सणासुदीच्या काळात फोर्जिंग तसेच वाहनांचे सुटे भाग बनविणारे उद्योग आनंदापासून वंचित
सणासुदीच्या काळात फोर्जिंग तसेच वाहनांचे सुटे भाग बनविणारे उद्योग आनंदापासून वंचित
· या उत्सवी काळात भारतीय वाहन निर्मात्यांकडून रिटेल विक्रीत 5-7% ची वाढ झाल्याची नोंद
· तरीच ऑक्टोबर 2019 च्या घाऊक विक्रीत ऑक्टोबर 2018 च्या प्रवासी वाहन विक्रीच्या तुलनेत 7-8% ची घट
· फोर्जिंग क्षेत्र 60-65% क्षमतेची सेवा वाहन उद्योगाला देऊ करते, त्यातही सरासरी सर्वच क्षेत्रांत 25 ते 30% नी मागणी घटली असून मागील वर्षी खासगी वाहन प्रकारात 15-18 % सर्वात मोठी घट नोंदविण्यात आली.
जर परिस्थिती जैसे थे राहिली तर उद्योगक्षेत्रात निर्मिती व रोजगारावर गदा येण्याची लक्षणे आहेत, कारण यापूर्वीच काही ओई’ज (ओरीजनल इक्विपमेंट)नी नोव्हेंबर अर्थात 2019 च्या उत्पादनात घट आल्याची घोषणा केली आहे
यंदा सणासुदीच्या काळात म्हणजे नवरात्री, दसरा आणि धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तांवर भारतीय वाहन निर्मातादारांनी विक्रीत 5-7% ची वाढ झाल्याचे नमूद केले. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान विक्रीमध्ये महिन्यागणिक दुप्पट आकड्यांची घसरण दिसली. मात्र ओई (ओरीजनल इक्विपमेंट) ने तयार मालाला उठाव मिळावा यादृष्टीने पूर्वीपेक्षा अधिक सूट देऊ केली आणि त्यानंतर ही वाढ पाहायला मिळाली. वाहन खरेदी घटल्याने वाहनांचे सुटे भाग आणि फोर्जिंग क्षेत्रातील ऑर्डर्स मंदावल्या.
आकडेवारीतून असे समजते की, सर्वोच्च तीन निर्मातादारांच्या कार विक्रीत सणवारांच्या काळात वाढ झाली. देशातील सर्वात मोठे वाहन निर्मातदार मारुती सुझुकी आणि ह्युंदाई यांच्या विक्रीत नवरात्री ते दसऱ्यापर्यंत अनुक्रमे 7% ते 10% ची वाढ झाली. याच कालावधीत धनत्रयोदशीच्या मुहूर्ताकरिता महिंद्राच्या युटीलिटी वेहिकलच्या विक्रीत 100% ची वृद्धी पाहायला मिळाली. रिटेल / डीलर स्तरावर जरी ही वाढ दिसत असली तरीही फोर्जिंग क्षेत्राकरिता चित्र पुरेसे उत्साहवर्धक नाही. 1 एप्रिल 2020 पासून बीएस- VI निकषांत बदल होणार असून त्यामुळे वाहन उत्पादन घटणार आहे. शिवाय तयार करण्यात आलेल्या मालाची विक्री करण्याचा ताणही असेल.
भारतातील फोर्जिंग क्षेत्रातील सर्वोच्च समिती असलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन फोर्जिंग इंडस्ट्री (एआयएफआय) ने वाहननिर्मिती क्षेत्रातून येणाऱ्या ताज्या ऑर्डरच्या घटलेल्या मागणीविषयी चिंता व्यक्त केली. एकीकडे वाहन विक्रीला उतरती कळा लागल्याने त्याची झळ फोर्जिंग क्षेत्रालाही बसते आहे. त्यामुळे मागणीत मोठी घसरण आली असून परिणामी उत्पादनाला कात्री लागली आहे.
भारतीय फोर्जिंग उद्योग $57 अब्ज उलाढाल असलेल्या भारतीय वाहन उद्योगाला प्राथमिक स्वरुपात मदत पुरवतो, ज्याकरिता 60-70% चे फोर्जिंग उत्पादन करण्यात येते. परंतु वाहन विक्रीत कधी नव्हे इतकी मंदी आल्याने 25-30% ची सरासरी घसरण फोर्जिंग क्षेत्राला झेलावी लागते आहे.
या समस्येवर बोलताना एआयएफआयचे अध्यक्ष एस मुरलीशंकर म्हणाले की, “अलिकडच्या सणासुदीच्या पर्वात काही कार निर्मात्यांनी रिटेल स्तरावर बऱ्यापैकी विक्री झाल्याचे नोंदवले. परिणामी डीलर स्तरावर तयार वाहनांना उठाव असल्याचा अनुभव आम्ही घेतला. उत्सवी काळात रिटेल सेल्सचे वाढीव आकडे हे घाऊक/होलसेल विक्रीच्या तुलनेत अधिक असल्याचे स्पष्ट दिसते. मागील दोन तिमाहीत तर विक्री ढेपाळलेलीच होती. त्यानंतर आता ओई (ओरीजनल इक्विपमेंट) ने तयार मालाला उठाव मिळावा यादृष्टीने पूर्वीपेक्षा अधिक सूट देऊ केली आणि त्यानंतर विक्री वाढल्याचे दिसले. निर्मिती स्तरावर उत्पादन आणि मागणी यामध्ये काही हालचाल झाल्याचे दिसले नाही. वाहन विक्री थंडावल्याने फोर्जिंग तसेच वाहनाच्या भागांची निर्मिती उद्योगाला उतरण लागली आहे. सध्या मागणीच नसल्याने तयार माल पडून आहे. यावर उपाय म्हणून आता अनेक फोर्जिंग युनिटनी कामांच्या तासांमध्ये आणि निर्मितीला कात्री लावलेली पाहायला मिळते. जर स्थितीत सुधारणा झाली नाही तर निर्मितीत अधिक नुकसान येऊन नोकऱ्यांवर गदा येण्याची चिन्हे आहेत.”
Comments
Post a Comment