फ्रीज, टीव्ही, एसी आता स्वतःच करा घरी दुरुस्त
फ्रीज, टीव्ही, एसी आता स्वतःच करा घरी दुरुस्त २४७अराउंडची सुविधा; व्हिडिओच्या माध्यमातून तंत्रज्ञ करणार विनामूल्य मार्गदर्शन मुंबई, ३० एप्रिल २०२०: लॉकडाऊन दरम्यान घरातील फ्रीज, टीव्ही, एसी यांसारखी उपकरणे बंद पडल्यास ग्राहकांकडे त्यांच्या दुरुस्तीची सोय उपलब्ध नाही आणि यामुळेच त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन २४७ अराउंड या अग्रगण्य उपकरण सेवा पुरवठादार कंपनीने राष्ट्रीय व्हिडिओ हेल्पलाइन सुरु केली आहे. याद्वारे कंपनीचे घरून काम करणारे तंत्रज्ञ ग्राहकांना व्हॉट्सअप तसेच गूगल मीट व्हिडिओद्वारे मदतीसाठी तात्काळ उपलब्ध असतील. उपकरणांच्या दुरुस्तीकरिता ते ग्राहकांना मार्गदर्शन करतील. ही सुविधा विनामूल्य असून ग्राहकांना ९५५५०००२४७ या क्रमांकावर संपर्क साधून या सुविधेचा लाभ घेता येईल. लॉकडाऊन असल्यामुळे बिघडलेली उपकरणे दुरुस्त करण्यासाठी बाहेर नेणे शक्य नाही तसेच तंत्रज्ञ ही घरी येऊ शकत नाहीत. त्यामुळे २४७अराउंडची ही सुविधा ग्राहकांकरिता उपयुक्त ठरत आहे. कंपनीचे तंत्रज्ञ (टेक्निशिअन्स) उच्च प्रतीचे कौशल्यप्राप्त, अनुभ...