जेष्ठ नागरिकांसोबत 'सूर ताल संगीत संध्या'! दिवाळी विशेष संगीत मैफिल!
जेष्ठ नागरिकांसोबत 'सूर ताल संगीत संध्या'!
दिवाळी विशेष संगीत मैफिल!
गायिका अमृता देवधर यांच्या पार्ले पूर्व येथील 'सूर ताल कराओके क्लब'ने खास जेष्ठ नागरिकांसाठी 'दिवाळी संध्या' या मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे पार्ले पूर्व, सुभाष रोड येथे आयोजन केले होते. सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या बहारदार संगीत मैफिलीला रसिकांनी भरभरून दाद दिली. या मैफिलीत अमृता देवधर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकापेक्षा एक अवीट गोडीची लोकप्रिय गाणी सादर करून दिवाळीपूर्व संध्येचा आनंद द्विगुणित केला.
गायिका अमृता देवधर गेली कित्त्येक वर्षे पार्लेकरांसाठी संगीताचे विविध कार्यक्रम आयोजित करीत असतात. त्यांच्या संकल्पनेतून 'सूर ताल कराओके क्लब' साकारला असून या क्लबच्या माध्यमातून त्या सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अग्रेसर असतात. आता पर्यंत त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध ठिकाणी मोफत गाण्याचे कार्यक्रम केले आहेत. तसेच पुढील वर्षभरात पोलिसांच्या पत्नीसाठी आणि आपल्या लष्करातील जवानांसाठी मोफत गाण्याचे कार्यक्रम करण्याचा त्यांनी संकल्प सोडला आहे.
अमृता देवधर यांच्या 'कॅरिओके क्लब'तर्फे दिवाळी संध्येनिमित्त जेष्ठ नागरिकांना दिवाळीचा फराळ आणि मराठी बहारदार गाणी ऐकण्याची संधी उपलब्ध करून या संस्थेने जेष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविला. अमृता देवधर आणि त्यांची हि संस्था सातत्याने समाजातील विविध घटकांसाठी संगीत कार्यक्रमांसोबतच इतरही वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करीत असते.
Comments
Post a Comment