पियाजिओकडून भारतातील गरजू ऑटो ड्रायव्हर कुटुंबांना ११००० हून अधिक रेशन किट्सचे वाटप
पियाजिओकडून भारतातील गरजू ऑटो ड्रायव्हर कुटुंबांना ११००० हून अधिक रेशन किट्सचे वाटप
*• विविध ठिकाणी एकाच दिवशी किटचे वाटप करण्यात आले*
*• सध्याच्या अनपेक्षित कोविड-१९ महामारीच्या प्रादुर्भावामुळे व्यवसायावर परिणाम झालेल्या गरजू ऑटो ड्रायव्हर्सना ११००० रेशन किट्सचे वाटप करण्यात आले*
*पुणे, 29 मे 2020:* कोविड-१९ रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे देशव्यापी लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे, तसेच काही विशिष्ट भागांमध्ये लॉकडाऊनपासून शिथिलता देखील देण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर अवलंबून असलेला समाजातील एक विभाग ऑटोरिक्षा ड्रायव्हर्सच्या व्यवसायांवर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. परिणामत: अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर देखील परिणाम झाला आहे.
या संकट काळादरम्यान उदरनिर्वाह होण्यासाठी या समाजाच्या सर्वात गरजू विभागाप्रती आत्मीयता दाखवत त्यांना साह्य करण्याच्या उद्देशाने दुचाकी विभागाची आघाडीची युरोपियन कंपनी इटायलियन पियाजिओ ग्रुपची १०० टक्के उपकंपनी आणि भारताची लहान व्यावसायिक वाहनांची आघाडीची उत्पादक कंपनी पियाजिओ वेईकल्स प्रा. लि. (पीव्हीपीएल)ने घोषणा केली आहे की, त्यांनी ११,००० हून अधिक किट्सचे वाटप केले आहे आणि प्रत्येक किट एका कुटुंबाला दोन महिन्यांसाठी उदरनिर्वाह करण्यामध्ये मदत करू शकते.
जबाबदार कॉर्पोरेट सोशल नागरिक म्हणून पीव्हीपीएलने सर्वात गरजू तीनचाकी ड्रायव्हरच्या कुटुंबांना किमान २ महिन्यांसाठी मुलभूत आहार उपलब्ध करून देणा-या या रेशन किट्सचा मोफत पुरवठा केला. या रेशन किट्समध्ये चार माणसांच्या कुटुंबाला पुरेल इतके रेशन, तसेच फेस मास्क्स, साबण व सॅनिटायझर्स आहेत. *पीव्हीपीएलच्या देशव्यापी डिलरशिप नेटवर्कच्या मदतीने २८ मे रोजी भारतभरात वाटप कार्य करण्यात आले.*
*या उपक्रमाबाबत बोलताना पियाजिओ वेईकल्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डिएगो ग्राफी म्हणाले,* ''या अपवादात्मक कठीण काळामध्ये आम्ही ऑटो ड्रायव्हर व परिवहन कर्मचारी समुदायांच्या पाठिशी उभे राहत आमचा निरंतर पाठिंबा देत आहोत. या अनपेक्षित कोविड-१९ स्थितीदरम्यान त्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. आम्ही यापूर्वी आमच्या सर्व तीन-चाकी ग्राहकांसाठी वॉरंटीमध्ये वाढ केल्याची घोषणा केली होती आणि आता २ महिन्यांसाठी पुरेल इतका आवश्यक रेशन साठा पुरवत या समुदायाच्या सर्वात गरजू कुटुंबांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. आमचे डिलर्स देखील आमच्यासोबत सहयोग जोडत स्वइच्छेने या वाटपकार्यामध्ये मदत करत आहेत. ज्यामुळे वंचित ड्रायव्हर्स व त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. हे अनपेक्षित संकट आहे, ज्यासाठी एक समुदाय म्हणून आपणा सर्वांकडून सहकार्य व पाठिंब्याची गरज आहे. सामाजिकदृष्ट्या जबाबदार संस्था म्हणून आम्ही ड्रायव्हर समुदायाला साह्य करण्यासाठी आमच्यापरीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवू.''
यापूर्वी देखील पीव्हीपीएलने त्वरित प्रतिसाद देत पुणे व बारामतीमधील स्थलांतरित कामगारांना रेशन किट्सचा पुरवठा केला आहे. पीव्हीपीएलने पुण्याच्या सरकारी रूग्णालयामध्ये देण्यात आलेल्या सॅनिटायझेशन पायाभूत सुविधांमध्ये देखील मदत केली आहे. कंपनीने बारामती सरकारी रूग्णालयामध्ये कोविड-१९ साठी विलगीकरण कक्ष उभारण्यामध्ये बारामती स्थानिक अधिका-यांना देखील मदत केली आहे. एप्रिल महिन्यामध्ये कंपनीने लहान व्यावसायिक वाहनांसाठी वॉरंटी व मोफत सेवा कालावधीमध्ये दोन महिन्यांची वाढ केल्याची देखील घोषणा केली आहे.
Comments
Post a Comment