पेंट प्रोटेक्शन फिल्म्स ची सुरूवात करत गरवारे यांनी केली उत्पादन श्रेणीत वाढ


पेंट प्रोटेक्शन फिल्म्स ची सुरूवात करत  
गरवारे यांनी केली उत्पादन श्रेणीत वाढ

मुंबई, ऑक्टोबर २०१९ - गरवारे पॉलिस्टर लिमिटेड (बीएसई:५००६५५- एनएसई:गरवारेपॉलि) या पॉलिस्टर फिल्मच्या आघाडीच्या उत्पादकांपैकी एक असलेल्या कंपनी ने आज भारतात पेंट प्रोटेक्शन फिल्म्सची सुरूवात केल्याची घोषणा केली. अतिशय चांगल्या प्रकारे डिझाईन केलेल्या व सुरक्षेने युक्त असलेल्या या फिल्म मध्ये धक्का सहन करण्याची सर्वाधिक क्षमता असून ही फिल्म क्लियर आणि सेल्फ हिलिंग पेंट प्रोटेक्शन फिल्म आहे.  अतिशय अद्ययावत अशा फिल्म तंत्रज्ञानाचा उपयोग करून संपूर्णत: भारतात तयार करण्यात आलेली ही फिल्म असून कंपनीच्या इन हाऊस तंत्रज्ञानाने युक्त असे हे गरवारे पेंट प्रोटेक्शन फिल्म उत्पादन असून हे उत्पादन भारतीय हवामान आणि रस्त्यांच्या स्थिती नुसार तयार करण्यात आलेले आहे.


सर्वाधिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने डिझाईन करण्यात आलेल्या या गरवारे पेंट प्रोटेक्शन फिल्म चे उत्पादन  हे विशेष रूपाने तयार करण्यात आलेल्या थर्मोप्लास्टिक पॉलियुरेथिन फिल्म (टीपीयू) चा उपयोग करून करण्यात आले आहे. सातत्यपूर्ण विश्वसनीयता आणिकार्यक्षमता असलेली फिल्म गाडीवर लावल्यानंतर वाहनांचे चरे (स्क्रॅच)पडणे आणि डेंट्स पासून संरक्षण तर होतेच पण त्याच बरोबर रस्त्यांवरील दगड व पर्यावरणातील अन्य घटकांपासूनही संरक्षण होते.  हे उत्पादन अतिशय चांगल्या हायड्रोफोबिक आणि सेल्फ हिलिंग (आपोआ पव्यवस्थित होणारी अशी ही फिल्म आहे)वैशिष्ट्यांनी युक्त आहे.  ही फिल्म गाडीवर सहज पणे लावता आणि काढता येत असून यामुळे गाडीच्या रंगावर कोणताही परिणाम होत नाही, त्यामुळे वाहनाचे पुर्नविक्री मुल्य वाढण्यास मदत होते.

यावेळी बोलतांना गरवारे पॉलिस्टर लिमिटेड च्या विक्री विभागाचे संचालक श्री एस. कृष्णन् यांनी सांगितले “ १९८२ पासून गरवारे नी पॉलिस्टर फिल्मचे उत्पादन केले आहे.  आमचे अद्ययावत असे पेंट प्रोटेक्शन फिल्म हे उत्पादन म्हणजे आणखी एक नाविन्यपूर्ण उत्पादन असून हे उत्पादन अतिशय चमकदार फिनिश आणि गाडीचेस्वरक्षणकरणारे आहे. या उत्पादना मुळे वाहनाची अधिकतर सुरक्षा होऊन घर्षण, पक्ष्यांची विष्ठा, दरवाजे घासले जाणे आणि चरे पडण्या पासून गाडीचा बचाव होतो. यामुळे आता बाजारपेठेतील अत्याधुनिक अशा व्हेईकल पेंट प्रोटेक्शन फिल्म बनवणारीभारतातीलपहिलीअशीकंपनीआहे.”

गरवारेच्या या पेंट प्रोटेक्शन फिल्म्स आता महानगरांतील सर्व वितरकांमार्फत उपलब्ध होणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE