फेडरल बँकेच्या होर्मिस मेमोरिअल फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले गेले आहेत
फेडरल बँकेच्या होर्मिस मेमोरिअल फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले गेले आहेत
30 ऑक्टोबर 2019, मुंबई: फेडरल बँकेने आपल्या होर्मिस मेमोरिअल फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष 2019-20 करिता अर्ज मागवले आहेत. केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रामधील जे विद्यार्थी कृषी विद्यापीठांमधून प्रथम वर्ष एमबीबीएस, इंजिनिअरिंग, बीएससी नर्सिंग, बीएससी कृषी, यासोबत बीएससी (ऑनर्स) कृषी विज्ञानासोबत सहकार आणि बँकिंग तसेच एमबीए करीत आहेत ते या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या आधारावर शासकीय, अनुदानित अथवा स्व-वित्तपुरवठा महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी प्रवेश मिळवला असला पाहिजे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 3,00,000 पेक्षा कमी असले पाहिजे. देशासाठी जीवन अर्पण करणाऱ्या भारतीय सेनादलातील पालकांच्या मुलांसाठी वेगळ्या वाहिनीतून विचार केला जाईल आणि या वर्गातील अर्जदारांसाठी उत्पन्नाची अट लागू नसेल. विस्तृत अर्हता अटी आणि अर्जाच्या नमुना संदर्भासाठी कृपया फेडरल बँकेची वेबसाईट https://www.federalbank.co.in/ corporate-social- responsibility बघावी. अर्जाच्या नमुन्यात मागितलेले आवश्यक दाखले यांच्यासह संपूर्ण भरलेले अर्ज फेडरल बँकेच्या नजीकच्या शाखेत सत्यापनासाठी 31-12-2019 रोजी अथवा त्याअगोदर प्रस्तुत करावे.
फेडरल बँक ही अग्रेसर खासगी क्षेत्रामधील बँक असून त्यांच्या देशभरात 1,251 शाखा आणि 1,934 एटीएम/ रीसायकलर्स पसरलेले आहेत. बँकेचा एकूण व्यवसाय मिश्रण (ठेवी आणि अग्रिम) 31 मार्च 2019 रोजी रु. 2.46 लाख कोटी होती आणि फेडरल बँकेने आर्थिक वर्ष 19 चा निव्वळ नफा रु. 1,244 कोटी मिळवला आहे. फेडरल बँकेचे बसेल III मार्गदर्शक तत्वानुसार भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) 14.14% आहे. फेडरल बँकेची प्रतिनिधी कार्यालये दुबई आणि अबू धाबी येथे असून ते अनिवासी भारतीयांसाठी केंद्र म्हणून कार्यरत आहे. फेडरल बँकेचे IFSC Banking Unit (IBU) गुजरात मधील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी (GIFT CITY) येथे आहे. आपली तत्वे कायम राखतानाच फेडरल बँक स्वत:मध्ये उत्कृष्ट सेवा देणारी संस्था म्हणून परिवर्तन घडवीत आहे. फेडरल बँकेची भविष्य काळासाठी एक सुनिश्चित दूरदृष्टी असून ती त्यांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक आहे.
Comments
Post a Comment