एअरटेल पेमेंट्स बँकेतून तुम्ही आता 24x7 एनईएफटी (NEFT) ट्रान्सफर करू शकतात

एअरटेल पेमेंट्स बँकेतून तुम्ही आता 24x7 एनईएफटी (NEFT) ट्रान्सफर करू शकतात
मुंबई26 डिसेंबर2019: भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने एअरटेल पेमेंट्स बँक ग्राहक आता दिवसाच्या कोणत्याही वेळी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटीसुविधेचा वापर करू शकतील. ही सुविधा ग्राहकांना 24xतसेच सुट्टीच्या दिवशीही उपलब्ध असेल जेणेकरुन कुठूनहीकोणत्याही वेळी कोणत्याही बँकेतून पैसे मिळऊ किंवा पाठविणे शक्य होणार आहे.
एअरटेल पेमेंट्स बँकेचे ग्राहक एअरटेल थँक्स अॅप किंवा एअरटेल पेमेंट्स बँकेच्या वेबसाइटच्या बँकिंग विभागाचा वापर करुन एनईएफटीमार्फत फंड ट्रान्सफर करू शकतात. त्यासाठी त्याना ‘ट्रान्सफर मनीचा’ आणि त्या नंतर  ट्रान्सफर टू बँक पर्याय निवडण्याची आवश्यकता आहे त्यानंतर लाभार्थीना नोंदणी करण्यासाठी एक स्क्रीन दिसेलएकदा लाभार्थी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ग्राहक सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकतात.
एअरटेल पेमेंट्स बँकेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्रीगणेश अनंतनारायणन म्हणाले, “आम्ही ग्राहकांना एक सक्षम  सुरळीत बँकिंगचा अनुभव देण्यास वचनबद्ध आहोतआम्ही आरबीआयच्या आदेशाचे स्वागत करतो कारण यामुळे आमच्या ग्राहकांना कोणत्याही वेळी एनईएफटी मोडचा वापर करून कोणत्याही बँक खात्यात पैसे सहजपणे ट्रान्सफर करता येतीलयामुळे ग्राहकांच्या एकूणच ऑनलाइन बँकिंग अनुभवात भर पडेल. ”
यूपीआयआयएमपीएसडेबिट कार्ड आणि वॉलेट यासारख्या अनेक सोल्यूशन्सनी एअरटेल पेमेंट्स बँकत तुम्ही डिजिटल पेमेंट्स आणि मनी ट्रान्सफर करू शकतात.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24