टाटा पॉवरचे जॉर्जियामधील जॉईंट व्हेंचर शुआखेवी जलविद्युत प्रकल्पामध्ये

टाटा पॉवरचे जॉर्जियामधील जॉईंट व्हेंचर शुआखेवी जलविद्युत प्रकल्पामध्ये

व्यावसायिक वीज निर्मितीचा शुभारंभ

जॉर्जियामध्ये उभारण्यात आलेला गेल्या सात दशकांतील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प हा प्रकल्प म्हणजे जॉर्जियाच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने उचलले गेलेले महत्त्वाचे पाऊल आहे.


मुंबई, ३० मार्च, २०२०: टाटा पॉवर, नॉर्वेचे क्लीन एनर्जी इन्व्हेस्ट (सीईआय) आणि इंटरनॅशनल
फायनान्शियल कॉर्पोरेशन (आयएफसी) यांच्यातील भागीदारीने सुरु करण्यात आलेल्या ऍडजरिस्ट्सकली
जॉर्जिया एलएलसी या कंपनीने शुआखेवी जलविद्युत प्रकल्पाच्या व्यावसायिक संचालनाचा शुभारंभ
झाल्याची घोषणा केली आहे. १७८ मेगावॅट क्षमतेचा हा जलविद्युत प्रकल्प नैऋत्य जॉर्जियामध्ये आहे.
एजीएल लवकरच ९ मेगावॅट क्षमतेचा स्खलता जलविद्युत प्रकल्प सुरु करणार असून हा देखील
एकंदरीत शुआखेवी जलविद्युत योजनेचा भाग आहे.
शुआखेवी जलविद्युत प्रकल्प हा जॉर्जियाच्या ऊर्जा क्षेत्रातील एकमेव असा प्रकल्प आहे ज्याला युरोपियन
बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट (ईबीआरडी), एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) आणि जागतिक
बँक समूहातील सदस्य आयएफसी या तीन सर्वात मोठ्या आर्थिक संस्थांनी वित्तपुरवठा केला आहे.
या प्रकल्पातून जवळपास ४५० जीडब्ल्यूएच शुद्ध ऊर्जेचे उत्पादन केले जाईल, ज्यामुळे ग्रीनहाऊस
वायूंच्या उत्सर्जनात दरवर्षी २००,००० टनांपेक्षाही जास्त घट होईल. या प्रकल्पाची उभारणी यशस्वीपणे
पूर्ण होऊन व्यावसायिक संचालनाची सुरुवात होणे ही बाब जॉर्जियाची अखंडता, सुरक्षितता आणि ऊर्जा
स्वावलंबनासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकल्पातून निर्माण केली जाणारी ऊर्जा फक्त
जॉर्जियामध्ये संपूर्ण हिवाळ्यात विकली जाईल. हिवाळ्यामध्ये जॉर्जियामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा
कमतरता भासत असते.
टाटा पॉवरचे सीईओ व मॅनेजिंग डायरेक्टर श्री. प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, "शुआखेवी एचपीपीचे
व्यावसायिक संचालन हा टाटा पॉवरसाठी आणि आमच्या भागीदारांसाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.
शुआखेवी एचपीपी हा गेल्या ७० वर्षातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक प्रभावी ऊर्जा प्रकल्प आहे. १७८
मेगावॅट क्षमतेच्या शुआखेवी एचपीपीचे यश हे जॉर्जियाची अखंडता, सुरक्षितता आणि ऊर्जा स्वावलंबन
यासाठी खूप महत्त्वाचे आहे."

ऍडजरिस्ट्सकली जॉर्जिया एलएलसी ही टाटा पॉवर, नॉर्वेची क्लीन एनर्जी इन्व्हेस्ट आणि इंटरनॅशनल
फायनान्शियल कॉर्पोरेशन - आयएफसी (जागतिक बँक समूहातील सदस्य) यांच्या भागीदारीतून सुरु
करण्यात आलेली कंपनी असून प्रकल्पाचा एकंदरीत खर्च जवळपास ५०० मिलियन यूएस डॉलर्स इतका
आहे.
टाटा पॉवरची संस्थापित जलविद्युत क्षमता जवळपास ५०० मेगावॅट आहे. महाराष्ट्रात त्यांचे तीन
प्रकल्प आहेत. ही ऊर्जा देशांतर्गत बाजारपेठेसाठी वापरली जाते. टाटा पॉवरने जवळपास एक शतकभर
आधी महाराष्ट्रातील खोपोली येथे भारतातील पहिले हायड्रोइलेक्ट्रिक वीज निर्मिती केंद्र (क्षमता ४०
मेगावॅट) उभारले आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE