स्टाईल आयकॉन 2019 या फिनिक्स मार्केटसिटीच्या फॅशन एक्स्ट्राव्हगान्झाने मुंबईकरांना लावले वेड

6 सत्रे... 5000 हून अधिक उमेदवार... 50 हून अधिक ब्रॅण्ड भागीदाऱ्या आणि शहरातले सर्वांत हॅपनिंग डेस्टिनेशन
मुंबई – स्टाईल आयकॉन 2019 हा फिनिक्स मार्केटसिटीचा सर्वांत लक्षवेधी फॅशन एक्स्ट्राव्हगान्झा इवेंट यंदा नव्या दमाने पुन्हा आपल्या भेटीला आला आहे. फिनिक्स मार्केटसिटी पुणे यांची ही संकल्पना असून सहा वर्षे जुन्या या मालमत्तेबद्दल केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अधिकाधिक बोलले जाते ते त्यांच्या वार्षिक फॅशन इवेंटमुळेच. महाराष्ट्रभरातून या इवेंटला भरघोस प्रतिसाद मिळत असून यंदाच्या सातव्या सत्रातही हे व्यासपीठ औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि मुंबई या शहरांत वाढवण्यात आले आहे.
फिनिक्स मार्केटसिटी कुर्ला येथे झालेल्या निवड फेऱ्यांमध्ये 100 हून अधिक उमेदवारांनी रॅम्पवॉक केला. यावेळी परिक्षकांच्या फळीत एम टीव्ही स्प्लिट्सव्हिला विजेती स्कार्लेट रोस, अर्शिन मेहता - मॉडेल आणि विविध जाहिरातींमधून झळकणारा चेहरा, परी सैनी - रनवे मॉडेल & माजी स्प्लिट्सव्हीला स्पर्धक, विशाल रास्किन्हा - सेलिब्रिटी टीव्ही अँकर, सरंजित सिंग - स्टाईल आयकॉन सिझन ५ चे विजेते यांचा सहभाग होता. मुंबईच्या स्पर्धकांमधील विजेता शोधण्यासाठी परिक्षकांना खूप कष्ट घ्यावे लागले.
या उपक्रमाबद्दल बोलताना पुण्यातील फिनिक्स मार्केटसिटीचे संचालक अरूण अरोरा म्हणाले, स्टाईल आयकॉन हा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा इवेंट बनला आहे. सेल्फ एक्स्प्रेशनसाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. यापूर्वी स्टाईल आयकॉनसारखे या शहरातल्या फॅशनप्रेमी लोकांसाठी कोणतेही एन्गेजमेण्ट व्यासपीठ नव्हते. या व्यासपिठामुळे इथले फॅशनप्रेमी त्यांची स्टाईल जगाला दाखवू शकतात आणि चार लोकांत नवी ओळख निर्माण करू शकतात. इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि जिद्द असलेल्यांना काहीतरी करून दाखवण्याची संधी या व्यासपिठामुळे मिळाली आहे.
सर्व शहरांतील निवडफेऱ्या पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रवेशांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार असून पुढील फेरीसाठी तज्ञ फॅशनिस्टकडून अंतिम उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना प्रसिद्ध फॅशन आयकॉन संदीप धर्मा मार्गदर्शन करतील.
महाराष्ट्रभरातून निवडण्यात आलेल्या अंतिम उमेदवारांमध्ये स्टाईल आयकॉन 2019, श्री. व श्रीमती. पॉप्यूलर, सर्वोत्कृष्ट हास्य आणि श्री. व श्रीमती फोटोजेनिक आदी किताबांसाठी लढत होणार आहे.
60 दिवस चालणाऱ्या या इवेंटमध्ये महाराष्ट्रभरातून 40 स्पर्धक ग्रॅण्ड फिनालेच्या दिवशी रॅम्पवर चालणार आहेत. 30 नोव्हेंबर रोजी पुण्यातल्या फिनिक्स मार्केटसिटी या लक्झरी डेस्टिनेशनवर अंतिम फेरी रंगणार आहे.

Comments
Post a Comment