अलीयान्झ--शापूरजी पालोनजीच्या सहयोगातून 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये वेव्हरॉक कॉम्प्लेक्सचे अधिग्रहण

अलीयान्झ--शापूरजी पालोनजीच्या सहयोगातून 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये वेव्हरॉक कॉम्प्लेक्सचे अधिग्रहण

मुंबई 24 डिसेंबर 2019: एसपीआरईएफ II पीटीई. लि. या अनेक अलियान्झ कंपन्यांच्या वतीने काम करणाऱ्या अलियान्झ रिअल इस्टेट आणि शापूरजी पालोनजी समूहच्या सहयोगाने तयार झालेल्या कंपनीने टीएसबी बिझनेस पार्क्स (हैद्राबाद) प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीच्या 100% सेक्युरिटीज 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे मूल्य देऊन हस्तगत केल्या आहेत. या कंपनीकडे वेव्हरॉक या भारतातील हैद्राबाद येथील विशेष आर्थिक झोन (एसईझेड) ची मालकी आहे आणि या झोनचा कार्यभार आणि देखभाल हीच कंपनी करत आहे.   

एसपीआरईएफ II पीटीई. लि. ही सिंगापूर येथील कंपनी असून भारतील कार्यालयीन बाजार हे त्यांचे उद्दिष्ट आहे.  2017 मध्ये पूर्ण झालेल्या वेव्हरॉकमध्ये एकूण चार कार्यालय टॉवर्स असून त्यांचे एकूण भाडेतत्त्वावर देण्याचे क्षेत्र हे अंदाजे 2.4 दशलक्ष चौरस फूट इतके आहे.  ही मालमत्ता जलद गतीने विकास होत असलेल्या गचीबोली या आयटी हब असलेल्या आर्थिक जिल्ह्यात आहे आणि हैद्राबादमध्ये त्यांनी रोजगार संधी उपलब्ध केल्या आहेत.  ही मालमत्ता संपूर्णपणे भरलेली असून त्यात अॅपलटीसीएसअक्सेन्चरडीबीएस आणि जीएपी आयटी असे काही मोठे भाडेकरू आहेत.   

डेव्हलप-टू-कोअरठराविक भावातील भावी खरेदी आणि स्थिर किंवा मालमत्ता स्थिर करण्याचे  एकत्रीकरण प्राप्त करून सहा टिअर एका शहरात दीर्घ कालीन रोख प्रवाह उत्पादक कार्यालय पोर्टफोलियो तयार करून रचनात्मक कलाचा फायदा करून घेण्याचे एसपीआरईएफचे धोरण आहे. मुंबईबंगळूरूहैद्राबादपुणेचेन्नई आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र या सहा शहरांना त्यांनी लक्ष्य केले आहे. एसपीआरईएफ II कडे त्यांच्या गुंतवणूकदारांकडून 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची इक्विटी वचनबद्धता आहे. 

अलियान्झ रिअल इस्टेटचे आशिया पॅसिफिक सीईओ रिषभ देसाई म्हणाले, “हा भारतातील एक मोठा व्यवसायिक विकास आहे आणि 24/7 जागतिक शहरांतील अलियान्झच्या कार्यालय पोर्टफोलियोमधील ही एक विलक्षण वाढ आहे.  एसपीआरईएफ II मध्ये आमची पहिली गुंतवणूक असणारी एसपी इन्फोसिटी पुणे ही अपेक्षित व्यवसाय योजनेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करत आहे.  भारतातील कार्यालय गुंतवणूक ही सातत्याने आकर्षक जोखीम-समतोल परतवा देऊ करत आहे.”         
शापूरजी पालोनजी इन्वेस्टमेंट अॅडव्हर्टायझर्सचे सीईओ राजेश अग्रवाल म्हणाले, “वेव्हरॉकचे अधिग्रहण म्हणजे भारतातील व्यवसायिक स्थावर जंगम विकासातील जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे प्रतिक आहे.  ही गुंतवणूक भारतातील महत्त्वाच्या शहरात शाश्वत व्यवसायिक स्थावर जंगम पोर्टफोलीयो निर्माण करण्याच्या आमच्या लक्ष्यासाठी पूरक आहे.”  

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy