एगॉन लाईफ इन्शुरन्सच्या वतीने, फ्लिपकार्टच्या साथीने कोविड –19 करिता उद्योगक्षेत्रातील पहिले लाईफ प्लस हॉस्पिटलायजेशन कव्हर

एगॉन लाईफ इन्शुरन्सच्या वतीने, फ्लिपकार्टच्या साथीने कोविड –19 करिता उद्योगक्षेत्रातील पहिले लाईफ प्लस हॉस्पिटलायजेशन कव्हर

मुंबई: 28 मे 2020: एगॉन लाईफ हा भारतातील डिजीटल इन्शुरन्सचा संस्थापक असून त्यांनी भारताची ई-कॉमर्स बाजारपेठ फ्लिपकार्टसमवेत ‘लाईफ इन्शुरन्स विथ कोविड – 19 कव्हर’द्वारे रुग्णालय भरतीसाठी रु. 1 लाख विमा कवच उपलब्ध करून देत असल्याची घोषणा केली. हा अशाप्रकारचा उद्योगक्षेत्रातील पहिला प्रयत्न ठरला. या लॉन्चद्वारे फ्लिपकार्ट ग्राहकांना कोविड – 19 च्या विरुद्ध सर्वसमावेशक विमा कवच उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. ‘लाईफ इन्शुरन्स विथ कोविड – 19 कव्हर’ ची अभिनव ऑफर पॉलिसीधारकाचा रु. 1 लाखांपर्यंतचा खर्च उचलणार आहे. कोविड – 19 बाधित स्वरुपात रुग्ण सलग किमान 24 तास रुग्णालयात भरती झाल्यास त्याला मृत्यू लाभ जीवन कवचासह हे उत्पादन उपलब्ध होईल. हे उत्पादन फ्लिपकार्ट फर्स्टवर उपलब्ध असून त्याचे उद्दिष्ट लक्षावधी लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान देण्याच्या दृष्टीने साह्य करण्याचे आहे. जेणेकरून कोविड – 19 महामारीच्या अनिश्चितेत किफायतशीर मार्गाने अनेकांच्या घरात सुलभता आणि सुरक्षा नांदेल.

‘लाईफ इन्शुरन्स विथ कोविड – 19 कव्हर’च्या शुभारंभाविषयी बोलताना एगॉन लाईफचे सीएफओ आणि प्रिन्सिपल ऑफिसर सतीश्वर बालकृष्णन म्हणाले की, “देशातील सर्वच सरकारांनी विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. तरीही अनेक भारतीयांकडे आरोग्य विमा नाही. एगॉनलाईफ’च्या ‘कोविड – 19 हॉस्पिटलायजेशन कव्हर’ समवेत किफायतशीर प्रीमियममध्ये जीवन लाभासह आर्थिक साह्य उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ही पॉलिसी रुग्णालय खर्चाची जबाबदारी घेत असल्याने रुग्ण कोविड – 19 पॉझिटीव्ह झाल्यास त्याच्यावर आर्थिक ताण येत नाही. एखाद्या वेळेस रुग्णाचा मृत्यू झाल्यास बेस प्लानसमवेत जीवन लाभ मिळतो. ज्यामुळे विमाधारकाच्या कुटुंबाला पाठबळ मिळण्यास मदत होते.”

ते पुढे म्हणाले, "एगॉन लाईफमध्ये आम्हाला भारतातील डिजीटल इन्शुरन्सचे संस्थापक होण्याचा मान मिळवता आला. हे कव्हर फ्लिपकार्टच्या अॅपवर सहजपणे उपलब्ध असून आमच्या ग्राहकांकरिता वृद्धिंगत डिजीटल सेवा देण्यासाठी उचललेले पाऊल आहे.”

रणजीत बोयनापल्ली हे फिनटेक अँड पेमेंटस ग्रुप, फ्लिपकार्ट-हेड असून ते म्हणाले की, “या अभूतपूर्व काळात व्यवसायांनी एकत्र येऊन कृतीशील झाले पाहिजे. कल्पकता ही काळाची गरज आहे. आम्ही फ्लिपकार्टमध्ये देशभरात 200 दशलक्ष ग्राहकांना सेवा उपलब्ध करून देतो, आमचा विश्वास आहे की, ‘कोविड – 19 हॉस्पिटलायजेशन कव्हर’ हे एक फूल कव्हर प्रोडक्ट आहे. जे आमच्या ग्राहकांना अतिशय आवश्यक स्वरुपाचे लाईफ अॅड हॉस्पिटलायजेशन कव्हर एकाच उत्पादनात उपलब्ध करून देते. आमच्या एगॉन लाईफ समवेतच्या भागीदारीमुळे हा कल्पक, किफायतशीर आणि सुलभ  पर्याय ग्राहकांपर्यंत पोहोचायला मदत झाली.”

एगॉन लाईफ आणि फ्लिपकार्टचे तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्री दृष्टिकोनामुळे या सध्याच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर अभिनव आणि शक्तिशाली पर्याय उपलब्ध होऊ शकला.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth