मुंबईकर ९ वर्षे वयाच्या मुलाने दृष्टीदोष शोधणाऱ्या आगळ्या अॅपची निर्मिती

मुंबईकर  वर्षे वयाच्या मुलाने दृष्टीदोष शोधणाऱ्या आगळ्या अॅपची निर्मिती
‘व्हाईटहॅट ज्युनियर’ने सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाणाऱ्या आणि गुगल शास्त्रज्ञ, वायमो इंजीनियर व आघाडीच्या व्हेंचर कॅपिटॅलिस्टना भेटणाऱ्या १२ मुलांमध्ये त्याची केली निवड

मुंबई, ५ मार्च २०२० : जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, किमान २.२ अब्ज लोकांना अंधत्व किंवा दृष्टीहीनता आहे आणि त्यातील १ लाख लोक हे दृष्टीदुर्बलतेने आहे. त्यांची ही दृष्टीदुर्बलता रोखता येणे शक्य होते किंवा असले तरी अजूनही त्याच्याकडे अजूनही लक्ष दिले गेलेले नाही. भारतात ८ ते १० टक्के मुले ही अपवर्तकाने (डोळ्यातील वक्रीभवन) ग्रस्त असून त्यांनी कधीही त्यावर उपाय म्हणून चष्मा घातलेला नाही. या परिस्थितीवर उपाय म्हणून ९ वर्षे वयाच्या मुंबई येथील गर्वित सूदने ‘दृष्टी अॅप’ तयार केले आहे. त्या अॅपच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या डोळ्यांची तपासणी करता येते आणि त्याद्वारे डोळ्यांचे किंवा दृष्टीदोषाशी संबंधित आजारांचे निदान करता येते, तसेच योग्यवेळी त्यांवर उपचार करता येतात.
आपले डोळे हे जगाकडे पाहण्याची आपली खिडकी आहे आणि डोळ्यांमधील अपयांमुळे कोणालाही मोठ्या समस्यांना सामोरे जायला लागू शकते. गर्वितच्या डोळ्यांचा अपाय हा उशिरा समोर आला आणि तो दृष्टीदोष असल्याचे निदान झाले. उपचार घेत असताना त्याला ‘व्हाईटहॅट ज्युनीयर’ व्यासपीठावर जो अनुभव आला त्याचा वापर त्याला इतरांसाठी करून द्यायचा होता. त्यासाठी त्याने अॅपची निर्मिती केली. ते वापरायला अगदी सोपे असे अॅप असून वाचकाला त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवारील विविध आकारातील केवळ काही अद्याक्षारे आणि आकडे यामध्ये वाचायचे असतात. त्यांच्या वाचनातील यशाच्या आधारे त्या व्यक्तीच्या नजरेतील परिणामकारकता शोधता येते. त्यातून त्या व्यक्तीला पुढील तपासणीसाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे का, या गोष्टीची स्पष्टता येते. ग्रामीण भागात डॉक्टरांपर्यंत पोहोचणे कठीण असते आणि अशावेळी हे अॅप खूप कामी येऊ शकते. अगदी डॉक्टरही आपल्या रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी या अॅपचा वापर करू शकतात.
आज मुलांना सामाजिक विषयांची चांगलीच जाण आहे आणि त्यांची सोडवणूक करण्याची क्लृप्ती त्यांना चांगलीच ठावूक आहेगर्वित सूद सारखी युवा मुले खऱ्या अर्थाने क्रांतीकारी बदल घडवून आणताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि केवळ ४० तासांमध्ये परिणामकारक असे अॅप ‘व्हाईटहॅट ज्युनियर व्यासपीठावर तयार करत असल्याचा अनुभव घेता येत आहेत्याचा फार मोठा परिणाम जगात राहणार आहे, असे उद्गार व्हाईटहॅट ज्युनियरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री करण बजाज यांनी काढले.
‘व्हाईटहॅट ज्युनियर’ने घेतलेल्या सिलीकॉन व्हॅली उपक्रमामधील १२ विजेत्यांपैकी गर्वित एक आहे. भारतातून आलेल्या तब्बल ७००० प्रवेशिकांचे परीक्षण केल्यानंतर त्याच्या अॅपची निवड झाली होती. मुलांना त्यांच्या आयुष्यातील समस्या सोडविणारी एखादी संकल्पना राबविण्यासाठी आणि त्याद्वारे स्वतंत्रपणे एक अॅप निर्माण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून गर्वितला अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाण्याची संधी प्राप्त होणार आहे. तेथे त्याला नेक्सास व्हेंचर पार्टनर्स आणि आऊल व्हेंचर्सयांसारख्या आघाडीच्या व्हेंचर कॅपिटॅलिस्ट्स (व्हीसी)कडे आपल्या अॅपची सादरीकरण करता येणार आहे. या आठवडाभराच्या ट्रीपदरम्यान त्याला सिलिकॉन व्हॅलीतील काही आघाडीच्या उद्योजकांशी भेटण्याची संधी मिळणार आहे. त्याद्वारे त्याला उद्योजकतेतील काही महत्वपूर्ण धडे घेता येणार आहेत. त्याशिवाय त्याला ‘गुगलप्लेक्स’ला भेट देता येणार आहे आणि तेथे अभियंत्यांना भेटता येणार आहे. त्याशिवाय त्याला वायमो कारखान्याला भेट देता येणार आहे. त्या माध्यमातून चालकरहित गाड्या पाहता येणार असून त्यांच्या उत्पादन व्यवस्थापकांशी संवाद साधता येणार आहे.
ही सर्व मुले ‘व्हाईटहॅट ज्युनियर’कडे कोडींग शिकत आहेत. ही एक ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोडींग शिकविणारी ‘स्टार्ट-अप’ संस्था आहे. आर्टीफीशीयल इंटेलीजन्स, रोबोटिक्स, मशीन लर्निंग आणि स्पेस टेक यांसारख्या तंत्रज्ञानाच्या आधारे आधुनिक व आगळा असा अभ्यासक्रम शिकविण्याचे उद्दिष्ट ठेवत ही संस्था मुलांमधील नैसर्गिक सर्जनशीलतेला वाव देते. त्याद्वारे ही मुले केवळ एक ग्राहक न राहता अगदी कमी वयात ती निर्माते होतात आणि तसा बदल त्यांच्यात येतो. या ऑनलाईन व्यासपीठाला फार मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्यानंतर कंपनी आता स्वतःचा आर्टीफीशीयल इंटेलीजन्स, रोबोटिक्स कोडींग अभ्यासक्रम देशभरातील शाळांमध्ये दाखल करत आहे. त्याशिवाय संस्था १५ वर्षे वयाखालील मुलांसाठी फेलोशिप सुरु करत असून त्याद्वारे ‘व्हाईटहॅट ज्युनियर’ १५ मुलांना त्यांचे स्वतःचे स्टार्ट-अप सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी त्यांना १५००० अमेरिकन डॉलरची फेलोंशिप दिली जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE