मुलांच्‍या उत्तम आयुष्‍यासाठी त्‍यांच्‍यामधील अध्‍ययन अक्षमतेचे लवकर निदान करणे अत्‍यंत महत्त्‍वाचे

मुलांच्‍या उत्तम आयुष्‍यासाठी त्‍यांच्‍यामधील अध्‍ययन अक्षमतेचे 
लवकर निदान करणे अत्‍यंत महत्त्‍वाचे

शालेय विद्यार्थ्‍यांमधील अध्‍ययन अक्षमतेची उत्तमप्रकारे करता येणा-या हाताळणीबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासाकरिता भाटिया हॉस्पिटलकडून शिक्षक, समुपदेशक व शिक्षणतज्ञांसाठी प्रमाणपत्र कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२०शालेय विद्यार्थ्‍यांमधील अध्‍ययन अक्षमतेचे (एलडी) प्रमाण जाणून घेण्‍यासाठी भारतात विविध संशोधन करण्‍यात आले आहेत. या संशोधनांमधून विविध राज्‍यांमधील ३ ते १० टक्‍के विद्यार्थ्‍यांमध्‍ये अध्‍ययन अक्षमता असल्‍याचे निदर्शनास आले आहे. भारतातील अध्‍ययन अक्षमता असलेल्‍या शालेय विद्यार्थ्‍यांमध्‍ये अटेन्‍शन डेफिसिट हायपरअॅक्टिव्‍हीटी डिसऑर्डर (एडीएचडी) या आजाराचे प्रमाण ४ ते ४० टक्‍के असल्‍याचे आढळून आले आहे आणि दरवर्षी या प्रमाणामध्‍ये वाढ होत आहे.

अध्‍ययन अक्षमता हा सामान्‍य विकार आहे, जो शालेय विद्यार्थ्‍यांमधील अध्‍ययनामध्‍ये दिसून येतो. या विकारामुळे ते अभ्‍यासामध्‍ये चांगली प्रगती करत नाहीत. संशोधनातून निदर्शनास आले आहे कीमुलांमधील अध्‍ययन अक्षमतेचे लवकर निदान या समस्‍येला उत्तमप्रकारे जाणून घेण्‍यासाठी आणि पालक व मुलांना उपचारात्‍मक उपायांचा सल्‍ला देण्‍यासाठी अत्‍यंत महत्त्‍वाचे आहे. उत्तम ज्ञान व माहितीसह औषधोपचार, थेरपी व अध्‍यापन करण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये बदल अशा गोष्‍टींमुळे या मुलांमध्‍ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.  

या समस्‍येचे समूळ निर्मूलन करण्‍याच्‍या उद्देशाने मुंबईतील भाटिया हॉस्पिटलने शुक्रवारी अध्‍ययन अक्षमता असलेल्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या व्‍यवस्‍थापनाप्रती एका विशेष प्रमाणपत्र कार्यक्रमाचे आयोजन केले. मुंबईतील भाटिया हॉस्पिटलमधील प्रख्‍यात पेडिएट्रिक न्‍यूरो डेव्‍हलपमेण्‍टल तज्ञ डॉ. संतोष कोंडेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. शिक्षक, समुपदेशेक, उपचारात्‍मक शिक्षणतज्ञ, थेरपीस्‍ट्स व मानसोपचारतज्ञ यांना अशा मुलांना ओळखून त्‍यांच्‍याप्रती काम करण्‍याचे प्रशिक्षण देण्‍याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

हा कार्यक्रम अगदी योग्‍यवेळी आयोजित करण्‍यात आला आहे. तज्ञ म्‍हणाले आहेत की, अध्‍ययन अक्षमता असलेल्‍या मुलांमध्‍ये निर्माण होणा-या वर्तणूकीसंदर्भात व मानसिक समस्‍यांना कमी करण्‍यामध्‍ये किंवा त्‍यांचे नियमन करण्‍यामध्‍ये योग्‍य हाताळणी व व्‍यवस्‍थापन दीर्घकाळापर्यंत साह्यभूत ठरू शकतात. याकडे दुर्लक्ष केले तर अशा मुलांची शाळेमधून गळती होऊ शकते आणि त्‍यांना अनेक मानसिक समस्‍यांचा सामना करावा लागू शकतो. अशा मुलांमध्‍ये बुद्धी, समन्‍वय संतुलन, दृष्‍टता व विशेष अभिमुखतासंदर्भात अनेक समस्‍या दिसून येतात. स्‍पेशालिस्‍टकडून विशिष्‍ट हस्‍तक्षेपांसह या समस्‍यांचे निराकरण करता येऊ शकते. योग्‍य वेळी या समस्‍यांचे निराकरण केले नाही तर या समस्‍या दीर्घकाळापर्यंत विकृती बनू शकतात आणि वैयक्तिक समस्‍येचा विद्यार्थ्‍यांच्‍या जीवनाच्‍या दर्जावर आणि भविष्‍यात त्‍यांच्‍या कुटुंबांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. 

शालेय प्रोफेशनल्‍सना शाळांमध्‍ये योग्‍य वर्तन किंवा चांगली प्रगती करण्‍यामध्‍ये असमर्थ ठरणा-या विद्यार्थ्‍यांच्‍या विविध समस्‍यांना उत्तमप्रकारे समजण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासासाठी त्‍यांच्‍यामध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍याच्‍या उद्देशाने या कार्यक्रमाची रचना करण्‍यात आली होती. त्‍यांना अध्‍ययन अक्षमता असलेल्‍या मुलांच्‍या गरजा समजण्‍यामध्‍ये मदत करण्‍याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

या कार्यक्रमाबाबत बोलताना भाटिया हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. रोहिन्‍तन दस्‍तूर म्‍हणाले, ''मुलांमधील अध्‍ययन अक्षमतेचे लवकर निदान करत त्‍यानुसार उपचार करणे अत्‍यंत महत्त्‍वाचे आहे. ज्‍यामुळे त्‍यांना शाळेय ध्‍येये प्राप्‍त करण्‍यामध्‍ये, अभ्‍यास व प्रगती सुधारण्‍यामध्‍ये आणि उत्तम व्‍यक्तिमत्त्‍व प्राप्‍त करण्‍यामध्‍ये मदत होईल. कदाचित एलडीचे प्रमाण बदलत आहे आणि उच्‍च धोका असलेल्‍या नवजात बालकांच्‍या वाचण्‍याच्‍या प्रमाणामधील वाढीमुळे हा बदल दिसून येत असावा. यासारख्‍या कार्यक्रमांवर अधिक भर देण्‍याची गरज आहे. या कार्यक्रमाचा शिक्षक व शैक्षणिक प्रोफेशनल्‍सना अध्‍ययन अक्षमता असलेल्‍या मुलांची स्थिती उत्तमप्रकारे समजण्‍यामध्‍ये मदत करण्‍याचा आणि योग्‍यवेळी अशा मुलांना मदत करण्‍यासाठी सुसज्‍ज करण्‍याचा मनसुबा आहे.''  

सरकारचा उपक्रम राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ्‍य कार्यक्रम (आरबीएसके) अध्‍ययन अक्षमतेला विकासात्‍मक अक्षमता म्‍हणून वर्गीकृत करतो. विकलांग व्‍यक्‍ती कायद्याने या अक्षमतेला बौद्धिक अक्षमता म्‍हणून वर्गीकृत केले आहे. आरबीएसके जन्‍मलेल्‍या ते १८ वर्षांपर्यंतच्‍या मुलांसाठी जन्‍माच्‍या वेळी असलेले डिफेक्‍ट्स, डिफिशियन्‍सीज, डिसीजेज आणि डेव्‍हलपमेंट विलंब या चार 'डी'ना कव्‍हर करत लवकर निदान व लवकर उपचार सुविधा देण्‍याचा मनसुबा ठेवतो. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE