“आयओबी हेल्थ केअर प्लस इन्शुरन्स पॉलिसी”च्या ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ
“आयओबी हेल्थ केअर प्लस इन्शुरन्स पॉलिसी”च्या ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ
चेन्नई, 24 ऑक्टोबर 2019: इंडियन ओव्हरसीज बँकेने ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आयओबी हेल्थ केअर इन्शुरन्स पॉलिसीचा शुभारंभ केला आहे. युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.तर्फे दिल्या जाणाऱ्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी या माध्यमातून सर्व शाखांमधून जारी केल्या जातील.
इंडियन ओव्हरसीज बँक हेल्थ केअर प्लस पॉलिसी (आयओबी एचसीपी) हा को-ब्रँडेड हेल्थ इन्शुरन्स युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीने खास आयओबी ग्राहकांसाठी तयार केला आहे. यात 50,000 रु. ते 15 लाख असा विमा काढता येतो.
ग्राहकांना आयओबी शाखांमध्ये तात्काळ हा विमा दिला जाईल. स्वत:, जोडीदार, अवलंबून असलेली मुले, पालक यांचा या विम्यात समावेश करता येईल.
इंडियन ओव्हरसीज बँक हेल्थ केअर प्लस पॉलिसी (आयओबी एचसीपी) ही एक आगळीवेगळी फॅमिली फ्लोटर पॉलिसी आहे. यात 50 वर्षांपर्यंत कोणत्याही वैद्यकीय चाचणीशिवाय विमाधारकाच्या वयानुसार प्रीमिअम आकारला जातो.
आयओबी हेल्थ केअर प्लस पॉलिसीच्या सादरीकरणाबद्दल युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.चे अध्यक्ष श्री. ओ. एन. सिंग म्हणाले की युनिव्हर्सल सोम्पो आणि आयओबीचे संबंध दशकभराहून अधिक काळचे आहेत आणि बँकेसोबत सखोल पातळीवर काम करत इंडियन ओव्हरसीज बँकेच्या ग्राहकांना आमची उत्पादने उपलब्ध करून देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ग्राहकांना पॉलिसी जारी करण्याचा वेळ कमीतकमी व्हावा यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. बँकेच्या कोअर सीस्टमसोबत मेळ खात फार कमी विमा कंपन्या तात्काळ विमा देऊ करतात. बँक आणि इन्शुरन्स कंपनी या दोहोंसाठी ही हितकारक स्थिती आहे.
इंडियन ओव्हरसीज बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कर्णम सेकर म्हणाले की युनिव्हर्सल सोम्पोसोबत असलेल्या बँकेच्या दिर्घकाळच्या संबंधांमुळे आयओबी ग्राहकांना नाविन्यपूर्ण विमा उत्पादने तात्काळ देणे शक्य झाले. युनिव्हर्सल सोम्पोमध्ये गुंतवणूक करण्याचा बँकेचा निर्णय अगदी योग्य ठरला. त्यामुळे, कमी कालावधीत नफा झाल्याचे, त्यांनी नमूद केले. इंडियन ओव्हरसीज बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कर्णम सेकर यांनी युनिव्हर्सल सोम्पोच्या विमा उत्पादनांना लोकप्रियता मिळवून देण्याचा सल्ला बँकेच्या टीमला दिला आहे. त्यामुळे, बँकेच्या व्याज उत्पादनात लक्षणीय वाढ होईल.
Comments
Post a Comment