तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकॅडमी डी. वाय. पाटील स्पोर्ट्स सेंटर दाखल


तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकॅडमी डी. वाय. पाटील स्पोर्ट्स सेंटर दाखल

जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू घडवण्याचा प्रयत्न करत असताना, तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकॅडमीने (टीएमजीए) डी. वाय. पाटील नवी मुंबई येथे जगातील पहिली अद्ययावत क्रिकेट अकादमी व स्पोर्ट्स सेंटर सुरू केल्याचे जाहीर केले आहे.

दोन बॅचमध्ये सहभागी झालेल्या 7 ते 21 वर्षे वयोगटातील अंदाजे 200 विद्यार्थ्यांना जागतिक मुख्य प्रशिक्षक जोष नॅपेट आणि डी. वाय. पाटीलमधील प्रमुख प्रशिक्षक व माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या नेतृत्वाखाली अनुभवी प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली क्रिकेटमधील बारकाव्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मैदानातील क्रिकेट प्रशिक्षणाव्यतिरिक्त, स्ट्रेंथ, कंडिशनिंग, सायकॉलॉजी व टॅक्टिकल यावर आधारित सत्रेही आयोजित केली जाणार आहेत. या सत्रांमुळे विद्यार्थ्यांना क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी, तसेच उत्तम क्रिकेटपटू घडवण्याबरोबरच चांगले जागतिक नागरिक तयार करण्याचे टीएमजीएचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने जीवन कौशल्ये शिकण्यासाठी मदत होणार आहे.

सकाळची बॅच व संध्याकाळची बॅच प्रत्येकी अडीच तासाची असेल आणि 12 महिने दर आठवड्याला चार सत्रे घेतली जातील. क्रिकेट प्रशिक्षणाबरोबरच, विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स सेंटर उपलब्ध असेल व तेथे त्यांना टेनिस, फूटबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, स्विमिंग, इनडोअर गेम्स व स्क्वॅश (लवकर सुरू होणार) खेळता येईल व नव्या अद्ययावत व्यायामशाळेचा वापर करता येईल.

सचिन तेंडुलकर यांनी सांगितले,आम्ही गेली दोन वर्षे लंडन, मुंबई, नवी मुंबई व पुणे येथे क्रिकेट शिबिरांचे आयोजन करत आहोत. या शिबिरांना भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. पूर्ण वेळ अकादमी सुरू करण्याचे आमचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. आमच्या अकादमीमध्ये उदयोन्मुख क्रिकेटपटूंना त्यांच्या कौशल्यांमध्ये वाढ करता येईल आणि सर्वोच्च स्तरावर खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अॅकॅडमी डॉ. विजय पाटील यांच्याशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. विजय यांच्याशी टीएमजीएच्या उद्दिष्टाविषयी झालेली चर्चा आणि खेळाप्रतीचे दोघांचेही प्रेम विचारात घेता ही भागीदारी अतिशय समर्पक व दोघांनाही साजेशी असल्याचे जाणवले. मैदानात व मैदानाबाहेरही देशाचा अभिमान वाढवतील, असे खेळाडू ही अकादमी घडवेल, असा विश्वास आहे.

डॉ. विजय पाटील यांनी सांगितले, ‘‘टीएमजीए वार्षिक क्रिकेट कार्यक्रमाद्वारे, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या मदतीने आणि मिडलसेक्स काउंटी क्रिकेट क्लब दिग्गजांचा वारसा व ज्ञान यांच्या सहकार्याने आम्हाला खऱ्या अर्थी सबलीकरण करणारा कार्यक्रम उपलब्ध करता येणार आहे.
खेळाप्रती निस्सीम प्रेम असलेल्या व्यक्तींना टीएमजीए डी. वाय. पाटील स्पोर्ट्स सेंटरमध्ये एकत्र आणून, त्यांच्यामध्ये सामूहिक भावना निर्माण करेल असे ठिकाण आम्हाला यानिमित्ताने निर्माण करायचे आहे. हे स्पोर्ट्स सेंटर आणि टीएमजीएबरोबरचा सहयोग यामुळे आम्ही जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा भारतात आणत आहोत आणि खऱ्या अर्थी जागतिक दर्जाचे कौटुंबीक क्रीडा ठिकाण उपलब्ध करत आहोत.’’

तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकॅडमी डी. वाय. पाटील स्पोर्ट्स सेंटरमधील जागतिक दर्जाच्या सुविधा विविध खेळांचा समावेश करणार आहेत. प्रथम वर्गाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान आणि पॅव्हेलिअन या आवश्यक सुविधा आहेत. अद्ययावत फिल्टरेशन सिस्टीम असणारे अॅडल्ट व लर्नर पूल असे दोन भव्य स्विमिंग पूल या सुविधांच्या केंद्रस्थानी असणार आहेत. यामध्ये 9000 चौरस फूट पीयू मान्यताप्राप्त अॅक्रिलिक बास्केटबॉल कोर्ट, 9000 चौरस फूट फ्लडलिड फूटबॉल रिंक, 30,000 हून अधिक चौरस फुटांतील चार आयटीएफ मान्यताप्राप्त टेनिस कोर्ट, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया मान्यताप्राप्त तीन बॅडमिंटन कोर्ट आणि टेबल टेनिस, कॅरम व स्नूकर यासाठी इनडोअर जागा यांचा समावेश असणार आहे. सदस्यांसाठी चेंदिंह सुविधा मुबलक आहे आणि येथे कायमस्वरूपी वैद्यकीय सुविधेची तरतूद आहे. सदस्यांना खानपानाची सेवा देणाऱ्या दोन विशेष सुविधा येथे असणार आहेत. त्यातील एक म्हणजे, आलीशान डायनिंग रेस्तराँ आणि दुसरे म्हणजे, संपूर्ण कुटुंबाला आनंद घेण्यासाठी काही ना काही पर्याय देणारे कॅफे.

स्पोर्ट्स सेंटरसाठी मेंबरशिप 28 जानेवारी रोजी सुरू होणार आहे.

अधिक माहितीसाठी व ऑनलाइन बुकिंगसाठी पाहा www.tmgadypsc.com किंवा  enquiries@tendulkarmga.com / Support@tmgadypsc.com येथे ईमेल करा किंवा +91 844 844 9555 यावर कॉल करा

आमच्याविषयी

टीएमजीए

तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकॅडमी हा सचिन तेंडुलकर मिडलसेक्स काउंटी क्रिकेट क्लब यांचा उपक्रम असून, क्रिकेटचे सर्वोत्तम शिक्षण देणे, हे या अॅकॅडमीचे उद्दिष्ट आहे. उत्कृष्ट दर्जाच्या प्रशिक्षण सुविधांचा वापर करून, शिक्षणासाठी अत्यंत अनुकूल वातावरणामध्ये सर्वोत्तम प्रशिक्षकांच्या टीमद्वारे जागतिक दर्जाची प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्याचे आश्वासन अॅकॅडमीने दिले आहे. सलग दोन वर्षे लंडन, मुंबई, नवी मुंबई व पुणे येथे प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आणि त्यामध्ये 2,000 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

डीवायपीएसए

डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अॅकॅडमीने गेल्या काही वर्षांत भारतातील उत्कृष्टतेचे प्रतिक म्हणून स्थान निर्माण केले आहे. मुंबईतील हे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असून, त्याची आसनक्षमता 45,000 आहे. ब्रिटीश आर्किटेक्ट्स जर्नलकडून जगातील 6व्या क्रमांकाचे सर्वोत्तम क्रिकेट स्टेडिअम म्हणून नावाजलेल्या या स्टेडिअमने 2008 2010 इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) या अंतिम सामन्यांचे आयोजन केले होते. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि टीएमजीएचे कौशल्य यामुळे हे स्टेडिअम अचूक होस्ट ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24