अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड: ऑफरला 4 मार्च 2020 रोजी सुरुवात आणि शुक्रवार, मार्च 6, 2020 रोजी विक्री बंद होणार
अँटनी वेस्ट हँडलिंग सेल
लिमिटेड: ऑफरला 4 मार्च 2020 रोजी सुरुवात आणि शुक्रवार, मार्च 6, 2020 रोजी विक्री बंद होणार
मुंबई, फेब्रुवारी 28, 2020: अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेडने (“कंपनी”) रोख रकमेसाठी बुधवार, मार्च 4,
2020 रोजी, प्रत्येक 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी
शेअर्सची प्रति इक्विटी शेअर 295 रुपये ते इक्विटी शेअर 300 रुपये या किंमतपट्ट्यानुसार प्रारंभी समभाग विक्री (“आयपीओ”) करायचे ठरवले आहे. यामध्ये 350 दशलक्ष रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या
फ्रेश इश्यूचा आणि लीड्स (मॉरिशस) लिमिटेडकडून 1,390,322 पर्यंत इक्विटी शेअर्स; टनब्रिज (मॉरिशस) लिमिटेडकडून 2,085,502 पर्यंत इक्विटी शेअर्स; केम्ब्रिज (मॉरिशस) लिमिटेडकडून 769,917 पर्यंत इक्विटी शेअर्स; व गिल्डफोर्ड (मॉरिशस) लिमिटेडकडून 1,454,259 पर्यंत इक्विटी शेअर्स समाविष्ट असणाऱ्या 5,700,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा
समावेश आहे.
बिड/ऑफर शुक्रवार, मार्च 6,
2020 रोजी बंद
होणार आहे. किमान बोलीचे
प्रमाण 50 इक्विटी
शेअर्स आहे आणि त्यानंतर 50 इक्विटी शेअर्सच्या पटीत आहे.
इक्विटी शेअर्स बीएसई
व एनएसई येथे सूचिबद्ध केले जाणार आहेत.
कंपनीने नेट प्रोसिस्डचा वापर पुढीलप्रमाणे
करायचे ठरवले आहे: 1.
300 दशलक्ष
रुपये या थकित कर्जापैकी काही भागाची परतफेड किंवा प्रीपेमेंट करण्याच्या हेतूने
एजी एन्व्हिरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या उपकंपनीमध्ये
समाविष्ट करून कंपनीच्या एकूण कर्जामध्ये घट करणे; and; 2. सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्ट्ये.
तसेच, इक्विटी शेअर्स सूचिबद्ध केल्याने ब्रँडची लोकप्रियता व प्रतिमा उंचावेल आणि
भागधारकांना रोखता उपलब्ध होईल, असे फायदे होण्याची कंपनीला अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment