भारतात व्हेरिकोज व्हेन्सवर आता केवळ 30 मिनिटांत उपचार करता येणार
भारतात व्हेरिकोज
व्हेन्सवर आता केवळ 30 मिनिटांत उपचार करता येणार
मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय ‘द व्हेन सेंटर’ या शिरांवर उपचार करणाऱ्या क्लिनिकने व्हेरिकोज
व्हेन्सवर उपचार करण्यासाठी ‘बायो फिल्म कॉम्प्रेशन’ नावाचे एक नवे तंत्रज्ञान
सुरू केले आहे
मुंबई, 27 नोव्हेंबर, 2019: मुंबईतील द व्हेन सेंटरने रुग्णांना सोईस्कर
असणारे, वापरण्यास सुलभ आणि एकंदरच प्रभावी असणारे नवे कॉम्प्रेशन तंत्रज्ञान उपलब्ध
करून दिले आहे. या नव्या विलक्षण अशा कॉम्प्रेशन तंत्रज्ञानाला बायोफिल्म/कॉम्प्रेशन फिल्म बँडेज
म्हटले जाते. व्हेरिकोज व्हेन्ससाठी शिरांतर्गत उपचार करून
झाल्यावर लगेचच हे आपोआप चिकटणारे, लवचिक, पारदर्शक फिल्म बँडेज त्यावर लावले जाते. व्हेरिकोज व्हेन्सचा गंभीरपणा आणि त्वचेचे एकंदर
आरोग्य यानुसार बायोफिल्म साधारण 2 ते 4 आठवडे टिकून रहाते. पायावर बायोफिल्म लावली असताना देखील व्यक्ती त्यांची
दैनंदिन कामे आणि खेळ, क्रीडा, पोहणे, रोजचा चालण्याचा व्यायाम कोणत्याही विशेष त्रासाशिवाय पार पाडू शकतात. इतर कॉम्प्रेशन पद्धतीत हे शक्य होत नाही. ही बायोफिल्म लावली असताना रुग्ण आंघोळ देखील करू
शकतात. जर्मनी, इटली आणि स्वित्झर्लंड येथील एन्जियोक्लिनिक सेंटर्समधील डॉ. जॉन ख्रिस रॅग, एमडी यांनी 2018 मध्ये या फिल्मचा शोध लावला.
जास्त धोका असणाऱ्या लोकांमधील व्हेरिकोज व्हेन्सची
वाढ रोखण्यासाठी सामान्य कॉम्प्रेशन स्टॉकींग्ज उपयोगी असतात. उपचार केल्या गेलेल्या शिरांवर अगदी शिरांतार्गत
उपचारानंतर देखील सातत्यपूर्ण आणि पुरेसे कॉम्प्रेशन देणे आवश्यक असते. यासाठी साधारण 2 ते 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. पारंपरिकरित्या, कॉम्प्रेशन स्टॉकींग्ज किंवा कॉम्प्रेशन बँडेजेस (क्रेप बँडेजेस)
वापरून अशा प्रकारचे कॉम्प्रेशन (दाब) देण्याची सर्वसाधारण
पद्धत आहे. हे स्टॉकींग्ज घालणे हे अतिशय जिकिरिचे असल्याने
त्यांच्या वापरातील हीच एक मोठी अडचण आहे. ही स्टॉकींग्ज ही उबदार आणि अतिशय घट्ट असल्याने
विशेषकरून भारतीय तापमानात त्यांचा वापर करणे हे रुग्णांसाठी गैरसोईचे असते. यामुळे खाज सुटत असल्याने रुग्ण याचा वापर करणे
थांबवतात आणि त्यामुळे एकंदरच उपचारांचा म्हणावा तसा गुण येत नाही. ऑपरेशननंतर उपचार केलेल्या शिरांवर सूज असताना मध्यम
अथवा तीव्र स्वरूपातील व्हेरिकोज व्हेन्समध्ये हे स्टॉकींग्ज वापरणे वेदनादायी
असते.
रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांवरील इंटरव्हेंशनल
रेडिओलॉजिस्ट आणि व्हेन सेंटर मुंबईचे संस्थापक असणाऱ्या डॉ. सौरभ जोशी यांनी
हे तंत्रज्ञान शिकून घेतले आणि भारतात आणले. बर्लीन येथील डॉ. जोहान ख्रिस रॅग यांच्याकडे त्यांनी
याबाबतचे प्रशिक्षण घेतले आहे. डॉ. जोशी म्हणाले, “भारतात व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास मोठ्या प्रमाणात
आढळून येतो. दरवर्षी दहा दशलक्ष रुग्ण या आजाराने त्रस्त होतात. या अभिनव तंत्राचा भारतीयांना उपयोग होईल. सर्वात मोठ्या व्हेरीकोसाईट्सवर उपचार करण्यासाठी
भारतात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा उपयोग आमच्या केंद्रात केला गेला. या उपचारानंतर मोठ्या अस्वाभाविक व्हेरीकोसाईट्स 30
मिनिटांच्या आताच जवळपास दिसेनाशा झाल्या. पारंपरिक पद्धतीमध्ये यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागतो. इंडोव्हेनस ॲब्लेशन (शिरांतर्गत शस्त्रक्रियेने काढून टाकणे)/ग्ल्यू
(गोंद)/स्क्लेरोथेरपी यासाठीचा बायोफिल्म हा पर्याय नाही. मोठ्या व्हेरिकोज व्हेन्स प्रभावीपणे दाबल्या जात
असल्याने ही उपचार पद्धती जास्त परिणामकारक आहे. आजाराच्या तीव्रतेनुसार रुग्णांना स्टॉकींग्ज घालत
रहावे लागू शकतात. बायोफिल्मचा वापर सर्वच रुग्णांवर करता येऊ शकत नाही.”
Comments
Post a Comment