डिस्लेक्सियावर मात करून इमान जवान कंपनीच्या डिरेक्टरपदी विराजमान*

डिस्लेक्सियावर मात करून इमान जवान कंपनीच्या डिरेक्टरपदी विराजमान मुंबई- आपल्या शारिरक आणि मानसिक मर्यादांवर मात करून गुरूडझेप घेतलेली अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यांसमोर आहेत. त्यातच आता इमान जवान या तरूणीच्या नावाची भर पडली आहे. लहानपणी डिस्लेक्सिया असलेल्या इमान यांना अभ्यासात अनेक अडचणी आल्या असल्या तरी आज त्या सनट्युयीटी आरईआय या सोलार कंपनीच्या डिरेक्टरपदी विराजमान झाल्या आहेत. प्रचंड कष्ट, सातत्य आणि चिकाटी यां गुणांच्या जोरावर इमान यांनी ही गरूडझेप घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रामुख्याने वाचनात आणि लिखाणात येणाऱ्या अडचणी अर्थात ‘डिस्लेक्सिया’ या आजारावर उपचार असून पालक आणि शिक्षकांकडून योग्य सहकार्य मिळाले तर ही सगळी मुले प्रचंड यश मिळवू शकतात. एखादा शब्द अडला की मुलांचे लक्ष लागत नाही, पण इतर विषयात ही मुले प्रचंड हुषार आहे. त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे टाळले आणि आईवडील आणि शिक्षकांनी अशा मुलां समजून घेतलं तर या मुलांमध्ये सुधारणा दिसून येईल, असे जवान यांनी सांगितले. सध्या इमान जवान या कंपनीच्या डिरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी परदेशातून उच्च शिक्षण घेत...