एनएईएमडी जोश २०१९चा मुंबई पोलिसांना सलाम
एनएईएमडी जोश २०१९चा मुंबई पोलिसांना सलाम
एनएईएमडीच्या जोश २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे उत्साहात समारोप; साजरीकरणा सोबत अधिक चांगल्या समाज निर्माणाप्रती योगदान देणारा एकमेव महाविद्यालयीन महोत्सव
मुंबई, २८ नोव्हेंबर २०१९: जोश २०१९ या मुंबईच्या सर्वात लोकप्रिय आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाने आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये महोत्सवाच्या १४व्या पर्वाच्या ग्रॅण्ड फिनालेचे आयोजन केले. गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंट (जीआयसीईडी) आणि एनएईएमडी अकॅडमी ऑफ इव्हेण्ट मॅनेजमेंट अॅण्ड डेव्हलपमेंटच्या (एनएईएमडी) विद्यार्थ्यांनी आयोजित केले. विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या विविध स्पर्धा: फॅशन शो, डान्स ऑफ इंडिया (बॉलिवुड ग्रुप डान्स), लेट्स टॅप अराऊण्ड द वर्ल्ड (वेस्टर्न नंबर ग्रुप डान्स), बॉडी टॅट्टूइंग, फेस पेन्टिंग, मिस्टर अॅण्ड मिसेस अकॅडेमिया (ब्युटी अॅण्ड पर्सनालिटी पेजंट) आणि स्टुडण्ट आयडॉल (टॅलेण्ट हंट).
फिनाले कार्यक्रमामध्ये दोन महिन्यांपासून सुरू असलेला पोलिस दलाचे आभार मानणारा उपक्रम *'जाबाज सुपरकॉप्स'* चे देखील समरोप झाले. या उपक्रमादरम्यान एनएईएमडीच्या विद्यार्थ्यांनी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील १०० हून अधिक पोलिस स्टेशन्सना भेट दिली आणि सर्व रँक्सच्या पोलिस अधिका-यांना 'सुरक्षा' धागा बांधत मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे 'आभार' मानले. या उपक्रमादरम्यान २५०० हून अधिक पोलिस अधिका-यांपर्यंत पोहोचत त्यांचे आभार मानण्यात आले.
एनएईएमडी विद्यार्थ्यांच्या सेलिब्रेशन्सदरम्यान *मुंबईचे पोलिस उपायुक्त श्री. हरिष बैजल यांना 'सुरक्षा' धागा बांधण्यात आला. तसेच कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबांचा मुंबईसाठी त्यांनी दिलेले बलिदान व योगदानासाठी सन्मान करण्यात आला. *या कार्यक्रमाला बोलताना श्री हरीश बैजल म्हणाले कर्तव्य बजावत असताना आपला जीव गमवावा लागतो हे खेदजनक आहे. एनएएमडीचे विद्यार्थी पोलिसांच्या बलिदानाचे कौतुक करीत आहेत हे पाहून खरोखर आनंद होतो. मला आशा आहे की त्यांनी असे अधिक उपक्रम राबउन समाजासाठी हातभार लावला पाहिजे.*
तसेच यंदा जोश सेलिब्रेशन्सचा भाग म्हणून एनएईएमडीच्या विद्यार्थ्यांनी दिव्यांग मुले व प्रौढांच्या विकासासाठी झटणारी एनजीओ सक्षम सोबत (समदृष्टी, क्षमता विकास एवम् अनुसंधान मंडळ) सहयोग जोडला. या सहयोगाच्या माध्यमातून दिव्यांगजनांची उन्नती व सक्षमीकरणासाठी *एनेबल-ए-थॉनचे* आयोजन करण्यात आले होते.
जोश बाबत बोलताना *एनएईएमडी अकॅडमी ऑफ इव्हेण्ट मॅनेजमेंट अॅण्ड डेव्हलपमेंटचे संचालक श्री. विपुल सोलंकी* म्हणाले, ''दरवर्षी आमचा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव जोश मुंबईच्या उत्साहाला साजरे करण्याच्या अनोख्या थीमसह साजरा केला जातो. विद्यार्थी सहभाग घेणा-या आणि आयोजित करणा-या उच्चस्तरीय स्पर्धांव्यतिरिक्त आम्ही विद्यार्थ्यांना समाजाप्रती योगदान देणारे विचार समोर आणण्यासाठी देखील प्रोत्साहित करतो.
Comments
Post a Comment