अनेरीला तातडीने दाताची सर्जरी करावी लागली
अनेरीला तातडीने
दाताची सर्जरी करावी लागली
पँडेमिक मुळे जग
एका ठिकाणी थबकले आहे आणि अशाच वेळी अचानक इतर सर्व समस्या किंवा आरोग्यविषयक
समस्या चालू होतात. दाताचे दुखणे कोणीही सहन करू शकत नाही. कलर्सच्या पवित्र
भाग्य मध्ये प्रणितीची भूमिका करणाऱ्या अनेरी वजनीचा दात दुर्दैवाने अचानक
तुटला. तिला ते दुखणे सहन होत नव्हते आणि त्यामुळे तिच्यावर लगेच सर्जरी करावी
लागली.
अनेरीने तिच्या
डेंटिस्टला क्लिनिक उघडण्याची विनंती केली आणि सर्व खबरदारी घेऊन ही सर्जरी
करण्यात आली. यावर बोलताना अनेरी वजनी म्हणाली, "या संकट समयी
दाताचे दुखणे ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. सुरूवातीला मला डॉक्टरकडे जाण्यात
विश्वास वाटत नव्हता पण जेव्हा वेदना सहन करता येईनात आणि सर्जरी हा एकच पर्याय
राहिला होता. माझी डेंटिस्ट माझी रक्षणकर्ता आहे, तिने सर्व खबरदारी घेतली व
सुरक्षेच्या उपायांचे पालन केले. रिध्दी डेंटल स्टुडिओ पूर्णपणे सॅनिटाइज केला
होता आणि मला सुध्दा चाचणी व सॅनिटायझेशनच्या प्रक्रियेतून जावे लागले होते. त्या
सर्जरी मधून मी अजून बरी होत आहे, पण हा अनुभव लक्षात राहण्यासारखा होता.”
Comments
Post a Comment