवरतर्फे उच्च व्होल्टेज लाइनवर सुरक्षित आणि कार्यक्षम
ओपीजीडब्ल्यू स्ट्रिंगसाठी ‘स्कायरोब’ रोबोटिक तंत्रज्ञान
स्टरलाइट पॉवर या जगातील अग्रणी वीज प्रसारण मालमत्ता विकासक कंपनीने विद्युत प्रवाह सुरु असलेल्या (‘लाईव्ह-लाइन’) परिस्थितीत उच्च व्होल्टेज उर्जा ट्रांसमिशन लाइनवर ऑप्टिकल ग्राउंड वायर (ओपीजीडब्ल्यू)बसविण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. भारतामध्ये प्रथमच विद्यमान अर्थ वायर बदलण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ऑप्टिकल ग्राउंड वायर (ओपीजीडब्ल्यू) स्ट्रिंगिंगसाठी स्कायरोबचा उपयोगकेल्याने सुरक्षा आणि वेग वाढेल तसेच प्रकल्पांची गुणवत्ताही वाढेल. तसेच स्कायरोब विद्यमान अर्थ वायर आणि ट्रांसमिशन लाइनच्या कंडक्टर्सचे दृश्य निरीक्षण आणि हेल्थ मॉनिटरिंग करू शकते.
गुरगांव - भिवडी येथील ४००kV लाईनवर ऑप्टिकल ग्राउंड वायर (ओपीजीडब्ल्यू) स्ट्रिंगिंगसाठी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचा शुभारंभ करताना स्टरलाइट पॉवरचे समूह प्रमुख श्री. प्रवीण अगरवाल यांनी सांगितले कि, "इनोव्हेशन हे एक मूलभूत मूल्य आहे जे आम्हाला तंत्रज्ञानाच्या सीमांपलीकडे जाऊन स्टेट ऑफ दि आर्ट सोल्युशन्स विकसित करण्यासाठी, वेळ, जागा आणि भांडवलाच्या चौकटीतून ग्राहकांच्या समस्यांना संबोधित करण्यासाठीप्रेरित करते. आम्ही सुरक्षिततेवर अधिक भर देतो आणि हे आमच्या संपूर्ण समूहासाठी खूप महत्वपूर्ण आहे."
Comments
Post a Comment