फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वतीने कोविड – 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सक्रीय व्यवसाय एजंटना प्रति रु 50,000 चे लाभ देण्याची घोषणा
फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वतीने
कोविड – 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सक्रीय व्यवसाय एजंटना
प्रति रु 50,000 चे लाभ देण्याची घोषणा
मुंबई, 31 मार्च, 2020: फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एफजीआयआय), हा भलामोठा रिटेल समूह, फ्युचर ग्रुप आणि ग्लोबल इन्शुरन्स जनराली यांच्या संयुक्त विद्यमाची जनरल इन्शुरन्स सहयोगी कंपनी आहे. यांच्या वतीने त्यांच्या प्रत्येक सक्रीय व्यवसाय एजंटना प्रत्येकी रु. 50,000 ची आर्थिक मदत करण्याची घोषणा करण्यात आली. या सक्रीय व्यवसाय एजंटचा जोडीदार, मुलांची चाचणी कोविड- 19 पॉझिटीव्ह आल्यास हे आर्थिक साह्य करण्यात येणार आहे.
जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असताना जे सहयोगी घटक एफजीआयआयसोबत सक्रीय आहेत त्यांच्याकरिता हे विशेष साह्य उपलब्ध करून देण्यात येईल. जवळपास 8000 हून अधिक एजंट फ्युचर जनरालीसोबत जोडलेले असून त्यांना वैयक्तिक आयुष्यात एखाद्या दुर्दैवी प्रसंगाचा सामना करावा लागल्यास फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सने त्यांची देखभाल करण्याचे आश्वासन दिले आहे.
फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ अनुप राऊ म्हणाले की, “सध्या जगात कोविड- 19 महामारीचा उद्रेक झाला असताना आमचे एजंट लोकांमध्ये जनजागृती करत आहेत, गरजेच्या काळात त्यांना विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना, त्यांचा जोडीदार किंवा त्यांच्या मुलांना या रोगाचा संसर्ग झाल्यास आम्ही त्यांच्या खात्यावर रु. 50,000 जमा करणार आहोत. त्यांना ही विना-विलंब एकरकमी रकमी स्वरुपात त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल.”
जर एखाद्याला कोविड-19 संसर्गाचे निदान झाल्यास किंवा क्वारंटाईन राहण्याची वेळ आल्यास फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सच्या वतीने वन-टू-वन आधारावर कर्मचाऱ्यांना अविरत पाठबळ पुरवले जाणार आहे.

Comments
Post a Comment