लग्नसराईत प्रेशियस, प्लॅटिनम, जेमस्टोन दागिन्यांच्या मागणीत वाढ
लग्नसराईत प्रेशियस, प्लॅटिनम, जेमस्टोन दागिन्यांच्या मागणीत वाढ
ग्राहकांनी वाढलेल्या किंमती स्वीकारल्यामुळे लग्नसराई व सणासुदीत खरेदीत सुवर्णकाळ
मुंबई, २९ नोव्हेंबर २०१९:- सोन्याकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहिले जात असले, तरी प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी आणि सणासुदीला दागिने खरेदीची परंपरा आवश्यक मानली जाते. हा सकारात्मक ट्रेंड लग्नसराईच्या हंगामातही सुरू राहील अशी अपेक्षा आहे. या लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांची पसंती प्रेशियस आणि जेमस्टोन दागिने, पोल्की, अनकट हिऱ्यांकडे झुकली आहे. आणखी एक सकारात्मक ट्रेंड म्हणजे प्लॅटिनम दागिन्यांची विक्री वाढलेली असून विशेषतः दुहेरी रंगातल्या अंगठ्या, ब्रेसलेट्स, कफ लिंक्स आणि साखळ्या अशा पुरुषांच्या दागिने श्रेणीत पाहायला मिळणाऱ्या दागिन्यांची मागणी वाढली आहे.
श्री. टी. एस. कल्याणरामन, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कल्याण ज्वेलर्स म्हणाले “ या आर्थिक वर्षाची सुरुवात आमच्यासाठी चांगली झाली. अक्षय तृतीयेमुळे खेरदीभावनेला चालना मिळाली, मात्र जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने खरेदीत घट झाली. ऑगस्टच्या अखेरीस सोन्याच्या किंमती स्थिर झाल्यानंतर विक्रीच्या आकड्यात वाढ व्हायला सुरुवात झाली आणि धनत्रयोदशी / दिवाळीमध्ये विकासाचा दुहेरी आकडा गाठून आम्ही अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. ग्राहकांनी वाढलेल्या किंमती स्वीकारल्यामुळे लग्नसराई व सणासुदीचा आणि खरेदीचा सुवर्णकाळ सुरु झाला आहे.”
ग्राहकांची मागणी असंघटित क्षेत्राकडून संघटित दागिने क्षेत्राकडे स्पष्टपणे वळत असल्याचे आम्ही पाहात आहोत. एक ब्रँड या नात्याने कल्याण ज्वेलर्सने सातत्याने ग्राहकांना शिक्षित करणाऱ्या अभियानांवर भर देत संघटित सराफांकडून खरेदी करण्याचे फायदे सांगत ग्राहकांप्रती आपली बांधिलकी जपली आहे असे मत श्री. टी.एस.कल्याणरामन यांनी व्यक्त केले
Comments
Post a Comment