एसबीआय कार्डने आपल्या मोबाइल अॅपवर दाखल केली 'ईला' चॅटबोट सुविधा;

एसबीआय कार्डने आपल्या मोबाइल अॅपवर दाखल केली 'ईला' चॅटबोट सुविधा;
४० हून अधिक सेवा वैशिष्ट्ये देणारी या उद्योगक्षेत्रातील पहिलीवहिली चॅटबोट

~ आता ग्राहकांना ईएमआय कन्व्हर्जनबॅलन्स ट्रान्सफर किंवा क्रेडिट कार्डवरील लोन यांसारखी प्रगत वैशिष्ट्यांचा लाभ घेता येणार ~

~ मिळणार अधिक सुलभतापूर्ण ग्राहकानुभव ~


नवी दिल्ली / मुंबई२९ ऑगस्ट २०१९: क्रेडिट कार्ड इश्‍यू करणारी देशातील अग्रेसर कंपनी एसबीआय कार्डने अधिक चांगला ग्राहकानुभव देण्याच्या हेतूने आपल्या मोबाइल अॅपवर ईला (इंटरअॅक्टिव्ह लाइव्ह असिस्टंट) ही चॅटबोट सेवा सुरू केली आहे. ईला या सेवेमध्ये ४० हून अधिक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये अंतर्भूत आहेत. ग्राहकांना स्वत:हून वापरता येण्याजोग्या सेवांचा संपूर्ण संच देत त्यांच्या सोयींमध्ये भर टाकणारा एसबीआय कार्डचा हा उपक्रम या क्षेत्रातील अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. चॅटबोट यंत्रणेने सुसज्ज प्रगत वैशिष्ट्यांच्या या नव्या आवृत्तीमध्ये ईएमआय कन्‍व्‍हर्जनबॅलन्स ट्रान्सफर करण्याचे पर्याय व क्रेडिट कार्डावर लोन घेणे यांसारखे आपल्या अकाऊंटच्या व्यवस्थापनासाठीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या क्षेत्रात वापरल्या जाणा-या मोबाइल चॅटबोटमध्ये पहिल्यांदाच अशा सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. याखेरीज कंपनीने यात थेट संवादाची अर्थात लाइव्ह चॅटची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे काही विशिष्ट प्रकरणांमध्ये चॅटबोटशी साधत असलेल्या संवादाची साखळी प्रत्यक्ष ग्राहकसेवा अधिका-यांपर्यंत नेता येणार आहे. ईलाची याआधीची आवृत्ती गेल्या वर्षी एसबीआय कार्डच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली होती.

ईलाच्या नव्या वैशिष्ट्यांमुळे ही प्रणाली आणखी जास्त प्रकारच्या प्रश्नांवरील उपाय सांगू शकणार आहे आणि त्यामुळे ग्राहकांना हवी असलेली माहिती अधिक वेगाने मिळणार आहे. इंटेलिजन्स सजेशन चिप्सस्मार्ट क्वेअरी असिस्टचालू संभाषणातील संदर्भ ओळखणारा व संवादी स्वरूपाचा यूआय अनुभव यांसारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंगच्या बळावर चालणा-या वैशिष्ट्यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्राहकांना प्रत्यक्ष माणसाशीच संवाद साधल्यासारखा अनुभव मिळतो. य संवादामध्ये त्यांच्या समस्येचे नेमके संदर्भ अचूकपणे आणले जातात. तसेच ग्राहकांच्या प्रश्नांचे बुद्धिमत्तापूर्ण उत्तर अधिक वेगाने मिळते. 

ईलाबद्दल बोलताना एसबीआय कार्डचे एमडी व सीईओ श्री. हरदयाल प्रसाद म्हणाले, ''आमच्या उत्पादनांमध्ये व सेवांमध्ये सतत नवनव्या सुधारणा घडवून आणण्यासाठी व त्यायोगे आमच्या ग्राहकांना अतुलनीय अनुभव मिळवून देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रयत्न एसबीआय कार्डकडून नेहमीच केले जात असतात. आपली सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी आमच्या चॅटबोटची अधिक स्मार्ट आवृत्ती प्रकाशित करत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. ही सेवा आता आमच्या मोबाइल अॅपवरही उपलब्ध असणार आहे. ईला आणि अॅप यांना एकत्र आणण्याच्या या प्रयोगाचे ग्राहकांनीही उत्तम प्रकारे स्वागत केले आहे. अॅप वापरणा-या ग्राहकांच्या संख्येत झालेली सरासरी ७ पट वाढ आणि यूजर्सकडून विचारल्या जाणा-या प्रश्नांच्या सरासरी संख्येत झालेली ८ पट वाढ हे त्याचेच द्योतक आहे. अनेक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेला हा चॅटबोट म्हणजे या उद्योगक्षेत्रातील एक क्रांतीकारी प्रयोग आहे व या प्रणालीमुळे आम्ही सर्वोत्कृष्ट ग्राहकानुभव पुरवू शकणार आहोत. आम्ही चिकाटीने केलेले प्रयत्न आणि डिजिटल परिवर्तनामध्ये केलेली गुंतवणूक यांचा हा परिणाम आहे. या दिशेने आमचा प्रवास यापुढेही असाच सुरू राहणार आहे व या प्रवासामध्ये आम्ही एआय आणि रोबोटिक्ससारख्या तंत्रज्ञानामध्ये दडलेल्या शक्यतांचा असाच धांडोळा घेत राहणार आहोत.''

ईला ही प्रणाली मोबाइल अॅपवर डिजिटल असिस्टंट म्हणून काम करते. प्रश्नोत्तरांच्याउपाययोजना सुचविण्याच्या व ग्राहकांना योग्य मोबाइल अॅप स्क्रिनकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या माध्यमातून ही सेवा अनेक सेल्फ सर्व्हिस पद्धतीची अर्थात स्वत:हून वापरता येण्याजोगी वैशिष्ट्ये पुरवते. यूजर्सनी आपल्या मोबाइल अॅपच्या कोणत्याही स्क्रीनवर ईलाला पाचारण केल्यास तिच्याशी त्या विशिष्ट स्क्रीनवरील माहितीच्या संदर्भात संवाद त्यांना साधता येईल. उदाहरणार्थ, ग्राहकांनी रिवॉर्डशी संबंधित स्क्रीनवरील ईलाच्या आयकॉनवर क्लिक केल्यास ईला त्यांना रिवॉर्डविषयी वारंवार विचारल्या जाणा-या प्रश्नांचे (FAQ) पान उघडून देईल,ज्यामुळे त्यांच्या शंकाचे चटकन निरसन होऊ शकेल.

एसबीआय कार्डच्या या चॅटबोटला विविध प्रकारच्या चौकशींसंबंधात ग्राहकांशी बुद्धिमत्तापूर्ण संवाद साधण्याच्या दृष्टीने सुसज्ज करण्यात आले आहे. या पायाभूत वैशिष्ट्याचा आधार घेऊन विकसित करण्यात आलेल्या नव्या आवृत्तीमध्ये एखाद्या प्रश्नाशी संबंधातील पुढल्या संभाव्य शंकेवरचा सर्वोत्तम पर्याय ओळखून तो ग्राहकांना सुचविण्याचीही क्षमता जोडण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना योग्य उत्तर शोधण्यासाठी लागणारा वेळ आणखी कमी होणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाला इंटरनॅशनल कार्डची सुविधा सुरू करून घ्यायची असेल तर ईला त्या ग्राहकाला आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबरशी कार्ड कसे जोडावेआंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी शुल्कांची आकारणी इत्यादी गोष्टींचे पर्यायही सुचवेल. एसबीआय कार्डची ही चॅटबोट सेवा सुरू झाल्यापासून तिने १.४ कोटी शंकांचे समाधान ९७% हून अधिक अचूकतेने केले आहे.

ईलाची ठळक वैशिष्ट्ये

  • लाइव्ह चॅट – ईला प्रणालीला लाइव्ह चॅट एजंट या वैशिष्ट्याने सुसज्ज करण्यात आले आहे. त्यामुळे ईलाशी सुरू संवाद सुरू असताना एखाद्या शंकेचे निरसन करण्यासाठी मानवी हस्तक्षेपाची जरूर भासल्यास हा संवाद कोणत्याही व्यत्ययाशिवाय प्रत्यक्ष संबधित अधिका-याकडे हस्तांतरीत केला जाऊ शकतो. 
  • इंटेलिजन्ट सजेशन चिप – या वैशिष्ट्यामुळे ग्राहकांच्या शंकेचे निरसन झाल्यानंतर त्यानंतर त्यांना कोणता प्रश्न पडू शकेल हे ओळखले जाते व त्या प्रश्नाच्या सर्वोत्कृष्ट संभाव्य पर्यायाकडे नेले जाते.
  • कन्टेक्स्ट अवेअर – या वैशिष्ट्यामुळे ईला एकाचवेळी अनेक संदर्भांविषयी बोलू शकते त्यामुळे हे संभाषण मानवी संभाषणासारखेच नैसर्गिक भासते. उदाहरणार्थ – एखादा ग्राहक बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करू शकतो व ते करत असतानाच वार्षिक शुल्क किती आहे हे तपासू शकतो व पुन्हा पहिल्या पानावर येऊन बॅलन्स ट्रान्सफरचे काम पूर्ण करू शकतो.
  • ईलामध्ये ग्राहकांना अनेक कॉन्व्हर्सेशनल यूआय अनुभव देण्याची क्षमता आहे. उदाहरणार्थ, यातील स्मार्ट क्वेअरी असिस्ट नावाच्या वैशिष्ट्यामुळे ग्राहकांनी आपल्या शंकेशी संबंधित प्रश्न अर्धवट एंटर करताच सर्वाधित सुयोग्य प्रश्नांचे पर्याय ही प्रणाली स्वत:हून सुचवते. एखाद्या प्रश्नाची अनेक उत्तरे असल्यास क्लिकेबल इंटेन्ट्सद्वारे ग्राहकांना तीही सुचवली जातात व एखाद्या शंकेचे समाधान करण्यासाठी चारहून अधिक पाय-या वापराव्या लागणार असतील तर यात व्हिडिओ आन्सर्स हा पर्याय दिला जातो.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE