पेंट प्रोटेक्शन फिल्म्स ची सुरूवात करत गरवारे यांनी केली उत्पादन श्रेणीत वाढ


पेंट प्रोटेक्शन फिल्म्स ची सुरूवात करत  गरवारे यांनी केली उत्पादन श्रेणीत वाढ

गरवारे पॉलिस्टर लिमिटेड (बीएसई:५००६५५- एनएसई:गरवारेपॉलि) या पॉलिस्टर फिल्मच्या आघाडीच्या उत्पादकांपैकी एक असलेल्या कंपनी ने आज भारतात पेंट प्रोटेक्शन फिल्म्सची सुरूवात केल्याची घोषणा केली. अतिशय चांगल्या प्रकारे डिझाईन केलेल्या व सुरक्षेने युक्त असलेल्या या फिल्म मध्ये धक्का सहन करण्याची सर्वाधिक क्षमता असून ही फिल्म क्लियर आणि सेल्फ हिलिंग पेंट प्रोटेक्शन फिल्म आहे.  अतिशय अद्ययावत अशा फिल्म तंत्रज्ञानाचा उपयोग करून संपूर्णत: भारतात तयार करण्यात आलेली ही फिल्म असून कंपनीच्या इन हाऊस तंत्रज्ञानाने युक्त असे हे गरवारे पेंट प्रोटेक्शन फिल्म उत्पादन असून हे उत्पादन भारतीय हवामान आणि रस्त्यांच्या स्थिती नुसार तयार करण्यात आलेले आहे.
 सर्वाधिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने डिझाईन करण्यात आलेल्या या गरवारे पेंट प्रोटेक्शन फिल्म चे उत्पादन  हे विशेष रूपाने तयार करण्यात आलेल्या थर्मोप्लास्टिक पॉलियुरेथिन फिल्म (टीपीयू) चा उपयोग करून करण्यात आले आहे. सातत्यपूर्ण विश्वसनीयता आणि कार्यक्षमता असलेली फिल्म गाडीवर लावल्यानंतर वाहनांचे चरे (स्क्रॅच) पडणे आणि डेंट्स पासून संरक्षण तर होतेच पण त्याच बरोबर रस्त्यांवरील दगड व पर्यावरणातील अन्य घटकांपासूनही संरक्षण होते.  हे उत्पादन अतिशय चांगल्या हायड्रोफोबिक आणि सेल्फ हिलिंग (आपोआप व्यवस्थित होणारी अशी ही फिल्म आहे) वैशिष्ट्यांनी युक्त आहे.  ही फिल्म गाडीवर सहज पणे लावता आणि काढता येत असून यामुळे गाडीच्या रंगावर कोणताही परिणाम होत नाही, त्यामुळे वाहनाचे पुर्नविक्री मुल्य वाढण्यास मदत होते.
यावेळी बोलतांना गरवारे पॉलिस्टर लिमिटेड च्या विक्री विभागाचे संचालक श्री एस. कृष्णन् यांनी सांगितले “ १९८२ पासून गरवारे नी पॉलिस्टर फिल्मचे उत्पादन केले आहे.  आमचे अद्ययावत असे पेंट प्रोटेक्शन फिल्म हे उत्पादन म्हणजे आणखी एक नाविन्यपूर्ण उत्पादन असून हे उत्पादन अतिशय चमकदार फिनिश आणि गाडीचे स्वरक्षण करणारे आहे. या उत्पादना मुळे वाहनाची अधिकतर सुरक्षा होऊन घर्षण, पक्ष्यांची विष्ठा, दरवाजे घासले जाणे आणि चरे पडण्या पासून गाडीचा बचाव होतो. यामुळे आता बाजारपेठेतील अत्याधुनिक अशा व्हेईकल पेंट प्रोटेक्शन फिल्म बनवणारी भारतातील पहिली अशी कंपनी आहे.”
 गरवारेच्या या पेंट प्रोटेक्शन फिल्म्स आता महानगरांतील सर्व वितरकांमार्फत उपलब्ध होणार आहेत.  
 गरवारे पॉलिस्टर लिमिटेङ (कंपनी) ची स्थापना चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री एस. बी गरवारे यांनी १९५७ मध्ये सह संस्थापक कै. डॉ. भालचंद्र (आबासाहेब) गरवारे यांच्या सह केली.  कंपनी ने भारतात पॉलिस्टर फिल्म्स तयार करण्याचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आणि १९७६ मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे अद्ययावत उत्पादन केंद्र सुरू केले.  हे केंद्र दक्षिण पूर्व एशियातील पहिला असे हे केंद्र ठरले.  कंपनी तर्फे विविध औद्योगिक वापरा करता पॉलिस्टर फिल्म्सचे उत्पादन करण्याबरोबरच ऑटोमोबाईल तसेच आर्किटेक्चरल उपयोगासाठी जागतिक स्तरावरील सोलर विंडो फिल्म्सचे ही उत्पादन  केले जाते.  गरवारे सन कंट्रोल फिल्म्स चे उत्पादन अत्याधुनिक आयएसओ ९००१:२००८ प्रमाणित उत्पादन केंद्रातून केले जाते.  परिणामी पेट्रोकेमिकल घटकांचा वापर करून संपूर्ण तयार उत्पादनाबरोबरच त्यांच्या विंडो फिल्म्सचेउत्पादन केले जाते.  गरवारे पॉलिस्टर लिमिटेड चे अद्ययावत असे विंडो फिल्म उत्पादन असून त्याच बरोबर लॅमिनेशन लाईन्स मधून  २२ दशलक्ष चौरस फूटांचे उत्पादन करण्याची त्यांची क्षमता आहे.
 गरवारे पॉलिस्टर्स आता जगभरांतील ८० देशात उपलब्ध असून त्यांची विक्री कार्यालये भारत, यूएसए, यूके येथे तर विक्री प्रतिनिधी यूएई, रशिया, चीन, ब्राझिल, ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया येथे आहेत.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202