फ्रीज, टीव्ही, एसी आता स्वतःच करा घरी दुरुस्त


फ्रीज, टीव्ही, एसी आता स्वतःच करा घरी दुरुस्त  
२४७अराउंडची सुविधा; व्हिडिओच्या माध्यमातून तंत्रज्ञ करणार विनामूल्य मार्गदर्शन
मुंबई, ३० एप्रिल २०२०: लॉकडाऊन दरम्यान घरातील फ्रीज, टीव्ही, एसी यांसारखी उपकरणे बंद पडल्यास ग्राहकांकडे त्यांच्या दुरुस्तीची सोय उपलब्ध नाही आणि यामुळेच त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन २४७ अराउंड या अग्रगण्य उपकरण सेवा पुरवठादार कंपनीने राष्ट्रीय व्हिडिओ हेल्पलाइन सुरु केली आहे. याद्वारे कंपनीचे घरून काम करणारे तंत्रज्ञ ग्राहकांना व्हॉट्सअप तसेच गूगल मीट व्हिडिओद्वारे मदतीसाठी तात्काळ उपलब्ध असतील. उपकरणांच्या दुरुस्तीकरिता ते ग्राहकांना मार्गदर्शन करतील. ही सुविधा विनामूल्य असून ग्राहकांना ९५५५०००२४७ या क्रमांकावर संपर्क साधून या सुविधेचा लाभ घेता येईल. 
लॉकडाऊन असल्यामुळे बिघडलेली उपकरणे दुरुस्त करण्यासाठी बाहेर नेणे शक्य नाही तसेच तंत्रज्ञ ही घरी येऊ शकत नाहीत. त्यामुळे २४७अराउंडची ही सुविधा ग्राहकांकरिता उपयुक्त ठरत आहे. कंपनीचे तंत्रज्ञ (टेक्निशिअन्स) उच्च प्रतीचे कौशल्यप्राप्त, अनुभवी आणि तंत्राचे दुरून निदान करण्यात प्रशिक्षित आहेत. या तंत्रज्ञांच्या साहाय्याने ग्राहकांना फ्रीज, टीव्ही, एसी, वॉटर प्युरिफायर्स, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, मिक्सर, गिझर, गॅस बर्नर इत्यादी उपकरणे दुरुस्त करण्याकरिता ऑनलाईन मार्गदर्शन केले जाईल.
या सुविधेमागील उद्देश स्पष्ट करताना २४७अराउंडचे सीईओ आणि सहसंस्थापक श्री नितीन मल्होत्रा म्हणाले, ‘ या क्षेत्राला दर ३० दिवसात २५ दशलक्ष इलेक्ट्रॉनिक उत्पादने दुरूस्त करण्याची मागणी असते. त्यामुळे सध्या अनेक लोक त्रस्त आहेत. व्हिडिओद्वारे दुरुस्तीचे प्रमाण सध्या २५ ते ३० टक्के आहे. आम्ही काही प्रमाणात ग्राहकांची अडचण दूर करण्यात सक्षम ठरत आहोत याचे आम्हाला समाधान आहे.'
२०१५मध्ये स्थापन झालेली २४७ अराउंड ही कंपनी भारतभरातील १०,००० टेक्निशिअन्ससोबत काम करते. तसेच शार्प, बोट, व्हर्लपूल, गोदरेज हिट, व्हिडिओकॉन, अकाई, लाईफलाँग या अग्रगण्य घरगुती उपकरणांच्या ब्रँडसोबत कंपनीची भागीदारी आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE