ट्रॅव्हल टूर्सच्या कांदिवलीतील नव्या कार्यालयामुळे पश्चिम भारतातील अस्तित्वाला बळकटी
ट्रॅव्हल टूर्सच्या कांदिवलीतील नव्या कार्यालयामुळे पश्चिम भारतातील अस्तित्वाला बळकटी
~ट्रॅव्हल टूर्स या एफसीएम ट्रॅव्हल सोल्युशन्सच्या लीझर ट्रॅव्हल ब्रँडने कांदिवलीमध्ये महावीर नगर येथे आपले चौथे कार्यालय सुरू केले, भारतातील एकूण कार्यालयांची संख्या आता 44 झाली आहे ~
मुंबई, 28 नोव्हेंबर, 2019: ट्रॅव्हल टूर्स या एफसीएम ट्रॅव्हल सोल्युशन्सच्या लीझर ट्रॅव्हल ब्रँडने कांदिवली येथे नव्या स्टोअरचे उद्घाटन करून महाराष्ट्रातील आपल्या अस्तित्वाला बळकटी दिली आहे. ट्रॅव्हल टूर्सचे हे भारतातील 44वे आणि महाराष्ट्रातील 11वे स्टोअर आहे.
बळकट जागतिक नेटवर्क आणि सुट्यांमधील अनुभवाला सुयोग्य रूप देण्यातील तज्ज्ञता यामुळे ट्रॅव्हल टूर्सने ग्राहकांच्या आवडींनुसार खास कार्यक्रम आखण्याची सुविधा देत आयुष्य बदलवून टाकणारा अनुभव दिला आहे. ट्रॅव्हल टूर्सचे ट्रॅव्हल कन्सलटंट प्रवासाबद्दल आत्मियता बाळगतातच. शिवाय, त्यांच्याकडे प्रत्येक सुटीच्या योजनेसाठी खास टिप्स आणि वैयक्तिक सल्ले असतात. ही परंपरा कायम राखत कांदिवलीमधील स्टोअर लक्झ्युरी हनीमूनर्स ते सुयोग्य बजेटमध्ये कुटुंबासह सहलीला जाणारे अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमाने, खास आणि ग्रूप हॉलीडे, हॉटेल्स, कार ट्रान्सफर, व्हिसा, क्रूझ व्हेकेशन, हनीमून पॅकेज, अॅडव्हेंचर हॉलिडे आणि अशा अनेक सुविधा देऊ करेल.
या स्टोअरच्या शुभारंभाबद्दल एफसीएम ट्रॅव्हल सोल्युशन्सच्या ट्रॅव्हल टूर्स या लीझर ट्रॅव्हल ब्रँडचे ब्रँड लीडर श्री. आनंद मेनन म्हणाले, "मुंबई, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर या शहरांमधील ठळक अस्तित्वासह महाराष्ट्र हे आमच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेपैकी एक आहे. शहरातील या भागातील ग्राहकांना आमच्या नव्या स्टोअरसह सेवा देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. पश्चिम भारतातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये आमचे अस्तित्व अधिक ठळक करणे, हेच आमचे विस्तार धोरण आहे. हे स्टोअर आणि आमचे तज्ञ ट्रॅव्हल कन्सलटंट विविध प्रकारच्या, विविध पार्श्वभूमी असलेल्या शहरी प्रवाशांच्या गरजा भागवेल आणि प्रत्येक प्रवाशाच्या गरजांनुसार सुयोग्य अशी योजना आखून दिली जाईल."
या नव्या स्टोअरच्या शुभारंभामुळे मुंबई, दिल्ली, चंदिगढ, जालंधर, अहमदाबाद, वडोदरा, पुणे, बंगळुरु, हैदराबाद, कोची, आणंद आणि कोल्हापूर अशा विविध शहरांमध्ये मालकीच्या शाखा आणि नव्याने सुरू झालेल्या फ्रँचाईझी स्वरुपातील स्टोअर्स असा एकूण आकडा 44 वर पोहोचला आहे.
Comments
Post a Comment