मॅनकाइण्ड फार्मा कडून कोविड -१९ विषाणू विरूद्धच्या लढ्यास ५१ कोटीचा मद्त निधी
मॅनकाइण्ड फार्मा कडून कोविड -१९ विषाणू विरूद्धच्या
लढ्यास ५१ कोटीचा मद्त निधी
- व्हेंटिलेटर, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) आणि औषधे सुनिश्चित करण्यासाठी योगदान
- विविध राज्यांतील सरकारी रुग्णालयांना लाभ मिळवून देण्याचे सुनिश्चित करेल
भारतातील
कोविड -१९ रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असून मॅनकाइंड फार्मा ही
आपत्ती व्यवस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री मदत निधीला ५१ कोटींची देणगी
देऊन या लढ्यात सामील झाली आहे. मॅनकाइंड ज्या
राज्यांमध्ये अधिक रुग्ण संख्या आहे त्या राज्यांना व्हेंटिलेटर, वैयक्तिक
संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) आणि औषधे पुरविणार आहे. मॅनकाइंड फार्मा
केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, तामिळनाडू, कर्नाटक,
एपी, तेलंगणा, दिल्ली, हरियाणा, एचपी, मध्य प्रदेश,
राजस्थान, गुजरात, पंजाब, पश्चिम बंगाल जम्मू-काश्मीर आणि ओरिसा या राज्य
सरकारांबरोबर काम करेल.
या संकटाच्या वेळी मॅनकाइंड फार्मा जनकल्याणासाठी काम करेल. जॉन्स हॉपकिन्स
युनिव्हर्सिटी, सेंटर फॉर डिसीज डायनेमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी आणि
प्रिन्सटन युनिव्हर्सिटीच्या अंदाजानुसार; जुलै २०२० पर्यंत भारतात
व्हेंटिलेटरची मागणी वाढून १ दशलक्ष होण्याची शक्यता
आहे, तर सध्या उपलब्धता ३०००० ते ५०००० च्या दरम्यान आहे.
Comments
Post a Comment