निम्रत कौर अहलुवालियाने तिच्या जुन्या दागिन्यांच्या संग्रहाविषयी सांगीतले
निम्रत कौर अहलुवालियाने तिच्या जुन्या दागिन्यांच्या संग्रहाविषयी सांगीतले
कलर्सच्या छोटी सरदारनी या गाजत
असलेल्या शो मध्ये मेहेरच्या भूमिकेत निम्रत कौर अहलुवालियाने उत्कृष्ट कामगिरी
करून प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. मनोरंजनाच्या दुनियेत एक परिपूर्ण कलाकार
म्हणून ही अभिनेत्री प्रसिध्द पावली आहे आणि प्रेक्षकांना तिला ऑनस्क्रीन पहायला
आवडते आहे. सध्याच्या लॉकडाऊन मध्ये, ही अभिनेत्री विविध प्रकारचे कामे करताना
दिसून येत आहे, जसे की तिची खोली व्यवस्थित लावणे, आर्ट व क्राफ्ट बनविणे आणि
व्हिडिओ कॉल वर मित्रांशी गप्पा मारणे. नुकतेच, ती तिची खोली आवरत असताना,
निम्रतला तिच्या काही जुन्या दागिन्यांचा संग्रह सापडला, तिला असे दागिने
जमविण्याचा छंद आहे, आणि तिला खूप आनंद झाला.
यावर बोलताना,
निम्रत म्हणाली, “मला माझ्या दिसण्यावर प्रयोग करायला नेहमीच आवडते आणि
वैशिष्ट्यपूर्ण कपडे आणि दागिने घालायला आवडते. जुने दागिने जमविणे हा माझा एक छंद
आहे. माझ्याकडे त्याचा खूप मोठा संग्रह आहे आणि मला त्यात भर घालायला आवडते.
खरेतर, लोक आधी कपडे निवडतात आणि मग त्यावर कोणते दागिने घालायचे ते ठरवितात, पण
मी आधी कोणता जुना दागिना घालायचा ते ठरवते आणि मग त्याला जुळणारे कपडे घालते.
घरातील मोकळ्या वेळात मी माझे कपडे व्यवस्थित ठेवत होते आणि मला अचानक माझ्या
आवडत्या जुन्या दागिन्यांचा मोठा डबा सापडला, जो मी विसरून गेले होते. तो पाहून मला
खूप आनंद झाला आणि आता मी लॉकडाऊन मध्ये होणाऱ्या माझ्या लाइव्ह मुलाखती मध्ये ते
नक्की घालणार आहे!”
Comments
Post a Comment